एका सोसायटीमध्ये बायकांना घाबरणा-या नव-यांची संख्या वाढु लागली. म्हणुन
त्याच्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी काही नव-यांनी एक संघटना स्थापन केली. संघटनेची
पहिलीच सभा भरली होती.
अध्यक्षांनी सर्वांना एक प्रश्न केला, "तुमच्या पैकी कितीजण आपल्या बायकांना घाबरतात ?"
एकाला सोडुन सर्वांनी हात वर केले. अध्यक्ष त्याला म्हणाले, "तु जरा आमच्यात निर्भय दिसतोस, तु जर आम्हाला मार्गदर्शन केलेस तर बरे होईल."
तो गृहस्थ म्हणाला, "आपला काही तरी गैरसमज होत आहे. मला हात वर करावे की नाही यासाठी मला माझ्या बायकोची परवानगी घ्यावी लागेल. ती घेऊन मी लगेच येतो."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा