जेव्हा कोनी शेपूट घालून वागेल...

जेव्हा त्यांना ठार मारले जात होते,
तेव्हा माझे मन स्वार्थी बनले होते.
जेव्हा ते जवान शहीद झाले होते,
तेव्हा मी ते गोड भोजन केले होते.

जेव्हा त्यांची शहीद माय रडत होती
तेव्हा माझी माय भांग पडत होती.
जेव्हा तो पिता सहारा शोधात होता,
तेव्हा माझा बाप सिगारेट पीत होता.

जेव्हा त्यांची ती पोरं रडत होती,
तेव्हा माझी पोरं जीने चढत होती,
जेव्हा त्यांची बायको कुंकू पुसत होती.
तेव्हा माझी उंची साडी नेसत होती.

जेव्हा त्यांची सरने जळत होती,
तेव्हा आमची धोरणे जुळत होती.
जेव्हा त्यांची चूल विझली होती,
तेव्हा आमची मटने शिजली होती.

जेव्हा ते राखेतून उभे रहात होते,
तेव्हा माझे दरवाजे पोखरले होते.
जेव्हा ते मजबूत उभे राहिले होते,
तेव्हा माझे मदतीचे दोर कापले होते.

जेव्हा आता माझा बंगला जळतोय,
तेव्हा तो मला दहशतवाद कळतोय.
जेव्हा आता मी मोठ्याने रडतोय,
तेव्हा मी कायम पायात लोळतोय.

जेव्हा आता माझी मस्ती गेलीय,
तेव्हा शहिदांची आठवण आलीय.
जेव्हा त्यांच्या मदतीला गेलो असतो,
तेव्हा मी आता ठार मेलो नसतो.

जेव्हा जेव्हा सैनिकांना मदत लागेल,
तेव्हा सांगतील तसे कोणीही वागेल.
जेव्हा कोनी शेपूट घालून वागेल,
तेव्हा तो समजा सरनाला लागेल.


कवी - सुभाष सोनकांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा