लोटून दु:खपंकी हा ! हा! मज दीन धेनुलागून,
प्रियसत्तामा कचा ! मज गेलास कसा सरोष टाकून ! १
भक्त स्वदेवतेचें प्रिय करितो, त्याहुनी विशेष गुणें;
माधें प्रिय तूं पूर्वी आचरिलें, पाडिलें न अल्प उणें; २
तेणेंच द्विजराजा आसक्त कुमुद्वती स्वयें झालें;
नेणें मग कैचें हें प्राक्तन निर्घुण असें फळा आलें ! ३
झालासि कसा निष्ठुर एकाएकीं कचेश्वरा आर्या !
प्रेमें बद्ध करुनि मज, भावी मग खंडिली कशी भार्या ! ४
विदित न तुज काय मदनुराग तुझ्यावरि कितीक होता तें !
तुज तीनंदा मदर्थचि विहताते जिवविलें अहा! तातें. ५
तो तूंच काय शेखीं दु:खद उलटा असा जहालास !
हालहलहि न देइल ज्या दे हा शोक तीव्र हालास ! ६
आम्ही परस्परां जरि निज जीवांहून अधिक आळविलें,
अन्योन्य़शप्त झालों, हतदैवें विष सुधेंत कालविलें ! ७
अन्योन्यशप्त होतां, सजव निघालसि तूं निजस्थाना,
रुष्टत्वें खिन्न वदन वळवुनि न बघें त्वदीय प्रस्थाना. ८
कांही अवकाशानें दृष्टी केली समोर, तों नाहीं
तव रम्याकृति कोठें !- गमल्या मज शून्यशा दिशा दाही ! ९
तंव पश्चात्तापभरें नयनांतुनि टपटपां टिपें खवलीं;
तव मूर्तिच्या अहह ! ही, अन्तिमदर्शनसुखास आंचवली १०
काया कुरंडावी ही ज्या जितमन्मथा तुझ्यावरुनी,
डोळे भरुनी त्या तुज कोठे पाहू अभागिमी फिरुनी ! ११
तुज शेवटी विषादें बहु मी पुरषोत्तरें अहह ! वदल्यें;
आतां ती परतुनि मम हृदयाला टोंचिती जशीं शल्यें ! १२
अश्रुक्लिन्नें नयनें सत्वर जर हीं अशींच मिटतील,
तर तें बरेंचि होइल – तव विरहक्लेश सर्व फिटतील ! १३
घालून निराशेचें अंडें, आशा अहा! उडुनि गेली,
झाडून पंख ज्यांवरि होतीं. तीं ईप्सितें गिरविलेलीं ! १४
जें गुणनिधान दुर्मिळ किंबहुना देवकन्यकांनाही,
तें माझे मीं म्हणतां, विधिनें लाभूं दिलें मला नाहीं ! १५
सुरगुरुच्या सुतरत्न ! तुजलागीं वरुनि धन्य मी व्हावें,
आणि मनीं धरिलें कीं, येथें मीं सुरपुरींहि मिरवावें ! १६
नन्दवनांत कल्प-व्रतती-कुंजी तुझ्यासर्वें गोष्टी
रसभरित आदराव्या, होती ही आस मानसीं मोठी ! १७
मन्दाकिनींत आपण जलकेलि करुनि सुर-द्रुमांखालीं
सेवित सुधा बसावें, हाय! मनीषा निरर्थ ही झाली ! १८
मत्कृत-सारी-दुर्ग-भ्रंश-भयें चालिलासि हळु मागें,
एक नकारें ध्वसिलें मम आशाहर्म्य केंवि तूं सांगे ! १९
येथें सदनीं किंवा पुष्पवनीं बहुत वस्तु आहेती
स्मारक तव, दिसतां त्या धृतिला होतात माझिया हेती ! २०
यजनाचीं उपकरणें जीं ताताकारणें तुवां हातें –
द्यावी, तीं कां मजला मागे तो, होतसे असें मातें ! २१
चढुनी द्रुमीं फुलें तूं खुडिलीं परडी मदीय भरण्यास,
पुष्पित ते बघुनि म्हणें व्यर्थ सुमें येति कां बरें यांस ! २२
लावियला दारीं तू अशोक तो असुनि शोक देतो कीं,
तो रक्त तूं विरक्त द्वैध असें अधिक पाडितें शोकीं ! २३
भिंतीवरि रंगविलीं चित्रें चतुरें तुवां पुरा रुचिरें,
तीं बघतां तुजविषयीं उत्कण्ठा मन्मनांत शीघ्र शिरे ! २४
मग मी होउनी विव्हल, जाउनि एकीकडे कचा ! रडत्यें,
काढत्ये विरहाग्रीनें, अधोमुखी भूवरी विकल पडत्यें ! २५
असुरीं तुज वघितां मीं मागे केला रडून आकांत;
त्या वेळीं हीं नाही झाल्यें इतुकी निमग्र शोकांत. २६
त्या वेळीं पितयानें निजमंत्रें बाहतांचि आलास,
मन्नेत्र पुसनि मजला प्रेमें आश्वासिता जहालास ! २७
आतां मी भूमीवरि दु:ख करित लोळतां तुझ्याकरितां
येशी न कां? – वद कशी हाय तुझी आटली दयासरिता ? २८
यावा तुला कळवळा कण्टक खुपतां मदीय चरणास,
मग खेंचिलें उरी मम तूं केंवि नकार या प्रहरणास ? २९
अणुमात्र खेद होता मजला झटलासि त्याचिया हरणीं,
शोकीं कशी ढकलिली मग ही दावानलीं जशी हरिणीं ? ३०
शोका ! तुजला वरित्यें, मजला तूं प्रिय कचेंचि दिधलासी,
मायेच्या पोटीं तूं दुर्विधिपासून जो उपजलासी ! ३१
ज्येष्ठ स्वसा निराशा तव, शोका ! तूं परी तिशीं रमशी !
घेउनि मज पदरीं, दें आलिंगन तिजसर्वेंचि गाढ मशीं ! ३२
शोक, हताशा, दु:खें, आतां मज हींच होत गणगोत;
तूं त्यागितां कचा, मज सुखहेतु मुळीं समोरहि नकोत ! ३३
अथवा मीं लावावे बोल तुला कां म्हणून बहुसाल?
खिन्न मनीं आणावें दीन जने भग्न आपलें भाल ! ३४
मम जनकाच्या उदरीं वास तुला घडुनियां, नवें नातें
भ्रात्याचें जें जडलें तुझें मशीं; तूज मोडवेना तें. ३५
धर्मज्ञ द्विज मज तूं बन्धुसम, तुझ्यावरी मनी काम
अजुनि धरुनि मी भकतें हें उचित न खचित सज्जनीं काम. ३६
परि वेड मला लावी अनुदिन बहुकाल चिन्तिला हेत,
हृदयांत मुळें त्याची गेलेली फार खोल आहेत! ३७
करित्यें विवेक बहु, परि ठसली तव मूर्ति आंत जी कांत !
भ्रांत मला ती करिते कांपविते सर्व मन्मन:प्रांत ! ३८
अक्षांची माळ तुझी घेउनियां तेंवि तुव मृगाजिन तें
बसुनि वनीं तप वाटे साधावे, त्यजुनि येथल्या जनते. ३९
तूं मी बसलों येथें एकत्र म्हणून येथ ठरवेना;
परि तातस्नेहें मज पाउल येथून दूर करवेना ! ४०
‘तुज कोणीहि न ऋषिसुत वरिल’ असा शाप तूं दिला मातें,
परि ऋषिसुत वा नृपसुत कोणी नलगे मला वरायातें ! ४१
रत्नाला मुकल्यावरि कोण गणिल लाभ कांच सांपडणें?
भग्न हृदय मम झालें, संसारसुखी नको मला पडणें. ४२
मग आणखी विधानें न कळे लिहिलें असे शिरीं काय!
होऊ होणार तसें पुनरपि न म्हणेन मी मुखें ‘हाय’ ४३
कटु वदल्यें, शाप दिला, जा हें पूर्व स्मरुन, विसरुन;
करुणासिन्धो बन्धो ! विनवितसे हेंचि पदर पसरुन. ४४
‘बन्धो !’ हे सम्बोधन तुज देतां खेद मन्मना वाटे;
आळळितांही शोका, जल चाले अहह ! लोचनांवाटे ! ४५
कवी - केशवसुत
जाति - आर्या
- मासिक मनोरंजन,नोव्हेंबर १९०२

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा