पर्जन्याचे दिवस उलगले,
थंडीचेही बरेच गेले;
पिकें निघाली; कारण नुरलें
सोसाट्यानें वहावयाचें; म्हणुनि मरुद्भण खेळांत –
मग्न होउनी, चक्रावतीं
आरोहूनि, सांप्रत हे जाती
गर गर गर गर भर भर एका निमिषांमध्यें गगनांत ! १
धूलीचे कण असंख्य उठती,
पक्ष्यांचे पर तयांत मिळती,
गवताच्या त्या काड्याहि किती,
थंडीनें गळलेली पर्णें जीर्णें उडतीही त्यांत;
सृष्टीचा हा असा भोंवरा
फिरतो आहे पहा भरारा,
गर गर गर गर धरणीपासुनि चढत असे तो गगनांत ! २
वाग्देवी गे ! दे शब्दांतें
भोंवर्यांत या फेंकुनि, त्यांतें
जरा जाउं दे निजधामातें,
नरें मळविलें अहह ! तेज तें पूर्वी होतें जें त्यांत
म्हणुनी शाप न आतां मारी,
आशीर्वचहि न आतां तारी,
तर गर गर गर त्यांस चढूं दे ताजे व्हाया स्वर्गांत ! ३
मींहि कशाला येथ रहावें ?
काय असे ज्या मीं चिकटावें ?
वाटे गिरक्या घेत मिळावें –
या पवनाच्या चक्रीं, होउनि लीन सच्चिदानंदांत;
जगदद्रुमाचें पिकलें पर्ण
गलित असें मी अगदी जीर्ण;
तर भर भर भर उडूं द्या मला शब्दांसगें स्वर्गांत! ४
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
जाति - श्यामाराणी
- मासिक मनोरंजन, जानेवारी-फेब्रुवारी १८९९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा