अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
रचनाकर्ते - संत एकनाथ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा