मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी ।
चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।
निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्तांची स्तुती नाही केली ।
तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥
रचनाकर्ते - संत एकनाथ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा