रमेश रोज कामावर उशिरा जात असे आणि रोज साहेबांची
बोलणी खात असे. त्याला सकाळी लवकर उठताच येत नसे. शेवटी या रोजच्या कटकटीला तो
कंटाळला आणि एक दिवस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना त्याने सगळी हकीकत सांगितली आणि
तो म्हणाला, "मला असं काहीतरी औषध द्या डॉक्टर, की ज्यामुळे मला लवकर उठता
येईल."
डॉक्टरानी त्याला तपासले, दोन गोळ्या "रात्री
झोपण्यापुर्वी घ्या."
रात्री रमेशला शांत झोप लागली. "सकाळी मी
वेळेपूर्वीच दहा मिनीटे आलो आहे."साहेबापुढे धीटपणॆ उभा रहात तो हसत म्हणाला.
त्याला बघुन साहेबाने कपाळाला आठ्या घातल्या आणि
साहेब म्हणाला, "ते दिसतंच मला, पण काल तुम्ही कुंठ होतात?"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा