माझ्या शेजारणीचा नवरा आठवड्याभरापूर्वी कामानिमित्त दुबईला गेला आहे...🛩️
काल त्याची पत्नी त्यांची बेडरूम साफ करत असताना तिला त्याचा पासपोर्ट सापडला...🫣
🤣😂🤣😂😊
कालू प्रवचनाला गेला आणि मार खाऊन परत आला. त्याच्या मित्राने विचारले, "अरे दादा, हे कसे झाले?"🤔
कालू म्हणाला, "माझी काहीच चूक नसताना मला मार बसला." 🥴
महाराज असा उपदेश करत होते की, पती-पत्नी एकाच सायकलच्या दोन चाकांसारखे असतात. 😇
मी उभा राहून विचारले, "जर आपण आपल्या शेजाऱ्यासोबत मिळून एक रिक्षा बनवली, तर तुमचा काही आक्षेप असेल का?"😉
मी काही चुकीचा प्रश्न विचारला तर नाही ना? 🫣
🤣😂🤣😂😊
जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे,
आपल्या हातात फ़क्त मोबाइल...
🤣😂🤣😂😊
आजकाल ची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दुसरा नवीन घेतात
आणि एक आम्ही होतो
फुगा फुटला तरी त्याची चमन गोटी करून डोक्यात फोडत बसायचो
🤣😂🤣😂😊
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत
मोबाईल वर स्क्रोल करुन
४-५ किमी तर अंगाठाच चालत असेल..
🤣😂🤣😂😊
साधेपणा तिचा काय सांगावा,
ती आज देखिल chatting करताना
डोक्यावर पदर घेते
🤣😂🤣😂😊
आमच्या लहानपणी 2G, 3G, 4G, असं काहिच नव्हत,
फक्त, *गुरू G होते.* एक काना खाली मारली की,
पोरं आपोआप रेंज मध्ये यायचे
🤣😂🤣😂😊
आजकाल 8 वी 9 वी ची पोरं पण सर्रास
सिगारेट ओढतात आणि आम्ही एक होतो
बोरं पण सांभाळून खायचो चुकून गिळल गेलं तर पोटात झाड येईल या भीतीने
🤣😂🤣😂😊
आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच नव्हती आली
जितकी या मोबाईल मुळे आलीये
🤣😂🤣😂😊
* आधुनिक संस्कार "
वडील श्रीखंड घेऊन येतात.
मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो...
इतक्यात आईचे लक्ष जाते. त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते,
"किती वेळा सांगितले.... आधी....
फोटो काढून *Whatsapp वर टाकायचा आणि
नंतरच खायच
🤣😂🤣😂😊
काय मज्जा आहे आजच्या शाळेतल्या पोरांची
त्यांना लवकर "प्रेम" करायला
मिळतय....
आणि आम्ही ९ वी १० वीत "प्रमेय" सोडवुन सोडवुन मेलो
🤣😂🤣😂😊
पहाटेच जाग आली
कोणी टकटक करीत होते,🤛🏼
दार उघडून पाहिले बाहेर
तर कुणीच उभे नव्हते...🤔
आवाजाच्या दिशेने बघताच
खिडकीवर दिसला एक पक्षी,🐥
चोचीने टकटक करीत तावदानावर
उमटवीत होता नक्षी...🐧
"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,
"भाड्याने मिळेल का एखादे झाड 🌳
घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो
पण जागा हवी
पिल्लांसाठी...🐣
तुमच्या भाऊबंदांनी लुटले
आमचे रान केले निर्वासित,🤯
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी
असतो आता फिरस्तित...
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
थोडे दाणे अन पाणी,🍲🫙
पण निवाऱ्याचे काय?
हे लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला हवेच, खातो ती भिक
अन नेतो थोडे घरी,🦜
खायला तर हवच,
जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...🐦
कधीकधी वाटते करावी आत्महत्या🦉
बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून
त्या उंच मोबाईल टाॅवरवर...🦇
जसे मग आत्महत्ये नंतर
सरकार काही देते शेतक-याला,🦩
तसेच मिळेल का एखादं झाड
माझ्या पिल्लांना तरी आस-याला"🕊️
ऐकून मी चक्रावलो, खरचं
एवढा विचार मी नव्हता केला,🦃
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा
विचार कुठेच नाही झाला...🦤
मी हात जोडून म्हटले,
"त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,🦢
पण आत्महत्या करू नको
खरचं मनापासुन सांगतो...🦚
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर
बांध वनरुम किचन खोपा,🐓
अडचण होईल पण आत्ता तरी
एवढाच उपाय आहे सोपा..."🦅
तो म्हणाला, "खुप उपकार होतील,
पण भाडे कसे देणार?",🦆
"रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
बाकी काही नाही मागणार..."🦜
तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात
पण बाकी नातलगांच काय?,🦋
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,
कुठे ठेवतील पाय...?"🐾
"अरे लावताहेत आता झाडे
अन जगवतात आता कुणी कुणी,🐸
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग
आत्महत्या करू नका कुणी..."🙈
ऐकुन तो पक्षी उडाला
काड्या जमवायला घरट्यासाठी,🌿
अन मी पण मोबाइल उचलला
तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...🙊
त्याची खिडकीवरची टकटक
माझ्या मनाचे उघडले कवाड,⛩️
वाचुन तुम्ही पण लावाल ना
कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...🌱
*निदान एक तरी झाड !*🌴
🌳🌳 🌳🌳🌳