इहलोकींची कल्पकता
ती तर उद्योगप्रियता १
उद्योगांत वेळ ज्याचा नित्य जाई,
त्याला दैव होई अनुकूल २
उद्योगाची धऱितां कास
होतों आपत्तींचा र्हास ३
हृदयाचा जो निर्धार
सिद्धीचा तो देणार. ४
स्वयत्नेंच लागतो करुं,
होय तयाचा तो गुरु. ५
बोल लावितो दैवास,
त्यास म्हणावें कापुरुष ? ६
आधीं भर बांगड्या करीं,
मग हात कपाळावर मारीं. ७
स्वमस्तकीं ज्याचा भार
तो नर काहीं करणार. ८
सिद्धयर्थ सुखें मरणार,
तो नर कांही करणार. ९
कर्तव्याला देई पाठ,
ती चाले नरकाची वाट. १०
स्वकीय ज्याला लेखावें,
त्या न कधीं उत्तर द्यावें. ११
जेथें धर्म जेथें नीति,
तेथें देवांची वसति, १२
सत्त्वपूर्ण ज्याची वृत्ति,
त्याचीं दैवतें जागती. १३
पैशासाठीं जीव देई !
त्याचा सौदा सस्ता नाहीं. १४
पैशासाठीं न्याय टाकी
स्वर्गी शून्य त्याची बाकी. १५
हृदयांतून न जे बोल
निघती, ते सगळे फोल १६
कवी - केशवसुत
- 'यथामूल आवृत्ती', १९६७,
ती तर उद्योगप्रियता १
उद्योगांत वेळ ज्याचा नित्य जाई,
त्याला दैव होई अनुकूल २
उद्योगाची धऱितां कास
होतों आपत्तींचा र्हास ३
हृदयाचा जो निर्धार
सिद्धीचा तो देणार. ४
स्वयत्नेंच लागतो करुं,
होय तयाचा तो गुरु. ५
बोल लावितो दैवास,
त्यास म्हणावें कापुरुष ? ६
आधीं भर बांगड्या करीं,
मग हात कपाळावर मारीं. ७
स्वमस्तकीं ज्याचा भार
तो नर काहीं करणार. ८
सिद्धयर्थ सुखें मरणार,
तो नर कांही करणार. ९
कर्तव्याला देई पाठ,
ती चाले नरकाची वाट. १०
स्वकीय ज्याला लेखावें,
त्या न कधीं उत्तर द्यावें. ११
जेथें धर्म जेथें नीति,
तेथें देवांची वसति, १२
सत्त्वपूर्ण ज्याची वृत्ति,
त्याचीं दैवतें जागती. १३
पैशासाठीं जीव देई !
त्याचा सौदा सस्ता नाहीं. १४
पैशासाठीं न्याय टाकी
स्वर्गी शून्य त्याची बाकी. १५
हृदयांतून न जे बोल
निघती, ते सगळे फोल १६
कवी - केशवसुत
- 'यथामूल आवृत्ती', १९६७,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा