आपण दुःखी का होतो.....?

एकदा शिक्षिकेंनी तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो शाळेमध्ये आणावयास सांगितले. प्रत्येक टोमॅटोवर त्या मुलांनी,ते ज्या व्यक्तीचा द्वेष करत असतील त्याचे नांव लिहून आणावयाचे होते.अशा रीतीने जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टोमॅटो त्यांनी आणावयाचे होते.

ठरलेल्या दिवशी सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टोमॅटो आणले.काहींनी दोन, काहींनी तीन,काहींनी पाच तर काहींनी वीस टोमॅटो,ते द्वेष करीत असलेल्या संख्येबरहुकूम आणले.

शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की,त्यांना ते टोमॅटो ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत.

जसजसे दिवस उलटू लागले,तसतसे मुले टोमॅटोंच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले.ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टोमॅटो होते त्यांनी तक्रार केली की त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारचं सुटलेला आहे.

आठवड्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला,"तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले?"

मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टोमॅटोंच्या जडपणाबद्दल तक्रारी केल्या.विशेषत: ज्यांनी अनेक टोमॅटो आणले होते.

शिक्षिका म्हणाल्या,"हे अगदी तुम्ही,आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे."

 द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता.जर तुम्ही टोमॅटोंचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल तर कल्पना करा,तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्या अंत:करणावर किती परिणाम होत असेल."


आपल्या दुःखाचे कारण हेचं आहे...

नको त्या वाईट गोष्टी मनात साठवून ठेवतो.अंत:करण ही एक सुंदर बाग आहे.अनावश्यक तण काढून टाकून त्याची नियमीत मशागत करण्याची गरज असते.तुम्हाला क्रोध दिलेल्यांना क्षमा करा. त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंत:करणात जागा तयार होईल.

 माणूस फळं सोडून वडापाव,सामोसे खातो.


मग आजारी पडून दवाखान्यात जातो. 


दवाखान्यात त्याला त्याचे नातेवाईक सफरचंद,संत्री,द्राक्ष खायला देतात.


आणि त्याचे नातेवाईक दवाखान्याच्या बाहेर बसून वडापाव,सामोसे खातात.


हे जीवनचक्र आहे

पाण्याबद्दल एक माहितीचा लेख.

डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे

1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. एक मृत साठ्याचे पाणी, दुसरे जिवंत साठ्याचे पाणी*


       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्यासाठी दहा वर्ष लागतात. 

4)  एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे.

5) एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 

           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगरावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.  

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या. याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. झाडं माणसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

 दादा एकदा बार मध्ये जातात ...


 दादा : ( वेटरला ओरडुन ) मला half chikan तंदुरी🍗 आणि बारमध्ये बसलेल्या सगळ्यांना बिर्याणी पाठव.. 

कारण जेव्हा मी खातो त्यावेळेस सगळ्यांना चारतो....

 

( बार मध्ये बसलेले सर्वजण टाळ्या वाजवून धन्यवाद करतात )


तंदुरी चिकन खाल्ल्या नंतर दादा पुन्हा ओरडले


दादा : वेटर मला एक रेड लेबल आणि बार मध्ये बसलेल्या सगळ्यांना एक एक बिअर पाठव...

कारण ज्यावेळेस मी पिती तेव्हा सगळ्यांना पाजतो.. 


( सगळे दादांवर खूप खुश होऊन पुन्हा टाळ्या वाजवतात आणि पुढच्या ऑर्डरची वाट बघतात ) 


तिक्यात दादा पुन्हा ओरडले....


दादा : वेटर... bill please... आणि सर्वांना ज्यांच्या-त्यांच्या टेबलवर बिल पाठव...कारण 😂😂

जेव्हा मी bill भरतो तेव्हा सगळ्यांना भरायला लावतो..

मतदान

 तब्बल पाच वर्षांतून एकदाच येणारा योग ! 


बायको सोबत असतानाही स्वतःचं मत मांडता येतं !! 


मिळालेल्या संधीचं सोनं करा ! 

 जर विवाहित पुरुषाचा लास्टसीन 

पहाटे 3 वाजताचा असेल 


तर समजून जायचं

 

तो झोपला आहे


त्याचा मोबाईल बायकोने चेक केलाय.

😂😂😂

 एका भावाच्या आयुष्यात कसलेही टेन्शन नव्हते.


मग एक दिवस त्याने डिमॅट खाते उघडले….



आता तो...


युद्धाचा ताण..

जागतिक बाजारपेठेचा ताण..

निवडणुकीचा ताण..

व्याजदराचा ताण..

भारतीय रुपया आणि डॉलरचा ताण..

कंपन्यांच्या निकालांचे टेन्शन..

IPO होणार की नाही याचं टेन्शन..

शेअर बायबॅकचे टेन्शन...

आयकर भरण्याचे टेन्शन..

यूएसए चीन

रशिया युक्रेन

इराण इराक

उत्तर कोरिया दक्षिण कोरिया

या सर्वेक्षण देशांचे टेन्शन घेतो...

 एका छोट्या व्यावसायिकाने सावकाराकडून पैसे उसने घेतले पण ते निर्धारित वेळेत परत करू शकला नाही. सावकार म्हातारा आणि रागीट होता पण त्याची नजर व्यापाऱ्याच्या सुंदर, तरुण मुलीवर होती.

सावकाराने व्यावसायिकाला सांगितले की जर त्याने आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी केले तर तो व्याजासह कर्जाची रक्कम विसरेल.

सावकाराच्या या बोलण्याने व्यापारी आणि त्याची मुलगी नाराज झाले.

सावकार व्यापाऱ्याला म्हणाला, "मी रिकाम्या पिशवीत एक पांढरा आणि एक काळा खडा ठेवतो. तुमची मुलगी न बघता पिशवीतून एक खडा काढेल. जर तिने तो काळा खडा काढला तर तिला माझ्याशी लग्न करावे लागेल. तुमचे कर्ज माफ होईल.

तिने पांढरा खडा काढला तर तिला माझ्याशी लग्न करावे लागणार नाही आणि तुझे कर्जही माफ होईल.

पण जर तुझ्या मुलीने पिशवीतून खडे काढण्यास नकार दिला तर मी तुला तुरुंगात पाठवीन.

यावेळी सावकार, व्यापारी आणि त्यांची मुलगी व्यावसायिकाच्या बागेच्या रस्त्यावर उभे होते ज्यावर पांढरी आणि काळी मिश्रित खडी पसरलेली होती.

मग ठरल्यानुसार सावकाराने खाली वाकून विखुरलेल्या खड्यातून दोन खडे उचलले आणि हातातल्या रिकाम्या पिशवीत ठेवले.

सावकार खडे उचलत असताना, बेईमान सावकाराने दोन्ही काळ्या रंगाचे खडे खडीतून उचलून पिशवीत टाकल्याचे मुलीने पाहिले.

मग सावकाराने मुलीला पिशवीतून एक खडा काढण्यास सांगितले.

जर आपण नीट विचार केला तर इथे तीन शक्यता आहेत:


1. मुलगी खडा काढण्यास नकार देईल.

2. मुलगी म्हणेल की सावकाराने बेईमानी केली आणि दोन्ही काळे खडे पिशवीत टाकले.

3. मुलगी काळा खडा घेऊन तिच्या आयुष्याशी तडजोड करेल आणि वडिलांना कर्ज आणि तुरुंग यापासून वाचवेल.

शेवटी त्या मुलीने पिशवीत हात टाकून एक खडा बाहेर काढला आणि न बघता खाली पडलेल्या खड्यात टाकला. पिशवीतून बाहेर आलेला खडा काळ्या-पांढऱ्या खड्यात हरवला, म्हणजे मुलीने कोणता खडा खाली टाकला हे ओळखणे अशक्य होते.

तेव्हा ती मुलगी म्हणाली, "अरे, माफ करा, मी पण अशी मूर्ख आहे, मी न बघता खडा टाकला. काही हरकत नाही, आत्ता पिशवीत एक खडा आहे. तो पाहून तुम्ही सांगू शकता, माझ्याकडे कोणत्या रंगाचा खडा होता, ते! जर त्यात एक काळा खडा शिल्लक असेल तर याचा अर्थ मी पिशवीतून पांढरा खडा काढला आहे."

सावकाराला माहित होते की पिशवीत फक्त एक काळा खडा आहे, परंतु तो ते कबुल करु शकत नव्हता. त्यामुळे मुलीने पिशवीतून पांढरा खडा काढल्याचे स्पष्ट झाले.

सावकार हतबल झाला आणि त्याचा चेहरा पडला. मुलीने तिच्या बुद्धिमत्तेने एक अशक्य प्रतिकूल परिस्थिती तिच्या बाजूने वळवली.

समस्यांवर उपाय शक्य आहेत, फक्त गरज आहे ती त्यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची!

लाल चिखल

घंटी वाजली, शाळा सुटली आन् तुंबून धरल्यालं पाणी फुटावं, तसं दारातोंडून पोरं वाहात सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरमुरं उधळल्यागत झालं. घोळक्या-घोळक्यानं रस्तं तुंबत चाललं. पेठातली पोरं पेठात घुसली. घरं जवळ करीत निघाली. बर्‍या घरच्या सायकली घंट्या वाजवीत गर्दीतून वळण घेत सकळनं निघाल्या. उगचच आपून आपल्याला आवकीत-जवकीत साळुंक्यांच्या थव्यागत निघालेल्या पोरींनी सम्दा रस्ता कालवून सोडला. मास्तरं-प्राध्यापकं सावकाशीनं पाय उचलीत गप्पा मारीत निघाली व्हती... आम्ही खेड्यावरची पोरं दप्तरं पाठशी टाकून निघालाव. कुणी आडतीकडं आपलं कुणी आलंय का मनून निघालं, तर कुणी गाववढीनं गावरस्त्याला लागलं. तिसरा तितंच हापसा बघून भाकर सोडून खात बसला... पर माज्यामागं येगळीच घाई लागल्याली. सोम्मारचा बाजार आसल्यामुळं आज आर्दीच शाळा व्हती. बाजारगावची माणसं टकुर्‍यावर काईतरी वझी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैलं, माळवं, दाळी-दुळी इक्रीटिक्रीला जमंल तसं आणलं जात व्हतं. गाढवं, घोडी, गाड्या, सायकली... आसल्या वर्दळीनं सम्दा सम्दा रस्ता गजबजून गेला व्हता. बाया-बापड्या काचकं-बोचकं घेऊन धावत-पळत व्हत्या. बोलता बोलता, सवयीनं रस्तं धरून हालत व्हत्या. बाजार कालवा वाढत व्हता आन् पुरागत माणसं तालुक्याकडं धावत व्हती...माणसाचं लोंढं बघत, निरखीत म्या बी घाईनं बाजारतळाकडं निघालो व्हतो. उरात दम भरला व्हता. आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात भ्या दाटत व्हतं. पायात गती तशी टकुर्‍यात येगळीच चाती फिरत व्हती. आबानं आन् मायीनं पुन्हा पुन्हा सांगितलं व्हतं. जतावून ठिवलं व्हतं,


‘बापू...’


‘आंऽऽ’ म्या दप्तर पाठीशी टाकून निघालो व्हतो.


‘ह्य बक, गेल्या बाजारासारखं करू नकू. नीट पेठंच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठीव बग. एकांदा तास बुडला तर बुडला.’


‘व्हय.’ मनून मी रस्त्याला लागलो.


नदीच्या बाहीर सडकंला लागलो की, मी वही काढायचो आन् इंठाजीचं शब्द पाठ करीत चालायचो. गावची पोरं सोबत असायची तर कवा नसायची... कवा इतिहासाचं तर कवा मराठीचं पुस्तक मी चालता चालता वाचायचो. कळंबापस्तोर सहज आब्यास व्हायचा. तसंच शाळा सुटून गावाकडं येताना बी करायचो... असंच खेळत वाचायचो, वाचीत खेळायचो... समद्या वर्गात वाढ नंबर यायचा. पर ह्या वर्षी मॅट्रिक व्हती. आबाला, मायीला मोप समजावून सांगितलं. मास्तरानं दिलेली चिठ्ठी वाचून दावली... पर आबाचं गणितच येगळं व्हतं. मनात असून बी त्यांचा इलाज नव्हत्या... आन् म्या उरावर दगड घिऊन साल काढायचं ठरविलं. पर ह्यो सोम्मार मुळावरच यायचा...


आन् एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली. तसं म्या चमकून म्हागं बघितलं.


‘बाप्या, लेका किती हाका मारल्या रं...?’ काळ्याचा गिना जरा जाजावल्यागत झाला.


‘का? काय झालं...?’


म्या जरा थबकून नेट लावलं. तसं गिनानं धोतराच्या कोपर्‍यात बांधून आणल्याली भाकर माज्या हातावर टेकविली. आन् उसासा टाकीत, चिडल्यागत बोलला,


‘तुह्या म्हातारीनं भाकर दिलीय. आन् चांगली पैसून जागा धर मनून सांगितलंय... ’


गिन्या ह्यवढंच फटकारल्यावानी बोलला. आन् ‘व्हय-न्हाय’ करता करता माणसात इरघळून गेला...


हातातली भाकर म्या दप्तराच्या पिसवीत कोंबली. ताराचं कुंपन वलांडून, मी वाकून बाजारतळावर आलो. आन् चांगली जागा, मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागूजाग माणसांनी दगडं, पोतडी, करंड्या टाकून जागा धरल्या व्हत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतलेल्या व्हत्या. मी वाटकूळ भांबावल्यागत हिंडत व्हतो. फिरत व्हतो... चवकडं दुकानाची मांडामांड चालली व्हती. गाड्या, हातगाड्या फिरत व्हत्या. च्यावाल्याच्या कळकट किटल्या फिरत व्हत्या. पालं, कनाती ठोकल्या जात व्हत्या. चांभार-मोच्यांची दुकानं थाटत व्हती. कातडी-सागळीचा घोंगता वास पसरत व्हता. झाडू-फड्याची आन् चऱ्हाटा- दोरखंडाची मांडामांड व्हत व्हती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाइनी थाटत-सजत व्हत्या. तांबुळी, भुई गिऱ्हायकाची वाट बघत होते.


म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हेरली. पिसवीतलं धोतर काढलं आन् लांबवून पसरून टाकलं. त्याच्यावर दोन-चार दगडं वजन मनून ठेवलं. आबा आन् माय हितं बसत्यात. आन् आपली जागा...? पुन्हा माजी नजर सांधं हुडकीत फिरायली. म्या पुन्हा एकदा सम्दीकडं चक्कर टाकली... एक मोकळी जागा हेरून तितंच दप्तर टाकलं. आन् पलीकडं मेख ठोकणाऱ्या माणसाला म्या हाटकिलं, जवळ जात इच्यारलं,


‘मामा, ही जागा खुलीय नं...?’


‘काय मांडायचंय?’ त्यानं माज्याकडं न बघताच गुरकल्यागत इच्यारलं.


‘उल्सं माळवंय...’ मी उभाच.


‘कोण गाव?’ उगचंच ताठत चालला.


मलाच चुकल्यागत वाटलं. न इच्यारता तसंच ‘खडं-दगडं’ मांडून बसाया फायजी व्हतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो,


‘हास्यागाव...’


‘...जरा पलीकडं सरून बस.’ तवर तर म्या दगडं मांडून बसलो व्हतो. आन् उल्संक उसासा टाकीत तितंच दप्तर मांडीवर घिऊन बसलो. त्या हातरलेल्या धोतराकडं एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली. आन् एक एक तुकडा मोडीत चाबलीत र्‍हायलो...’


‘साळंत जातूच?’ त्यो मेख ठोकणारा रस्सी बांधून उठला. माज्या मांडीवरलं दप्तर बघत बोलला.


‘हां...’


‘कितवीला?’ त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या.


‘मॅट्रिकला...’ म्या चटणीवर टोच्या मारीत घास उचलला.


‘मॅट्रिकला? मग आवघडंय् गड्या...’


त्यानं धोतरानं तोंड पुसीत बोलणं वाढविलं. आन् म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं. पर ‘आवघडंय् गड्या’ ह्यो शब्द मातर मनात घासागत घोळत चालला. वर्गातलं जोशीमास्तराचं बोलणं आठवायलं. महात्मा फुल्यांच्या धड्यातला त्यो माळवेवाला आपल्या आबागतच आसंल? पर काय हुबेहूब वाटायलंय... मला राहवलंच न्हाय. जेवता जेवता दप्तरातलं पुस्तकं काढलं. आन् घास चावता चावता पानं चाळायलो... तर ह्या खुणा केलेल्या वळी डोळ्यावाटं शिरायल्या, मना-काळजात पसरायल्या... पटत चालल्या...


‘...शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणिलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणितेवेळी, त्या सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वोपरी नाडिते... गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणिल्यास.... गाडीभाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुलांबाळांपुढे शिमगा करावा लागतो... असले अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास... शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे!...’


...माज्या डोळ्यात ही आक्सरं उतरत व्हती. आतल्या आत त्या आक्सराचा पडताळा करून म्या बघत व्हतो. दर बाजारी आपूनही भाजीपाला-माळवं आणतो. घसा फाटुस्तर वरडून-सरडून इकतो. आरडून-वरडून बोलतो. पर आखरीला काय हाय... वाळूत मुतल्यागत ‘फेस ना पाणी.’ मला वाचता वाचताच कसंतरी झालं, टकुरं चकरून गेलं. इतिहासातला इंठाज आठवू लागला. दादाभाईंचं बोलणं, जोशीसरांचा आवाज कानामनात घुमू लागला. गोरा इंठाज गेला, पर काळ्या इंठाजानं तसलंच पाऊल उचललं... आपलं आबा, माय, थोरला भाऊ आन् चार बैलं रातंध्या राबत्यात. उरं-खांदी फुटल्यात... घासातला घास पिकाच्या वाफ्याबुडी घालून, टकुरं धरून बसल्यात... दोन सालं झाली, न्हाणीची भित पडलीय... माज्या डोक्या-उरात सम्दा सम्दा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंठाजांचा व्यापार, सावकारं-संस्थानिकांचे सौक... जोशीसरांनी सांगितल्यालं जळण्याचं उदाहरण... मला सालोसालचा खंगत-झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला.


...म्या वाटकूळ कसल्यातरी तंद्रीतच बुडून गेलो होतो... इंठाजांनी सुधारणा केल्या...? छ्या! छ्या लुटीचीच व्यवस्था केली! मनं, आजच्या योजना...?


‘ये पोरा!’


तसं म्या दचकूनच वर बघितलं, तर आमच्या गावचा सटवा तेली.


‘का वं?’ म्या भाकर बांधली. पुस्तक उचलून दप्तरात कोंबलं. आन् हिकडं- तिकडं बघत सटवाला इच्यारलं,


‘आबा न् माय दिसली का वं...?’


‘येड्या, तू हितंच तप घालीत बस. आरं म्हातारं मरणाचं वझं घिऊन बाजारात हिंडायलंय की... तुला जागा धरायचं सांगितलंय् की जणू...’ आन् सटवा पुन्हा बाजारात मिसळून गेला. तसं म्या जागा धरलेल्या आन् पसरून टाकलेल्या धोतराकडं बघितलं. आन् तितंच दप्तर ठेवून आबाला-मायीला न्याहाळत, बघत उभं र्‍हायलो. टाचा उचलू उचलू निरखायलो... तसं मिरच्याच्या लाईतून म्हातारी दोन वझी घिऊन यायल्याली दिसली. तसं म्या जरा पुढं झालो. तिच्या टकुऱ्यावरचं वझं उरी-खांदी घेतलं.


म्हातारी धपापली व्हती. हुसासा टाकून बोलली, ‘बापू, हाळूच माय. न्हायतर पोटा-फिटात दुकंल...’ आन् म्या दावलेल्या धोतराकडं कांद्याचं वझं घिऊन गेली. गवारीचं ठिकं उघडून बघितलं. हिरव्यागार लस्लसीत शेंगा... म्या पोत्याचं तोंड घडीनं गुंडाळीत शेंगापस्तोर गुंडाळलं. गिर्‍हायकाला दिसंल आस्या पद्धतीनं पसरून ठेवलं.


...म्हाताऱ्याच्या बी दोन डाली मायीनं तिकडंच उतरून घ्यातल्या... म्या माजं दुकान लावून आबाकडं गेलो. मायीनं लाल कांद्याचा ढीग पुढ्यात वतला व्हता. आन् आवरीत-सावरीत त्याला आकारात आणीत व्हती. टमाट्याच्या दोन मोठमोठ्या डाली बघून माझा ऊरच दडपला. ह्यवढं वझं?... आबानं टकुर्‍यावरच आणलं व्हतं. टमाटी फुटत्याल मनून कावडीगत खांद्यावर आणलं व्हतं. एरांडाच्या पानानं चवकून डाल सावरून बोंदर्‍यानं बांधली व्हती. आबाबराबर मी बी डाली सोडल्या. लाल लाल, ताजी ताजी टमाटी... एका किलूत चार न्हायतर तीनच बसणारी... आन् एक डाल उघडी ठेवली. दुसरी पानानं झाकून टाकली. तागडं, मापं बाहीर काढली. आबानं उभं ऱ्हाऊ सम्द्या बाजारावर, माळव्याच्या लाइनीत नजर टाकली. आन्...


‘मायला, जिकडं तिकडं लालेलालच हाय बाबा...’


सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं समजावून सांगितलं. पैसं संभाळ मनून जतविलं. आन् कसल्यातरी उसण्या बळानं आरुळी ठोकली, ‘चला, चला... लाल टमाटी सस्ती लावली. सस्ती...’


अन् ‘सस्ती’वर जोर देऊन आबा आरडत र्‍हायलं. माय आरडू लागली. आन् म्या हळूहळू मप्ल्या जाग्याकडं निघालो...


म्या मन मारून दुकान लावलं. हिरवीगार ताजी गवारी पोत्यावाटं गिर्‍हायकाला दिसावी मनून म्या आतल्या आतच ढिगारून ठेवली व्हती. भावाचा कानुसा घेण्यासाठी म्या शेजारच्या माळवेवाल्याचा अंदाज घेतला. घसट दावून हिकडचं-तिकडचं बोलत र्‍हायलो. वळक वाढत चालली. म्या मनातला सवाल केला. आन् तसा समजावून बी घेतला. मन्लं, ‘मामा, ह्ये माळवं ठोकीनं इकल्यालं परवडतं का असं बसून... इकल्यालं फायद्यात पडतं...?...’


शेजाऱ्याला पोराचा सवाल जरासाक पोक्त आन् यव्हारी वाटला. त्यानं हिरव्या मिर्च्याचा ढीग सारखा करीत सांगितलं, ‘...आरं आसं बसून इकल्यालं कसं आयकंल. आस्लंच फायद्यात पडतं.’ म्या त्यातलं बोलणं समजावून घेतलं. पर इकनाराचा रोजगार, टकुऱ्यावरून वाह्यची मजुरी आस्लं जवा मी बोलायलो, तवा शेजार्‍यानं हासून माज्याकडं बघितलं. आन् सिस्ताईनं बोलल्यावनी बोलला, ‘ह्या बागवानाली कसं परवडतं रं...? आं... आरं ह्या घेण्यादेण्यातून तर त्यांचा परपंच चालतोय. पण आपल्याला त्ये दांडी मारायचं जमत नस्तंय...’


असं बोलून पावणा हासाया लागला. मला त्याचं ह्ये बोलणं खरं वाटलं अन् जरासंक गमतीचं बी वाटलं. मेहनत करून पिकविणारा वांद्यात पण ह्ये दलाल, आडत्ये मातर फायद्यात...?... आता ह्ये आबानं आन् मायीनं गावाकडून चार गठुडी माळवं आणलंय... त्यातलं एक गठुडं जर हमालानं तितूनच उचललं अन् तितंच उभ्या असणार्‍या गाडीवर ठेवलं तर एक रुपाया... पर आबानं, मायीनं, दादानं रानातून गावात, आन् गावातून कळंबात पर... काय खरंय... माज्या मनात येगळंच गणित जुळत चाललं... आन् आतल्या आत घसरत चालल्यागत वाटायलं.


‘का रं माप हाय का किलूचं...’ शेजारच्या पावण्यानं मला हाक मारून हाटकिलं. माज्याजवळचा आर्धा किलू मागून घेतला. आन् त्याची गिऱ्हायकी म्या खिनभर बघत बसलो. पावण्यानं गिऱ्हाईक वारलं. आन् झाल्याली भवानी कपाळाला लावून आदबीनं बसला. तसं म्या त्याला बोलत बोलत इच्यारलं,


‘...आन् ह्ये ह्याचं भाव कोण ठरवितंय वं...’


‘कोण कस्याला ठरवील. आपलं नशीब मनायचं आन् गप्प बसायचं...’ पावण्यानं बोलणं थांबवीत आरुळी ठोकली,


‘घ्या घ्या. हिर्वी मिर्ची, लवंगी मिर्ची... घ्या... सस्त लावली सस्त...’


‘भवानी झाल्यानं पावण्याला चेव आला व्हता. येगळाच हुरूप चढला व्हता... अन् माज्याकडं बघून सांगत व्हता.’


‘पोरा, मुका ऱ्हायलाच तर तसंच गठुडं गावाकडं न्यावं लागंल, बैलाला खाऊ घालावं लागंल... आरं बोलंल त्यांचं हुलगं इकत्यात, मुक्याचं गहू बी कुणी इच्यारीत नस्तंय...’ असं सांगत सांगतच त्यो उभा र्‍हायला आन् कानाला हात लावून आरडायला-


‘घ्या. घ्या. सस्तीची-मस्तीची. घ्या लवंगी मिर्ची... हिरवी मिर्ची, हिर्वी हिर्वीऽऽ आलीऽऽ आलीऽऽऽ’


आता बाजार चांगलाच भरला व्हता. चांगली गिर्‍हायकं पिसव्या घिऊन हिंडत व्हती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका, पोरी नाजूक जाळीच्या पिसव्या घेऊन बाजार बघत व्हत्या. भाव करीत हिंडत व्हत्या. धा-पाच पैस्याची हुज्जत घालताना मला त्यांची चीड यायची. कीव वाटायची... पर ह्ये गिर्‍हाईक येताना दोन-दोन, तीन-तीन जमून यायचं. घोळका घालून बसायचं. ‘माल’ चिवडून बघायचं. किलूचा भाव करून छटाक-पावशेर मागायचं. आन् उठताना ‘सुटं न्हाई’ मनून पाच-धा पैसं कमी टाकून निघून जायचं. धा पैसाच्या कोतिंबिरीसाठी सम्दा बाजार फिरून यायचं. गड्याचं गिर्‍हाईक बरं, पण बायकाची हुज्जत मला सम्दी सम्दी म्हायती व्हती...


पैस्यामागं पैसा जात व्हता. माणसं कुणालातरी फसवायला मनूनच बाजारात आल्याली व्हती. शेतात राबणारी मजुरं सोम्मारचा वायदा करणार्‍या फाटक्या मालकाला हुडकीत व्हती. आन् तसली मालकं आडत्याच्या हातापाया पडत बसली व्हती, तर कुणी बैलं-म्हशी बाजारात मांडल्या व्हत्या... शेळ्या, अंडी, कोंबड्या, बोंबील, मासळी-सम्द्याचा वास एकमेकात मिसळून गेला व्हता. भाजीपाला, पसाकुडता पिसवीनी आणल्याला धान्य-धुन्याचा माल बसला व्हता. तांबुळ्याच्या दुकानात रेटारेट व्हत व्हती. चाट्याची पालं, बोहरणीचं आरडणं... भांडीवाल्याचं सौदं झडत व्हतं. पाहुण्या-रावळ्याच्या भेटीगाठी व्हत व्हत्या. दलाल हेड्याला बोलत व्हते. कांडी-बत्ताश्यासाठी पोरं चिरकत-आरडत व्हती. आन् दारूगुत्याकडं गेलेल्या नवर्‍याला बायका धुंडीत व्हत्या. आपल्या परपंच्यावर थुकत व्हत्या. देवाला शिव्या घालीत, पोराच्या पाठीत रपका घालीत व्हत्या...


आन् एकाएकीच मला माज्या वळकीचा आवाज आयकू आला. बाजूला बघितलं, तर आबा उभं र्‍हाऊन आरडत व्हतं. हात वर करून करून चिरकत व्हतं. त्यांच्या घस्याला कातर लागल्यागत वरडत चिरकत व्हतं... मायीचा बी आवाज त्यांच्या म्हागूम्हागच आयकायला यायला... मला आतल्या आतून डुचमळल्यागत झालं... उगचच भरून आल्यागत झालं. आपून बी आरडावं, उठून उभा र्‍हावं... घसा फाटुस्तर... पर मला समुरूनच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली. पोरी बी त्यांच्या त्यांच्या घोळक्यानं यायच्या. माज्याकडं तिरकं बघत हसायच्या... तर कवा मुद्दामच माज्या शेजारच्या माळवंवाल्याशी भाव मोडून निघून जायच्या. दुसऱ्या दिवशी वर्गात आवघडल्यावनी व्हायचं. जीव बारीक बारीक होऊन जायचा.


पर मास्तरं मुद्दाम माज्याकडून घ्यायची. ‘धंद्यात लाज बाळगूनै’ मनून सांगायची... आता बी माजा जीव इगरून गेल्यागत झाला. सुमन जोशी, अनघा देशमुख, विमल राऊत आल्या तशा मला कोपर्‍यातून बघत गेल्या... म्या तोंडावरला घाम पुसला. त्यांच्याकडं बघता बघताच, आबाचा आवाज आला,


‘चला, चला. सस्त लावली. बीन बियाची टमाटी... लाल लाल टमाटी.. मस्त-सरकारी टमाटी घ्या घ्या...’


पर गिऱ्हाईक यायचं. डालीत हात घालून बगायचं. चेंडू दाबल्यागत दाबून न्याहाळायचं. आन् आर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. काळ्या चष्म्यावाल्याकडं ‘खाऊ का गिळू’ असं डोळं फिरवीत बघायचं. पर तसंच घटाघटा गिळून सिस्ताईनं सांगायचं...


‘मामा, पुढच्या आठवडी या... आज न्हाय मिळायचं...’ तसं त्ये माणूस काईतरी बुटबुटत निघून जायचं. आन् आबा गळ्याच्या दोर्‍या ताणू ताणू आरडायचं. मधीच मायीला बी टोचणी देऊन सांगायचं,


‘...मुकी झालीच काय ह्येडंबा? आरड की आवसंन आसल्यावनी...’


आन् आपूनच मुठी आवळीत आरडत उठत. आरडता आरडताच माज्याकडं बघत अन् तितूनच शिव्या हासडून गर्जत,


‘ये पोरा. बसलाच कसा? उठून आरड की हँद्रया... ऊठ ऊठ.’


...तसा माजा नाइलाज व्हायचा. म्या वळकी-फिळकीचं माणूस बघून घ्यायचो. आन् मन मारून उठायचो. डोळं झाकून खच्चून आरडायचो,


‘घ्या. घ्या. ताजी गवारी, हिर्वी गवारी सस्त लावलीय् सस्त... घ्याऽऽ घ्याऽऽऽ.’


लगेच डोळं उघडून म्या खाली बसायचो. कासवागत मान आकसून बघत र्‍हायचो.


...पयला तास संपला आन् दुसरा तास सुरू झाला.


‘...आन ‘राष्ट्रीय जागृती’ भाग सुरू झाला. इंठाजांच्या आर्थिक नीतीवर दादाभाईंनी कसा झगझगीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आवाहन केले. ’चळवळ करा-चळवळ करा’ असा संदेश दिला. ‘तुमचे साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे.’ दादाभाईंनी इंग्रजी गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितले. ...कच्चा माल कमी भावात इंग्लंडला निर्यात होई, तिथला पक्का इथं बाजारपेठ बनवून विकला जाई... इंग्रज सुधारला. भारत दरिद्री बनला... आज आपण स्वतंत्र आहोत पण... आजही दादाभाईंची हाक, त्यांचे आवाहन तसेच कायम आहे. गोरा इंग्रज गेला. पण आता आपल्यातलेच काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीनं वागत आहेत... कष्टकरी माणूस अजून न्याय मिळवू शकला नाही. श्रमणारा दलित, भटका अजूनही पारतंत्र्यातच भटकतोय...’


मी हे सम्दं कान देऊन, मन लावून ऐकत होतो... वहीत भराभर लिहीत होतो. आपली गरिबी-आपलं दारिद्य्र ह्याची कारणं पडताळीत व्हतो. ...हीच बोंब शिक्षणाची बी इंठाजांनी केली मनं... आम्हाला काळ्या रंगाचा व गोऱ्या वृत्तीचा माणूस घडवायचाय...’ हे तो मॅकोले म्हणतो मनं... पर आज काय आन् कसलं घडतंय्?...


मी वर्ग सुटला तरी ह्येच टकुऱ्यात घिऊन वावरतोय. ह्यातलं कवा कळतंय, कवा कळत बी न्हाय. पर ‘पास’ व्हायची चिमट हाय. पुस्तकातल्या वळी, अन् जोशीसराची, जाधवसराची सांगण्या-शिकविण्याची ढब डोळ्या-मनापुढून जातच न्हाय...


मग म्या घरी गेल्यावर चिमणीम्होरं बसून रात रात जागायचो. आर्ध्या-आर्ध्या भाकरीवर दिवस काढायचो. पुस्तकातल्या माणसाशी बोलत ऱ्हायचो. तीच माणसं मला सांगत्यात असला भास मुद्दाम करून घ्यायचो. त्याची सम्दी सम्दी पडताळणी करून घ्यायचो. आज बाहीर काय चालतंय आन् ह्यात काय हाय. कालचा राजा आजचा राजा, ह्यांचा मेळ घालता घालता खरं-खोटं पटायचं. राग, संताप, चीड यायची. पर पुन्हा वाचीत-टिपणं काढीत र्‍हायचो... कवा आबाला सवड आस्ली तर बोलत, सांगत र्‍हायचो. आबा-माय मयेत आस्ली की मी हळूच बोलायचो,


‘आबा...’


‘का रं?’


‘एक इच्यारू?’


‘इच्यार की.’


‘नगं, तुमी रागावताल...’


‘...पर मला आगुदर कळू तर दी की...’


कधी न्हाय त्ये आबानं पाठीवरून हात फिरवीत जवळ घेतलं.


‘मॅट्रिक हुवस्तर मला कळंबातच ठिवताव का?’


...तसं आबा खीनभर दुमतून बसायचे. आन् कसल्यातरी कातरभरल्या आवाजानं बोलायचे,


‘पोरा... ह्ये मला कळत न्हाय व्हय रं? तू शिकावं, मोठं व्हावं, मामलेदार व्हावं... पर तुला तरी म्या काय सांगू आन् सांगून तरी काय उपेगय?...’


उगचच आबाचं तोंड गहिवरल्यागत दिसायचं. मला आपून उगचच बोललाव वाटायचं. माजं मलाच नंतर कसनुसं वाटायचं... पर खीनभर गप्प राहून त्येच काईतरी काढून बोलायचे. मायीला जवळ बसवून सांगायचे,


‘का गं...’


‘काय?’ माय जवळ टेकायची.


‘ती दुभती म्हैस इकावी मन्तो...’


‘का?’ माय चमकून बघत बोलली.


‘म्हैस काय पुन्हा कवा घेता यील, पर पोराचं ह्ये साल गेलं, तर पुन्हा थोडंच म्हागारी येणार हाय?’


आबाचं बोलणं जडावलं व्हतं. जरासंक आतून-बाहिरून वलसर झालं व्हतं. पण त्यांचं ह्ये बोलणं खिनाभरातच बदलून गेलं. इच्यारात बसून बसून त्यांनीच मुद्दा फिरविला... आता सिक्सनाचं तरी कुठं काय र्‍हायलंय. कुठं नोकर्‍या तरी बोंबलायल्यात. त्यापेक्स्या एका म्हशीला दुसरी म्हैस जोड घ्यावी. दुधाचा रतीब लावावा. न्हाय तर डेरीला घालावं.


उद्याचं काय कुणी बघितलंय. पर ह्या वक्ताला त्यांच्या बोलण्यात यगळीच धार व्हती. नेटका इरादा व्हता. मनून निस्तं आयकून घेतलं. पर बोलता बोलता आबाला काय वाटलं की, तट्वन उठून बसलं. आन् माज्याकडं बघत जवळ सरकत बोलायले,


‘तिला काय कळंतय ह्यातलं? पर बापू, ह्यातलं गणित येगळंच हाय रं... शिकल्यालं वाया जात न्हाय, पर बाजाराची आडचण हाय बघ. तुज्यामुळं मास्तराचं, तुमच्या हास्टेलाचं हामखास गिऱ्हाईक येतंय... झालं तर, एक दुकान वाढेव व्हतंय...’


आबाचं कस्यातूनच मन निघत नव्हतं. एक गरीब पर होतकरू पोर मनून विद्यार्थी-वसतिगृहासाठीचा भाजीपाला मुद्दाम माज्याजवळूनच पोरं नेत होते. तेवढीच इक्री आबाला भरवश्याची वाटत व्हती. पर मला त्या रेक्टरचं बोलणं आयकून लाज वाटायची. उगचच आपल्यावर ‘दया’ व्हतीय वाटायचं. मन खजील व्हायचं. पर काईच इलाज चालत नव्हता. एकांदं साल वाया गेलं तरी काय बिघडतंय? तेवढाच आब्यास पक्का व्हतोय, परपंच्याला बी हातानं हात लागतोय, आसा साधा हिशेब व्हता आबाचा. आन् ह्यो हिशेब त्यांच्या टकुर्‍यात बसला की, बसलाच... पर ह्ये सम्दं मला ठावं व्हतं. पर म्या बी मन लावून नेटून बसत व्हतो. रातीचा दिवस आन् दिवसाची रात करून आब्यास करीत व्हतो. ...पर सोम्मारचा दिवसच माजा घातवार मनून यायचा. माजा सम्दा इलाजच खुटायचा... पाप केलं आन् कुणब्याच्या पोटाला आलो वाटायचं.


आज बाजार सुटायचा वकूत झाला व्हता. माणसं बारीक-मोठी काचकी-बोचकी घिऊन गाववाटंला लागली व्हती. इकनाराची घाई झाली व्हती. आन् गिऱ्हाइकं भाव पाडून मागत व्हती. ‘माल’ द्यावा तरी पंच्याईत आन् न्हाई द्यावा तर उकिरड्याचीच भरती व्हणार व्हती... चार रुपयाचं चऱ्हाट दामू मांग तीन रुपयाला सांगत व्हता. आन् दोन रुपयाचा पावसेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला व्हता. माणसं घाई करीत हिंडत व्हती. गाववढीनं पाय उचलीत व्हती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरून गिर्‍हाईकच नव्हतं. ‘नगं-व्हय’ करता करता दोन डालीतून एकच डाल आर्दी-निम्मी इकली व्हती. आन् एक तशीच न फुटता पडून व्हती. ह्या महिन्यात टमाट्यांनी चांगलाच मार खाल्ला व्हता. पीकच अव्वाच्या सव्वा पिकलं व्हतं. सम्दा बाजारच्या बाजार लालेलाल दिसत व्हता. भाव करताना आताडी पिळत व्हती. माप करताना काळीज थरथरत होतं. अन् माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत व्हती. दोन रुपये किलुवरून आबा रुपया किलू मनून आरडत व्हतं. आन् माप टाकल्यावर तोंड कसनुसं करून दीड-सव्वासाठी आठोव करीत व्हतं. ...मपल्या गवारीच्या शेंगा दोनेक किलू उरल्या व्हत्या. मायीचं कांदं संपलं व्हतं. आन् ती आबाची चिकाटी बसून बघत होती. मधी काईच बोलायचा तिचा लाग नव्हता, मनून ती निस्ती गालाला हात लावून बघत व्हती.


...बाजार आता चांगलाच फाकला व्हता. दुकानं हालली व्हती. माणसानं माणसं पांगली व्हती. पर आबाचा घसा चिरकतच व्हता...


‘चला, चला. बारा आणे, बारा आणे किलोऽऽ घ्याऽऽऽ खाऽऽ लाललाल टमाटीऽऽ’


पर माणसं निस्तच चालता चालता बघायची. आबाचा आवतार बघून पुढं व्हत हासायची. आन् आबा चिडीला आल्यावानी मुद्दाम उभं र्‍हाऊन ऱ्हाऊन आरडायचं,


‘चला. बारा आण्याची आठ आणे-आठ आणेऽऽ झालीऽऽ झालीऽऽ घ्या घ्या.’


तरी बी गिऱ्हाईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत नव्हतं.


आन् दिवस मावळून आंधारून यायलं. बाजार सुनासुना झाला. पण आबाला ह्याचं भानच ऱ्हायलं नव्हतं...हातात तागडं धरून उभा र्‍हात आबा आरडत व्हतं... किरुळ्या ठोकून आरडत, हाका मारीत चिरकायलं. आन् न र्‍हाऊन एक गिऱ्हाईक जवळ आलं.


‘काय सांगितलं?’ गिऱ्हायकानं नवी डाल उघडली. एक-दोन टमाटी चाचपून बघितली.


‘आठ आणे किलू.’ आबाचा तसलाच तार लावलेला आवाज.


गिऱ्हाईकानं चार-दोन टमाटी हातात घेतली.


‘पर... घ्यायचं काय?’ गिऱ्हायकानं खिसं चाचपून बघितलं. तसं चिडलेलं आबा ठिसरल्यागत झालं.


‘घ्यायचं मंजी...?’


‘सांगणं आठ आण्याचं, पर आखरीला किती घ्यायचं?’


आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशिलं बघता बघता तापली. व्हट थरारल्यागत झालं. पर राग आवरून आबानं इच्यारलं.


‘पावनं, किती घ्यायचीत?’


‘सिस्ताईनं सांगितलं, तर पावशेर घेतली आस्ती...’


असं मनून त्यानं चार-दोन मोठी मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली. आन् पिसवी धरीत त्ये गिऱ्हाईक बोललं.


‘चार आणे किलोनं धरा...’


‘काय?’


आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. सम्दं आंगच थरारलं. आन् कडाड्कन आबा गरजलं...


‘ये हायवानाऽ जिभीला हाड बसवून घे! चल ऊठ, पळ हितून...’


तसं त्यो माणूस तट्वन उठला. आन् काईतरी बुटबुटत म्हागं सरकत निघून गेला...


आबा भुसा भरल्यागत ताठच्या ताठच उभं व्हतं. चेहरा तापला व्हता. आन् डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या व्हत्या.


‘...चार आणे किलो... ईस पैस्या किलो... धा पैस्या, पाच पैस्या... आरं फुकट घ्या की मनावं...’


आन् एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचविल्या. लालेलाल टमाट्याचा, टचटचीत टमाट्याच्या गुडघ्याएवढा रसरसीत ढीग झाला. आन् आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. कचाकचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला.

आबा लालेलाल चिखलात कवरच्या कवर नाचतच व्हता...


लेखक - भास्कर चंदनशिव

उठा,उठा बिगीबिगी 

झुंजुमुंजू झालं 

प्राचीवरी सूर्यबिंब 

उदयासी आलं ll


दिवाळीच्या पहाटेला 

उटण्याचा गंध 

आसमंत आनंदात 

झाला कसा धुंद ll


आली आली दीपवाळी 

जोश नवा कोरा 

ऊन ऊन धार आता 

माथ्यावरी धरा ll


स्नान होता परिधान 

नवी कोरी वस्त्रे 

उजळून टाका पुन्हा 

चैतन्याची अस्त्रे ll


झटकून निराशेला 

उत्साहाचे गाणे 

म्हणा आणि दर्शनाला 

राऊळात जाणे ll


फराळाला सारेजण 

एकत्रित बसा 

वाटुनिया आनंदाला 

आनंदाने हसा ll


शुभ दीपावली !!!


- AK ( काव्यानंद ) मराठे

डॉलर हे जगातील सर्वात मजबूत चलन का मानले जाते?

एक काळ असा होता की एक अमेरिकन डॉलर फक्त ४.१६ रुपयांना विकत घेता येत होता, पण त्यानंतर वर्षानुवर्षे डॉलर रुपयाच्या तुलनेत महाग होत चालला आहे, म्हणजे एक डॉलर खरेदी करण्यासाठी आणखी डॉलर्स खर्च करावे लागतील. माहिती आहे की १ जानेवारी २०१८ रोजी एका डॉलरचे मूल्य ६३.८८रुपये होते आणि १८ फेब्रुवारी २०२० रोजी ते ७१.३९ रुपये झाले. डॉलर हे जगातील सर्वात मजबूत चलन का मानले जाते?

८५% जागतिक व्यापार अमेरिकन डॉलरच्या मदतीने केला जातो. जगातील ३९% कर्ज यूएस डॉलरमध्ये वित्तपुरवठा केला जातो आणि एकूण डॉलर मूल्यापैकी ६५% यूएस बाहेर वापरला जातो. त्यामुळे परदेशी बँका आणि देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरची गरज असते.  


जागतिकीकरणानंतर अमेरिकन डॉलरला रशिया व चीन कडून आव्हान दिले जात आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या कझान येथील ब्रिक्स शिखर परिषदेत डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान दिल्यावर चर्चा झाली. ब्रिक्स देशांनी एक ब्रिक्स चलन तयार करण्यावर चर्चा केली . ब्रिक्स देशांना डॉलरच्या वर्चस्वाशी स्पर्धा करू शकेल असे चलन सुरू करायचे आहे. गेल्या काही वर्षात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ब्रिक्स चलनाबद्दल उघडपणे बोलले आहेत.यावर मतैक्य होवू शकले नसले तरी ब्रिक्स चालना वर विचारमंतर होवू लागलेले आहेत.

या आधी देखील

डॉलरला चिनी आणि रशियन आव्हान देण्यात आले होते.मार्च २००९ मध्ये चीन आणि रशियाने नवीन जागतिक चलनाची मागणी केली. त्याला जगासाठी 'कोणत्याही एका देशापासून स्वतंत्र आणि दीर्घकाळ स्थिर राहण्यास सक्षम' असे राखीव चलन तयार करायचे आहे.या कारणास्तव, चीनला त्याचे चलन “युआन” हे जागतिक परकीय चलन बाजारात व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरायचे आहे. म्हणजेच चीनला युआन हे अमेरिकन डॉलरचे जागतिक चलन म्हणून वापरलेले पाहायचे आहे. उल्लेखनीय आहे की १ ऑक्टोबर २०१६ रोजी चीनचे चलन युआन हे IMF च्या SDR बास्केटमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. डॉलरला आव्हान दिले जात असले तरी जागतिक व्यापार आज डॉलर मध्येच होतो. की डॉलर हे जगातील सर्वात मजबूत चलन का म्हणून ओळखले जाते?आता परिस्थिती अशी झाली आहे की, डॉलरचे नाव घेतले की लोकांच्या मनात फक्त अमेरिकन डॉलर येतो, तर जगातील अनेक देशांच्या चलनाचे नावही 'डॉलर' आहे. म्हणजेच, यूएस डॉलर हा "जागतिक डॉलर" चा समानार्थी शब्द बनला आहे.


डॉलरच्या मजबुतीचा इतिहास

१९४४ मध्ये ब्रेटन वुड्स करारानंतर डॉलरची सध्याची ताकद सुरू झाली. त्याआधी, बहुतेक देशांनी फक्त सोन्यालाच चांगले मानक मानले होते. त्या देशांच्या सरकारांनी सोन्याच्या मागणी मूल्याच्या आधारे त्यांचे चलन निश्चित करतील असे आश्वासन दिले.न्यू हॅम्पशायर येथील ब्रेटन वूड्स येथे जगातील विकसित देशांची बैठक झाली आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सर्व चलनांचे विनिमय दर निश्चित केले. त्यावेळी अमेरिकेकडे जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा होता. या करारामुळे इतर देशांना त्यांचे चलन सोन्याऐवजी डॉलरमध्ये पाठवण्याची परवानगीही मिळाली.


१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला अनेक देशांनी महागाईशी लढण्यासाठी डॉलरच्या बदल्यात सोन्याची मागणी करण्यास सुरुवात केली. हे देश अमेरिकेला डॉलर द्यायचे आणि त्या बदल्यात सोने घेत. जेव्हा हे घडले तेव्हा अमेरिकेतील सोन्याचा साठा कमी होऊ लागला. त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी सोन्याचे सर्व साठे संपुष्टात आणण्याऐवजी डॉलरला सोन्यापासून वेगळे केले, त्यामुळे डॉलर आणि सोने यांच्यातील विनिमय दर करार आणि चलनांचे विनिमय मूल्य संपुष्टात आले; मागणी आणि पुरवठ्याच्या जोरावर ते होऊ लागले.


डॉलर हे सर्वात मजबूत चलन का आहे याची खालील कारणे आहेत

१) इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या यादीनुसार, जगभरात एकूण १८५ चलने आहेत. तथापि, यापैकी बहुतेक चलने त्यांच्या स्वतःच्या देशात वापरली जातात.जगभरात कोणतेही चलन किती प्रमाणात प्रचलित आहे हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि ताकदीवर अवलंबून असते. साहजिकच डॉलरची ताकद आणि त्याची स्वीकारार्हता अमेरिकन अर्थव्यवस्थेची ताकद दर्शवते.

२)८५% जागतिक व्यापार अमेरिकन डॉलरच्या मदतीने केला जातो. जगातील 39% कर्ज यूएस डॉलरमध्ये आहे आणि एकूण डॉलर मूल्यापैकी ६५% यूएस बाहेर वापरले जाते. त्यामुळे परदेशी बँका आणि देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरची गरज असते.

३)सदस्य देशांना जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये देशांच्या कोट्यातील काही भाग अमेरिकन डॉलर्सच्या स्वरूपात जमा करावा लागतो.

४) जगभरातील मध्यवर्ती बँकांमध्ये असलेल्या परकीय चलनाच्या साठ्यापैकी ६४% यूएस डॉलर्स आहेत.

५)जरी दोन बिगर यूएस देश एकमेकांशी व्यापार करत असले तरी ते पेमेंट म्हणून यूएस डॉलर घेण्यास प्राधान्य देतात कारण त्यांना माहित आहे की त्यांच्या हातात डॉलर्स असतील तर ते त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू इतर कोणत्याही देशातून आयात करू शकतील.

६)अमेरिकन डॉलरच्या विनिमय दरात फारशी चढ-उतार होत नाही, त्यामुळे देश लगेचच हे चलन स्वीकारतात.

७)अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे ज्यामुळे ती अनेक गरीब देशांना अमेरिकन डॉलरमध्ये कर्ज देते आणि कर्जाची वसुलीही त्याच चलनात होते त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरला नेहमीच मागणी असते.

८)जागतिक बँक गट आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या तिजोरीत अमेरिका सर्वात जास्त योगदान देते, म्हणून या संस्था सदस्य देशांना फक्त यूएस डॉलरमध्ये कर्ज देतात. जे डॉलरचे मूल्य वाढवण्यास उपयुक्त आहे.


डॉलरनंतर जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली चलन म्हणजे युरो, ज्याचा जगभरातील केंद्रीय बँकांच्या परकीय चलनाच्या साठ्यापैकी २०% वाटा आहे. युरो हे जगभर पेमेंटचे साधन म्हणूनही सहज स्वीकारले जाते. जगातील अनेक क्षेत्रात युरोचे वर्चस्व आहे. युरो देखील मजबूत आहे कारण युरोपियन युनियन जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. काही अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की नजीकच्या भविष्यात युरो डॉलरची जागा घेऊ शकेल.


- प्रा डॉ सुधीर अग्रवाल

मानवी जीवनाला उजाळा देणारी दिवाळी

मूळात यक्षरात्रि या नावाने ओळखला जाणारा हा सण काळाच्या प्रवाहात अनेक कथा उपकथांशी जोडला गेला आणि त्यातून हा सण साजरा करण्याची पद्धत बदलत गेली. सण साजरा करण्याच्या वेळोवेळी बदलणाऱ्या पध्दतीनुसार सुखरात्रि, सुखसुप्तिका, दीपप्रतिपदोत्सव, दिपालिका असे करीत करीत या सणाला दीपावली हे नाव प्राप्त झाले. सामान्य बोलीभाषेत या दीपावलीलाच दिवाळी असं म्हटलं जातं. दीपावलीशी जोडली गेलेली सर्व कथानके आणि उपकथानके व त्यातला इतिहास पाहिला असता दीपावली हा प्रकाशाचा सण आहे हे स्पष्ट होते. अज्ञान, असत्य आणि अन्यायावर मिळवलेला विजय हा सर्वार्थाने अंधारावर मिळवलेला विजय आहे. अंधारावर विजय मिळवून प्राप्त झालेले ज्ञान, सत्य आणि न्यायाचा प्रकाश सर्वदूर पसरावे यासाठीच आपण हा सण साजरा करतो. 


सांप्रतकाळी दिवाळीचा सण साजरा करताना कुणाला या इतिहासाचे भान राहिलेले नसले तरी दिवाळीतले दिवे मात्र आपण अजुनही टिकवून ठेवले आहेत. हेही नसे थोडके असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे. बदलत्या काळात दिवाळी हा एक व्यापारी स्वरूपाचा सण झाला आहे. दिवाळीशी सर्व प्रकारचा व्यापार जोडला गेला आहे. प्रत्येक दिवाळीच्या दिवसांत सर्व प्रकारचा व्यापार मोठ्या तेजीत असतो. म्हणुनच कदाचित व्यापाऱ्यांच्या तेजीला मोठा हातभार लावणारा हा दिवाळसण अनेकदा सामान्यांचं दिवाळं काढणारा ठरतो. 


असं असलं तरी सलग पाच दिवस चालणारा एकमेव सण म्हणून दिवाळीच्या सणाचं विशेष महत्त्व आहे. अश्विन कृष्ण एकादशी अर्थात रमा एकादशीपासून हा सण सुरु होतो. दुसऱ्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. या दिवसाला गोवत्सद्वादशी असेही म्हणतात. भारतहा कृषिप्रधान देश असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने अशी सवत्स धेनूची पूजा केली जाते. ज्यांच्या घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालतात. 

त्यानंतरच्या दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या सणाशी काही कथानके जोडलेली आहेत. त्यापैकी एका कथानकानुसार हेमराजाचा पुत्र त्याच्याशी संबंधित कथित भविष्यवाणीप्रमाणे त्याच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राला जीवनातली सर्व सुखे उपभोगता यावीत म्हणून राजा-राणी त्याचे लग्न लावतात. लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी रात्री राजपुत्राचा मृत्यू होणार असल्याने त्या दिवशी रात्री त्या राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून ठेवले जाते. संपूर्ण महालात मोठमोठे दिवे लावून लख्ख प्रकाश निर्माण केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून राजपुत्राची पत्‍नी त्याला जागे ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा यम राजपुत्राच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करतो तेव्हा सोने-चांदी आणि दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने त्याचे डोळे दिपतात. अखेर यम आपल्या यमलोकात परत निघून जातो आणि राज पुगाचा प्राण वाचतो. याच आख्यायिकेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर वातीचे टोक दक्षिण दिशेस असलेला दिवा लावून त्या दिव्यास मनोभावे नमस्कार करतात. यालाच यमदीपदान असे म्हणतात. असे दीपदान केल्याने अपमृत्यू टळतो अशी मान्यता आहे.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता देवेंद्राने असूरांच्या सोबतीने समुद्रमंथन केले, त्यावेळी त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली.तसाच एक अमृतकुंभ घेऊन धन्वंतरीही प्रकट झाला. या धन्वंतरीची पूजा याच दिवशी केली जाते. धन्वंतरी हा एक वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे मानले जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरीजयंतीचा असल्याने वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानले जाते. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.

जैनधर्मीय लोक या दिवसाला 'धन्य तेरस' किंवा 'ध्यान तेरस' असे म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ध्यानातून  योगनिद्रेत गेले आणि तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर दिवाळीच्या दिवशी त्यांचे निर्वाण झाले. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.


त्यानंतरचा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. यासंबंधी नरकासुराच्या वधाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेत त्याचा कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला होता. त्यानंतर त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्यांच्या राज्यांतील हजारो स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून मणिपर्वतावर त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अशा लालसेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानव  समाजाला अत्यंत तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्रागज्योतिषपूर या त्याच्या राजधानीवर श्रीकृष्णाने चाल केली. त्यानेने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करीत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला खूप आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील हजारो स्त्रियांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या १६,१०० स्त्रियांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करावे त्यामुळे आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागचा संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाने मर्दन करून, सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेल्या या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. या दिवशी पहाटे आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या घरातल्या स्वच्छतागृहात यमासाठी दिवा लावण्याची प्रथा आहे.


आश्विन अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असते असा समज असल्यामुळे ही लक्ष्मी आपल्या घरी स्थिर रहावी म्हणून हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन स्थिर लग्न मुहूर्तावर केले जाते. याप्रसंगी अनेक घरांत श्रीसूक्ताचे पठण केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष या लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्वजण अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून तिची पूजा करतात. या केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्रय दूर होते असे मानले जाते.


प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची पद्धत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. पुढे कुबेराच्या जागी गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली. सांप्रतकाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता ही दोन महत्त्वाची मूल्ये मानवी मनात रुजावीत हा या पूजेचा खरा हेतू असावा असे म्हणता येईल. 


कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो.

या दिवशी बळी राजाची पूजा करुन 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हटले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू केल्या जातात. या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. 

या दिवशी पत्‍नी आपल्या पतीचे औक्षण करते व पती आपल्या पत्‍नीला ओवाळणी देतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. त्यानिमित्त जावयास आहेर केला जातो.


कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमीच्या घरी जेवायला गेला होता अशी एक आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. बंधु-भगिनींसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो. 


अशा रितीने सलग सात दिवस चालणारा दिवाळीचा सण हा सर्व सणांचा राजा आहे असं मानून हा सण राजेशाही थाटातच साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की, आकाशकंदील, दिव्यांच्या माळा, तेला-तुपाचे दिवे,  रंगीबेरंगी रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची रेलचेल, गोडाधोडाचे फराळ, दिवाळी निमित्त एकमेकांना शुभेच्छा देणारी भेटकार्डे, मिठाईचे पुडे हे सगळं मोठ्या आनंदानं केलं जातं. दिवाळीच्या दिवसांत सुरु झालेले नात्यांमधले  काही रुसवे-फुगवे दिवाळीतच निकाली निघतात. त्यातून नात्यांनाही उजाळा मिळतो. 


लेखक 

अनिल उदावंत

 ही लंडनमध्ये 2015 मध्ये घडलेली सत्य घटना आहे....

लंडनमध्ये एक उच्चभ्रू, श्रीमंत कुटुंबीय सहलीला गेलेलं असताना त्यांच्या घरात जबरी चोरी होते. CCTV च्या फुटेजचा आधार आणि कुटुंबाशी संबंधित इतर सर्वांची माहिती घेऊन पोलिस काही संशयित तरुणांना पकडून आणतात. परंतु CCTV फुटेज मध्ये चोरांनी चेहरा घट्ट झाकला असल्याने पोलिसांना त्यांना ओळखणं अवघड जात होतं. त्याच वेळी त्यांना एक खबर मिळते की लंडनमध्ये एक भारतीय युवक आहे तो या कामी तुम्हाला मदत करु शकेल. हे समजताच पोलीस त्या युवकाला पाचारण करतात आणि CCTV फुटेज पाहून संशियत ओळखायला त्याची मदत मागतात. तो तरूण आपल्या लौकिकास जागतो आणि काही वेळातच ते फुटेज पाहून त्या संशियातांमधील नक्की चोर कोण आहे हे ओळखतो. पुढे अर्थात पोलीस त्या चोराची लीगल ट्रायल घेऊन, त्याच्या घराची तपासणी करून मुद्देमाला सकट ही केस सोडवतात.

पुढे यथावकाश त्या चोराला शिक्षा होते आणि आपल्या घरातला मुद्देमाल परत मिळाला म्हणून त्या श्रीमंत कुटुंबियांतर्फे एक पार्टी आयोजित केली जाते. त्यामध्ये चोर ओळखणाऱ्या त्या तरुणालासुद्धा आंमत्रित केलं जातं आणि त्याला सर्व जण विचारतात की, "तुझे आम्ही अत्यंत आभारी आहोत, तुझ्यामुळेच आमची चोरी पकडली गेली. पण हे एक प्रश्न आहे, त्या चोरांनी इतकं घट्ट तोंडाला बांधलं होतं. अक्षरशः पोलिस सुद्धा CCTV फुटेज पाहून ओळखू शकले नाहीत. पण तू हे कसं काय ओळखू शकलास ?"

यावर अत्यंत विनम्रपणे तो मुलगा उत्तर देतो, "ॲक्चुअली माझं नाव विनय आहे. माझा जन्म पुण्यातला. तिथे आम्ही लहानपणापासून मुलींना स्कार्फमध्येच पाहतो. हळू हळू वाढत्या वयाबरोबर हे स्कार्फ प्रकरण मनात इतकं घट्ट रुजत जातं की आम्ही कोणी कितीही घट्ट स्कार्फ बांधला असला तरीही त्या मुलीला आम्ही सहज ओळखू शकतो इतका आमचा खोल अभ्यास होतो. कारण जगाच्या पाठीवर आमचं पुणे हे एकमात्र शहर असं आहे की जिथे ऋतु कोणताही असला तरीही "स्कार्फ" बांधणं हे सक्तीचं असतं....!!!!"😜

आपण दुःखी का होतो.....?


एकदा शिक्षिकेंनी तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो आणावयास सांगितले.


*प्रत्येक टोमॅटोवर त्या मुलांनी,ते ज्या व्यक्तीचा द्वेष करत असतील त्याचे नांव लिहून आणावयाचे होते.*


अशा रीतीने जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टोमॅटो त्यांनी आणावयाचे होते.


*ठरलेल्या दिवशी सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टोमॅटो आणले.*


काहींनी दोन,काहींनी तीन, काहींनी पाच तर काहींनी वीस टोमॅटो ते द्वेष करीत असलेल्या संख्येबरहुकूम आणले.


शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की,*त्यांना ते टोमॅटो ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत.*


*जसजसे दिवस उलटू लागले, तसतसे मुले टोमॅटोंच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले.*


ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टोमॅटो होते त्यांनी तक्रार केली की,त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारच सुटलेला आहे.


आठवड्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला,*"तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले?"*


मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टोमॅटोंच्या जडपणाबद्दल तक्रारी केल्या.विशेषत: ज्यांनी अनेक टोमॅटो आणले होते.


शिक्षिका म्हणाल्या,*"हे अगदी तुम्ही,आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे."*


द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता.


"जर तुम्ही टोमॅटोंचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल तर कल्पना करा, तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्या अंत:करणावर किती परिणाम होत असेल!"


आपल्या दुःखाचे कारण हेच आहे नको त्या वाईट गोष्टी मनात साठवून ठेवतो.*

 *तुचमं मठारी चांलगं अलेस तर तुलाम्हा हा मेजेस वातचा येलीअ.*


साराधणपे आणप

प्रक्येत अरक्ष बाकराईने

वातच नतसो.

त्या ऐजवी आलप्याला

अरक्षांचा सहूम चित्र

म्हनूण दितस अतसो.

त्यारवून आणप थर्अ

सजमून तोघे.


तुम्ही वलीर मेजेस

कुहेठी न अखडतळा

सळगा वालचा अलेस

तर तुचमं अनिभंनद

कारण

तुम्ही शुध्द मराठी आतहा

देवाचे गणित

एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते. थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला.


थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे, त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती.


पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे ३ भाकर्‍या आहेत, दुसरा म्हणाला माझ्याकडे ५ भाकर्‍या आहेत, आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ.


आता प्रश्न आला कि ८ (३+५) भाकर्‍या तिघांमध्ये कशा वाटायच्या ? पहिल्या माणसाने सुचविले कि प्रत्येक भाकरीचे ३ तुकडे करुया, अर्थात ८ भाकर्‍यांचे २४ (८ x ३) तुकडे होतील आणि आपल्या तिघात ८ - ८ तुकडे समसमान वाटले जातील.


बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि ८ भाकर्‍यांचे २४ तुकडे करुन प्रत्येकाने ८ - ८ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले.


सकाळी उठल्यावर तिसर्‍या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या ८ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना ८ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला.


तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे ४ - ४ मुद्रा वाटून घेऊ. पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या ३ भाकर्‍या होत्या आणि तुमच्या ५ भाकर्‍या होत्या, म्हणून मी ३ मुद्रा घेईन आणि तुम्ही ५ मुद्रा घेतल्या पाहिजेत.


यावर दोघांची वादावादी चालू झाली. यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजार्‍याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडविण्याची प्रार्थना केली.


हे दोघेही दुसर्‍याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारीपण चक्रावून गेला. त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या, मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन.


पुजार्‍याला खरेतर दुसऱ्या माणसाने सांगितलेली ३ - ५ ची वाटणी ठीक वाटत होती, पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता. विचार करता करता त्याला गाढ झोप लागली.


थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला, तेव्हा पुजार्‍याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. माझ्या दृष्टीने ३ - ५ अशी वाटणीच उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले.

देवाने स्मित करुन म्हटले, "नाही, पहिल्या माणसाला १ मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला ७ मुद्रा मिळाल्या पाहिजेत."

देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकीत झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले, "प्रभू, असं कसं ?"

देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला:

यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या ३ भाकर्‍यांचे ९ तुकडे केले, परंतु त्या ९ पैकी त्याने फक्त १ वाटला आणि ८ तुकडे स्वतः खाल्ले. म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त १ तुकडा एव्हढाच होता. म्हणून तो फक्त १ मुद्रेचा हक्कदार आहे. दुसऱ्या माणसाने आपल्या ५ भाकर्‍यांचे १५ तुकडे केले, ज्यातले त्याने स्वतः ८ तुकडे खाल्ले आणि ७ तुकडे वाटून दिले. म्हणून न्यायधर्मानुसार तो ७ मुद्रांचा हक्कदार आहे.. हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे.

देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला.


🙏🏻😊

नफा - नुकसान

विनोद गाडी चालवत होता. त्याला रस्त्याच्या कडेला एक १२-१३ वर्षांची मुलगी टरबूज विकताना दिसली. विनोदने गाडी थांबवली आणि विचारले, “बेटा, टरबूजाची किंमत काय आहे?”

मुलगी म्हणाली "50 रुपये किमतीचे टरबूज आहे सर..."

मागच्या सीटवर बसलेल्या विनोदची बायको म्हणाली 

"एवढे महागडे टरबूज घेऊ नकोस... चल इथून..."

विनोद म्हणाला, “कुठे महाग आहे… त्याच्याकडे असलेले एकही टरबूज पाच किलोपेक्षा कमी नसेल.

जर तुम्ही एक ५० रुपयांना देत असेल, तर ते आम्हाला १० रुपये किलो लागेल... बाजारातून २० रुपये किलोनेही मिळते..."ते तू विकत घेऊन येते.

विनोदची बायको म्हणाली, "तूम्ही थांबा, मला किंमत (सौदा) करू द्या..."


मग ती मुलीला म्हणाली 

"तुम्हाला तीस रुपये द्यायचे असतील तर दे, नाहीतर राहू दे..." 


मुलगी म्हणाली, "आंटी, मी 40 रुपयांना टरबूज खरेदी केलेत. तुम्ही 45 रुपयांना खरेदी करा..मी तुम्हाला यापेक्षा स्वस्त देऊ शकणार नाही..."


विनोदच्या पत्नीने म्हणाली.

"खोटं बोलू नकोस बेटा... योग्य दर सांग.


बघ, हा तुझा धाकटा भाऊ आहे ना? या कारणासाठी ते थोडे स्वस्त कर.." 


खिडकीतून डोकावणाऱ्या आपल्या चार वर्षांच्या मुलाकडे बोट दाखवत ती म्हणाली..


सुंदर मुलाला पाहून, मुलगी तिच्या हातात एक टरबूज उचलून कारच्या जवळ आली. मग त्या मुलाच्या गालाला हात लावत म्हणाली‌.


"खरंच माझा भाऊ खूप देखणा आहे आंटी..."


विनोदची बायको मुलाला म्हणाली, "बहिणीला नमस्कार कर बेटा..."


मुलाने प्रेमाने म्हटले, "नमस्कार दीदी..."


मुलीने गाडीची खिडकी उघडली आणि मुलाला बाहेर काढले आणि मग म्हणाली

"तुझे नाव काय भाऊ?"


मुलगा म्हणाला, "माझे नाव गोलू आहे, दीदी..." 


आपल्या मुलाला बाहेर काढल्यामुळे विनोदची बायको थोडी अस्वस्थ झाली... ती लगेच म्हणाली, "अरे बेटा, त्याला आत परत पाठव.. त्याला धुळीची ऍलर्जी आहे..."


मुलगी त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून मुलाशी बोलली 

"तू खरंच गुबगुबीत भाऊ आहेस... टरबूज खाशील का?"


मुलाने होकार दिल्यावर मुलीने त्याला टरबूज दिले.


गोलूला पाच किलो टरबूज सांभाळता आले नाही..टरबूज निसटला आणि हातातून खाली पडला आणि त्याचे तीन-चार तुकडे झाले… टरबूज पडून तुटल्याने मुलगा रडू लागला…


मुलगी त्याला सांभाळत म्हणाली... 

"अरे भाऊ, रडू नकोस... मी अजून एक घेऊन येते..."


मग तिने धावत जाऊन दुसरे मोठे टरबूज उचलले...


तिने टरबूज उचलले तोपर्यंत विनोदच्या पत्नीने मुलाला गाडीच्या आत ओढले आणि खिडकी बंद केली...


मुलीने उघड्या ग्लासमधून टरबूज आत दिले आणि म्हणाली, "हे घे भाऊ, खूप गोड निघेल." 


विनोद शांत बसून त्या मुलीची कृती पाहत होता...


विनोदची पत्नी म्हणाली 

"जे टरबूज फुटले त्याचे पैसे मी देणार नाही... तुझ्या चुकीमुळे फुटले..."


मुलगी हसत म्हणाली," सोडा काकू... या टरबूजचे पैसेही देऊ नका... मी माझ्या भावासाठी दिले आहे..."


हे ऐकून विनोद आणि त्याची पत्नी दोघेही हतबल झाले.


विनोद म्हणाला, "नाही मुलगी, तुझ्या दोन्ही टरबुजाचे पैसे घे..."


मग त्याने 100 रुपयांची नोट त्या मुलीकडे दिली.. मुलीने हाताच्या इशाऱ्याने नकार दिला आणि तिथून निघून गेली… आणि तिच्या उरलेल्या टरबुजाजवळ जाऊन उभी राहिली…


गाडीतून उतरल्यावर विनोदही तिथे आला होता… येताच तो म्हणाला… 

"पैसे घे बेटा नाहीतर तुझे मोठे नुकसान होईल..." 


मुलगी म्हणाली 

"आई म्हणते नात्याचा विचार केला तर नफा-तोट्यात फरक नसतो..तू गोलूला माझा भाऊ म्हटल्यावर मला खूप बरं वाटलं... माझाही एक लहान भाऊ होता पण.."


विनोद म्हणाला, "काय झालं तुझ्या भावाला?"


ती म्हणाली...'

"जेव्हा तो दोन वर्षांचा होता, त्याला रात्री ताप आला होता... माझी आई त्याला सकाळी दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला... मला माझ्या भावाची खूप आठवण येते.


त्याच्या एक वर्ष आधी वडिलांचेही असेच आम्हाला सोडून निधन झाले होते...”


विनोदची पत्नी म्हणाली...

"घे मुली घे, तुझे पैसे घे..."

मुलगी म्हणाली, "मी पैसे घेणार नाही काकू..."

विनोदची बायको गाडीपाशी गेली आणि मग तिच्या पिशवीतून पायलची जोडी काढली... जी तिने आज तिच्या आठ वर्षांच्या मुलीसाठी तीन हजार रुपयांना विकत घेतली होती... मुलीला देताना ती म्हणाली.


"तुम्ही गोलूला तुमचा भाऊ मानलात, तर मी तुझ्या आई सारखे झाले.आता तु हे घेण्यास नकार देऊ शकत नाही..."


मुलीने हात पुढे केला नाही तेव्हा त्याने बळजबरीने मुलीच्या मांडीवर पायल घातला आणि म्हणाली .


"हे ठेव...जेव्हाही घालशील तेव्हा आम्हा सगळ्यांची आठवण येईल..."


असं म्हणत ती परत निघून गाडीत बसली...


मग विनोदने गाडी सुरू केली आणि मुलीला बाय म्हणत ते निघून गेले.


विनोद गाडी चालवताना विचार करत होता की भावनिकता म्हणजे काय...काही वेळापूर्वी त्याची बायको रु.10-20 वाचवण्यासाठी युक्त्या अवलंबत होती...थोड्याच वेळात ती इतकी बदलली की तिने रु.3000 किमतीची पायल दिली. .


तेव्हा अचानक विनोदला त्या मुलीची एक गोष्ट आठवली. 


*"नात्यात नफा आणि तोटा पाहिला जात नाही."*


विनोद हा त्याच्याच मोठ्या भावाविरुद्ध मालमत्तेच्या वादातून न्यायालयात खटला चालवत होता.


त्याने लगेच मोठ्या भावाला फोन केला... फोन उचलताच तो म्हणाला, "भाऊ, मी विनोद..."


भाऊ म्हणाला, "का फोन केलास?"


विनोद म्हणाला 

"भाऊ, तुम्ही ते मुख्य बाजाराचे दुकान घ्या... माझ्यासाठी ते मार्केटमध्ये सोडा.


आणि तुम्ही तो मोठा प्लॉट पण घ्या...मी लहान घेईन.


मी उद्याच केस मागे घेत आहे..." 

बराच वेळ समोरून आवाज आला नाही...


तेव्हा त्याचा मोठा भाऊ म्हणाला, "यामुळे तुझे खूप नुकसान होईल, विनोद..."


विनोद म्हणाला...

"भाऊ, आज मला समजले की नात्यात नफा-तोटा नसतो एकमेकांचा आनंद बघता येतो...तेथून पुन्हा एकदा शांतता पसरली होती.

तेवढ्यात विनोदला त्याच्या मोठ्या भावाचा रडण्याचा आवाज ऐकू आला...

विनोद म्हणाला "रडतोस का भाऊ?" 

मोठा भाऊ म्हणाला, "तुम्ही आधी इतके प्रेमाने बोलला असता तर मी तुला सर्व काही दिले असते.

आता घरी चल... तुम्ही दोघेही प्रेमाने एकत्र बसून वाटून घेऊ..."

काही गोड शब्द उच्चारताच इतका कडवटपणा कुठे गेला कळलेच नाही...जे काल एक-एक इंच जमिनीसाठी लढत होते, ते आज आपल्या भावाला सर्वस्व द्यायला तयार आहेत...

 “हॅलो, ABC ट्रॅव्हल्स का?”

“होय साहेब, काय काम होतं?”

“ग्रीसला नेता का सहली तुम्ही?”

“हो, नेतो की!”

“कुठेकुठे नेता ग्रीसमध्ये?”

“तुम्ही म्हणाल तिथे नेतो साहेब. तुमची सोय, तुमचा वेळ आणि तुमचं बजेट यात बसतील असे खूप ऑप्शन आहेत आपल्याकडे साहेब!”

“तरी चारपाच प्रसिद्ध ठिकाणांची नावं सांगाल?”

“सांगतो की! अथेन्स, कोरफू, थेसालोनिकी,मेटेओरा, मिकोनॉस,सांटोरिनी…”

“थांबा थांबा. मिकोनॉस फिट बसतंय.”

“मस्त चॉईस आहे तुमचा साहेब. कधीची तिकिटं हवी आहेत तुम्हाला?

“तिकिटं? छे छे. जायचे नाहीये काही मला कुठे…”

“मग फोन कशाला केला होतात?”

“शब्दकोड्यात शब्द अडला होता. ग्रीसमधील प्रसिद्ध ठिकाण. चार अक्षरी. मी पासून सुरू होणारं……”

स्पाॅंडीलायसिस चा त्रास

 डाॅक्टर : या पुर्वी तुम्हाला स्पाॅंडीलायसिस चा त्रास झाला होता का?

मी : हो खुप पुर्वी.... 

डाॅक्टर : कधी ?

मी : शाळेत सरांनी स्पाॅंडीलायसिस चे स्पेलिंग विचारले होते तेव्हा.....

😄😄🤣😅

सिगरेटची सवय

 पती संध्याकाळी खूप उदास चेहरा करून घरी येतो.

पत्नी :- काय झाले?

पती :- आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग खाली कोसळली.

पत्नी :- मग तुम्ही कसे वाचले?

पती :- मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो.

पत्नी :- नशिब चांगले तुमचे. थॅन्क्स गाॅड.

थोड्या वेळाने टीव्हीवर बातमी येते की, सरकारने मरण पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला १-१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नी रागात - काय मेली ही तुमची सिगारेट ओडण्याची सवय कधी सुटणार देव जाणे.

पोलीस साहेब एक शंका विचारु का?

साहेब - विचार

सरकारमान्य दारु दुकानातुन दारु खरेदी केली

आणि

जर ती प्यायला पत्नीने विरोध केला तर, सरकारी कामात अडथळा आणला असं कलम लाऊन तिला आत टाकता येईल का ?

 नवराः तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो. मी बघ, दोन मिनिटांत तयार झालो

.

.

.

 बायकोः मॅगी आणि पुरणपोळीत फरक असतो. 

अनामत रक्कम म्हणजे काय? अनामत रक्कम केव्हा जप्त होत असते?

एखादी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला एक निर्धारित रक्कम निवडणूक आयोगात जमा करावी लागते. या रकमेला डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम म्हटलं जातं. जर एखाद्या उमेदवाराला निश्चित मतं मिळवता आली नाही तर त्याची अनामत रक्कम जप्त होते.ही अनामत रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. ग्रामपंचायत निवडणुकीपासून राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत, प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला अनामत रक्कम द्यावी लागते.

अनामत रक्कम किती असते ?

प्रत्येक निवडणुकीतील अनामत रक्कम वेगवेगळी असते हे समजलं असेलच. लोकसभआ आणि विधानसभा निवडणुकीची अनामत रक्कमेचा उल्लेख  रिप्रेझेन्टेटिव्ह्स ऑफ पीपल्स अॅक्ट, १९५१ मध्ये तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या अनामत रक्कमेचा उल्लख प्रेसिडेट अॅण्ड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट, १९५२ मध्ये करण्यात आला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य वर्ग आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम असते. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत सर्व वर्गातील उमेदवारांसाठी समान अनामत रक्कम असते.


कोणत्या निवडणुकीत किती रक्कम?

लोकसभा निवडणूक : सर्वसामान्य वर्गातील उमेदवारांना २५ हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागते. तर एससी आणि एसटी वर्गाच्या उमेदवारांसाठी ही रक्कम १२,५०० असते.

विधानसभा निवडणूक : सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १० हजार रुपये असते. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये जमा करावे लागतात.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक : सर्व वर्गासाठी अनामत रक्कम समान असते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवारांना १५ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते.


अनामत रक्कम जप्त का होते?

एखाद्या निवडणुकीत तर उमेवाराची अनामत जप्त झाली असेल, तर त्याचा अर्थ जनतेने त्याला स्पष्टपणे नाकारलं असा होतो. त्या पदासाठी तो उमेदवार लायक नाही, असं जनतेचं मत असल्याचं यातून स्पष्ट होतं. त्यामुळे अशा उमेदवारांची अनामत जप्त केली जाते.निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा उमेदवार जागेवर एकूण मतदानाच्या १/६टक्के म्हणजेच १६.६६% मते मिळवू शकला नाही, तेव्हा त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते.समजा एका जागेवर १ लाख मते पडली आणि ५ उमेदवारांना १६,६६६ पेक्षा कमी मते मिळाली, तर त्यांचे सर्व डिपॉझिट जप्त होईल.

हाच फॉर्म्युला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीलाही लागू होतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवण्यासाठी १/६मते मिळवावी लागतात.


कोणत्या परिस्थितीत अनामत रक्कम परत मिळते?

उमेदवाराला १/६पेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम परत केली जाते.विजयी उमेदवाराला १/६ पेक्षा कमी मते मिळाली तरीही त्याचे पैसे परत केले जातात.

मतदान सुरु होण्यापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, अनामत रक्कम त्याच्या कुटुंबीयांना परत केले जातात.

- प्रा डॉ सुधीर अग्रवाल

अनंत चतुदर्शीस  अनंता का? तुझे विसर्जन व्हावे

पुढील वर्षा परत ये असे जनतेने का? म्हणावे||धृ||


कोणी जरी ठरविले तरी तु आहेस चराचरात 

कशास! एवढा अवडंबर ह्या पृथ्वीवरी मानवात

दिवस थोडे, सोंग फार ,घडतंय तुच बघावे

पुढील वर्षा परत ये असे जनतेने का? म्हणावे||1||


नको तो धांगडधिंगा, नको दारूडे अफाट

पैशाची असे दैंना, तरी खर्च भरमसाठ

तुला पूजण्या काही लागत नाही, सर्वत्र तू हे त्यासी कळावे

पुढील वर्षा परत ये असे जनतेने का? म्हणावे||2||

 

दृष्टांत देऊनी तू सांग सर्वास एवढे

 तुझ्या प्रती माझे मत मी आहे मांडले

सकलांचा तुच त्राता, तुझे गोडवे सर्वांनी गावे

पुढील वर्षा परत ये असे जनतेने ना! म्हणावे ||3||


 घरात असावी पूजा, नका विसर्जन करू माझे आता

कोणत्याही धातूच्या  मुर्त्यांनी मखरात  ठेवा आता

विसर्जन नको, सुचविले मी तुला, तू  सर्वां हे सांगावे  

पुढील वर्षा परत ये असे जनतेने  ना! म्हणावे


- रागिणी जोशी

२७ ऑक्टोबर जेष्ठ कवी भास्कर रामचंद्र तांबे म्हणजेच भा रा तांबे यांचा जन्मदिन.

जन्म. २७ ऑक्टोबर १८७३
तांबे, भास्कर रामचंद्र प्रसिद्ध मराठी कवी. जन्म मध्य भारतात मुंगावली (मुगावली) येथे. शिक्षण झांशी आणि देवास येथे झाले. १८९३ मध्ये प्रवेशपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. मध्य भारतातच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी युवराजशिक्षक, दिवाण, पोलिस–सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षणखात्यात परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार इ. नोकऱ्यांमध्ये जीवन व्यतीत झाले. १९३७ मध्ये ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी झाले.
काव्यास विशेष अनुकूल नसणाऱ्या व्यवसायांतही तांब्यांचा काव्यलेखनाचा छंद कायम राहिला. इंग्रजी स्वच्छंदतावादी संप्रदायाचे कवी, टेनिसन–ब्राउनिंग हे पुढील कवी, जयदेव हा संस्कृत कवी तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचे संस्कार त्यांच्यावर वेळोवेळी होत गेलेपरंतु त्यांच्या कवितेचे मुख्य स्वरूप गीतांचे, भावगीतांचे राहिले. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांप्रमाणे त्यांनी मराठीमध्ये प्राचुर्याने नाट्यगीते लिहिली.
त्यांच्या गीतपद्धतीची छाप रविकिरणमंडळातील कवी आणि बोरकर, कुसुमाग्रजादी पुढील कवींवरही पडली. केशवसुतादी अर्वाचीन कवितेच्या प्रणेत्यांहून स्वतंत्र राहूनच तांबे यांनी आपली स्वच्छंदतावादी कविता लिहिली. संदेश देण्याचा अभिनिवेश त्यांनी बाळगला नाही. स्वतःचे प्रेमसंतृप्त जीवन आणि इतरांच्या प्रेमाबद्दलची आस्था ह्यांतून त्यांची बहुतेक नाट्यगीते निर्माण झाली आहेत. परमेश्वरावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांतून काही ‘अनुभवा’ची कविता त्यांच्याकडून लिहिली गेली परंतु आध्यात्मिकतेचे स्तोम त्यांनी माजविले नाही. सुनीतरचनेमध्ये केशवसुतांना त्यांनी साथ दिली तथापि तीमध्ये त्यांचे मन विशेष रमले नाही. एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे. त्यांनी रूढ केलेला गीतसंप्रदाय हा तांबेसंप्रदाय म्हणूनही ओळखला जातो.
त्यांची कविता प्रथम संग्रहरूपाने १९२० मध्ये रसिकांपुढे आली, नंतर दुसरा भाग १९२७ साली आणि समग्र कविता १९३५ साली प्रकाशित झाली. तीत एकुण २२५ कविता आहेतकाही हिंदी कवितांचाही त्यात अंतर्भाव आहे. तीनही संग्रहांस अनुक्रमे मायदेव, अज्ञातवासी आणि माधव जूलियन हे कवीच संपादक लाभले. स्वतः तांबे हे मात्र आपल्या कवितेच्या प्रसिद्धीबाबत बेफिकीर असत. तांबे ह्यांना संगीताचे चांगले ज्ञान होते व त्यांच्या अनेक कवितांवर, त्या कोणत्यारागांत गायिल्या जाव्यात, ह्यासंबंधीच्या सूचना त्यांनी देऊन ठेवलेल्या आहेत. तांब्यांचे काव्यविषयीचे गद्यलेखनही लक्षणीय आहे.
१९२६ मध्ये भरलेल्या मध्यभारतीय कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९३२ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनांतर्गत कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.  
७ डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेर येथे ते निधन झाले..

 नर्स: सर, त्याच्या तर डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे, मग त्याच्या सर्व बोटांवर प्लास्टर का आहे??? 🤔

डॉक्टर: जेणेकरून तो फेसबुक आणि व्हॉट्सॲप वापरू शकत नाही आणि त्याच्या डोळ्यांना आराम मिळेल. 

 मारवाड्याच्या घरी त्याचा एक सिंधी मित्र गेला.

मारवाड्याने विचारलं, "तू चहात साखर किती घेतोस?"

सिंधी म्हणाला, "हॉटेलात गेलो तर 3 चमचे, दुसऱ्याच्या घरी गेलो तर 2 चमचे, मित्राकडे गेलो तर 1 चमचा आणि माझ्या घरी प्यायलो तर साखरेशिवाय!"

मारवाडी लगेच म्हणाला, "एवढा हिशोब नको ठेऊस मित्रा, हे तुझंच घर आहे, असं समज!"

 मी विरार लोकलमधे दादरला चढल्यापासून उभा आहे. आता गाडी वसईला पोहोचते आहे. 

चौथ्या सीटवर बसलेल्या इसमाला मी दादरलाच विचारले होते, "आप उठनेवाले है क्या?". 

तो "हां" म्हणाला होता पण अजून उठलेला नाहीये.

गाडीने भायंदर सोडल्यावर मी प्रचंड संतापाने त्याला म्हटले, "आप उठनेवाले थे ना?"

तो "हां" म्हणाला आणि सीटखाली ढकललेली सुगंधी उटण्याची पिशवी काढत म्हणाला, "*कितना पॅकेट चाहिये*?" 

एक झाड

एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता-मोजता हिशोब चुकलेल
मुळात चुकल काय…
चुकल काय…चुकल काय
मुळात चुकल काय…पाह्यला झुकलेल

एक मासा पाण्यामुळे पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला
रडता येत नाही…
येत नाही..येत नाही…
रडता येत नाही…म्हणून चिडलेला

एक आभाळ उंच उंच टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल
ढगात खूपसून मान
खूपसून मान…खूपसून मान
ढगात खूपसून मान धपकून बसलेल

एक शून्य काना कोपरा नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल
वेड्या सारख
वेड्या सारख…वेड्या सारख
शून्यात बघत हसलेल

एक मी सार सार बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…सार्‍यात माझे पाहणारा

एक झाड कमरे मध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते
10/10/10:

कुणी काही म्हणा

कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा 
अनुसरले मी अपुल्याच मना

रीत म्हणा, विपरीत म्हणा 
दिले झुगारुनी आवरणा

रीती-कुरीती, नीती - अनीती 
आता उरली चाड कुणा? 
लोकलाज-भय धरू 
कशाला मागायाचे काय जना?

जळल्या साऱ्या आशा मनीच्या
पुसल्या उरल्या त्याही खुणा
जीव भरेना, हौस पुरेना
वाढतोच घरी काम दुणा 
यास्तव हा परपुरुष परिणिला 
मन मिनले गोविंदगुणा

रामचंद्र मनमोहन

रामचंद्र मनमोहन, नेत्र भरुन पाहिन काय?

सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास सुधाधवल विमल हास अनुभवास येईल काय?

आई अंबे वसुंधरे, क्षमा नाम धरिसी खरे मम मानस-राजहंस पुनरपि मज देशिल काय?

जाउ तरी कोणास शरण, करील कोण दुःख हरण मजवरि होऊन करुण प्रभुचं चरण दावील काय?

अशनि राम, पाणि राम, वदनि राम,

नयनी राम

ध्यानी-मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय?

हा नाद ओळखीचा ग


त्यांच्याच पावलांचा, हा नाद ओळखीचा ग

कमलें सरांत फुलली, कुसुमें वनांत खुलली 
करण्यास मान त्यांचा

येतां सखा हसूं का? क्षण कांहीं वा रुसूं का?
रुसवा हसावयाचा

लटके रुसून काही, क्षण बोलणार नाही 
हा मान मानिनीचा

कवटाळिता तनूला, कुरवाळिता हनूला 
रुसवा टिके कशाचा?

विसरून जीवभावा, देईन आत्मदेवा 
तांबुल चुंबनाचा
विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता ॥धृ।।

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठें वचन आठवीता ? ॥१॥

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केविं जसा होता ॥२॥

स्वत्वाचे भान जिथें गुंतल्या नुरावे
झुरणारे हृदय तिथे हे कुणी स्मरावे
होइल उपहास खास, आंस धरू जाता ॥३॥

अंतरिची आग तुला जाणवूं कशाने?
बोलावे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊं नको नाथा ॥४॥

शाहीर

या महाराष्ट्र देशात ।उपजलो मीच शाहीर ।। ध्रु .||

राष्ट्रात नाद घुमविला । जवळचि अतां उद्धार
यापुढती काव्यश्रीला |चढवीन नवा शृंगार
शब्दसंघ फुलविन हर्षें ।स्वातंत्र्य तया मिळणार
हलवीन सर्व इतिहास
कांपवीन व्याकरणास
विश्रांति न संगीतास
मेलेले मुडदे म्हणती ।उपजलों मीच शाहीर

शाहिरा कशाला विद्या ।मळतसे काव्य विद्येने
जसजसें वाढतें ज्ञान ।तसतसे काव्य विलयाने
शाहिरें न म्हणुनि शिकावे ।असावे मस्त अज्ञानें
अज्ञानवारूवरि स्वार
गर्वाची करिं तलवार
होऊनिया बेदरकार
सर्वत्र गात सुटेन । उपजलो मीच शाहीर

कवि सर्व इतर ते कवड्या ।मी एकमात्र कलदार
कविता त्या म्यांच कराव्या ।फिरवाव्या दारोदार
पडद्यातिल कविता कसली । पाहिनाच जी बाजार
निर्लज्ज बनूनि फिरावे
दिसताच जमाव शिरावे
अपुलेंच काव्य भरडावे
करू शके कोण मजविण हें ।उपजलों मीच शाहीर

शाहिरें आपुलें काव्य ।म्हण म्हणता कधिं न म्हणावे
प्रेमें कुणी आग्रह करितां ।त्यांच्यावरि वसकन जावें
आपल्याच मग इच्छेनें ।भलतेंसें गात सुटावे
मग किटोत कान कुणाचे
काय होय आपणां त्याचे
हे वैभव शाहिरतेचे
हे वर्म जायला पटले ।तो तोच होय शाहीर

रागांची पर्वा कोणा ।तालाची वा दरकार
राग ताल दुसऱ्यासाठी ।मी न त्यांत सांपडणार
मी स्वयंभु शंभु वाटोळा ।मी असे स्वैर शाहीर
मज हसतो रसिक नव्हे तो
कवितेंत तालसुर बघतो
अर्थ वा पाहण्या धजतो
काव्यात अर्थ जो ठेवी । तो हाय कुठुनि शाहीर

कोणतेंहि मासिक उघडा ।मम दिसे त्यात कवि-कर्म
मम अखंड काव्यस्राव ।नच केवळ मासिक -धर्म
संपादकांस मज अथवा ।हें ठावें सगळें मर्म
शाहिरपण माझे उघडे
हाडांची करुनी काडें
बाडांवरि लिहिलीं बाडे
यावरिहि कोण मजलागीं ।म्हणणार नाहिं शाहीर ?

कविते! करिन तुला मी ठार

 कविते! करिन तुला मी ठार ।।ध्रु .||

पूर्व कवींनी तुज रस पाजुनि मस्त बनविलें फार

रस बिस आतां मम साम्राज्यी कांहिं न तुज मिळणार


अलंकार मद-मत्त जहालिस धुंदि उतरतों पार

मोडुनि तोडुनि फेकुनि त्यांना दृष्टि न दिसुं देणार


पदोपदीं अवसानीं तुझिया करुनी घातक वार

सुवृत्त अथवा सुपदा कशि तुं हेंचि आतां बघणार


पदलालित्यें जना भुलविलें केले नाना चार

भावाची बहु हाव तुला परि अभाव तुज करणार


नादांतचि रंगुनी गुंगविसि रसिका करिसी गार

नाद तुझा तो नष्ट कराया समर्थ मी साचार


समृद्ध अर्थें असा मिरविला आजवरी बडिवार

अर्थाचा परि लेश यापुढें तुजला नच मिळणार


कोशावरि तव भार सर्व परि लाविन त्यांचे दार

शब्दांच्याचि न कृतिच्या दैन्ये मळविन तव संसार


व्याकरणाच्या अंकी बसुनी शुद्ध म्हणविशी फार

ठार करुनि परी तया तुझ्यावर ओतिन अशुद्ध धार


अपशब्दांचा असा तुझ्यावर करितों बघ भडीमार

जरी न मेलिस तरि मेल्यापरि होशिल मग बेजार


देश धर्म वा वीर विभूती तुज न अतां दिसणार

आता वणवण घुबडासंगे करविन तव संचार


मजलागीं तूं कोण समजशी मी तों कवि कालदार

कालदारचि कां शाहीरांचा फर्स्टक्लास सरदार

चालचलाऊ गीता

पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी

बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !

धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही

समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके

काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला

पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी

या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग

लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!

लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी

कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'

कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?

पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया

मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!

मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?

तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;

परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!

अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;

बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!

कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;

घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!

नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;

म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?

अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?

लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'

अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;

दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?

आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!

ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'

ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,

खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |

इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः 


- जयकृष्ण केशव उपाध्ये

व्यर्थ हो सारेच टाहो

व्यर्थ हो सारेच टाहो एक हे ध्यानात राहो

मुठ पौलादी जयांची ही धरा दासी तयांची


पैज जे घेती नभाशी आणि धडका डोँगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे
श्वास येथे घ्यावयाचा आग पाण्या लावण्याचा
ऊरफाड्या छंद आहे मृत्यू ज्यांना वंद्य आहे
साजिर्या जखमा भुजांशी आणि आकांक्षा उराशी
घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे
माती हो विभुती जयांची ही धरा दासी तयांची

शब्द लोळांचे तयांचे नृत्य केवळ तांडवाचे
सुर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला
जे न केवऴ बरऴती गोड गाणी कोरडी
जे न केवळ खरडती चंद्र तारकांची स्तुती
झेप ज्यांनी घालूनी अंबराना सोलूनी
तारका चूरगाळल्या मनगटाला बांधल्या
ग्रह जयांची तोरणे सुर्य ज्यांचे खेळणे
अंतराळे माऴती सागरे धुंडाऴती
वंदीला जे पोऴती रोज लंका जाळती
ही अशी शेपुट जयांची ही धरा दासी तयांची

हस्तकी घेउन काठी केशरी घालूनी छाटी
राम ओल्या तप्त ओठी राख रिपूची अन् ललाटी
दास ऐसा मज दिसू दे रोम रोमातून वसू दे
सौख्य निप्पर्शा त्वचेशी वेदना ही ठसठसूदे
थेंब त्या तेजामृता मज अशक्ताला मिऴू दे
कांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिऴू दे
जे स्वत:साठीच वाहे रक्त ते सारे गळू दे
रक्त सारे लाल अंती पेशी पेशीला कऴू दे
अश्रू आणि घाम ज्यांनी मिसऴूनी रक्तामधूनी
लाख पेले फस्त केले आणि स्वत:ला मस्त केले
त्या बहकल्या माणसांची त्या कलंदर भंगणांची
ही नशा आकाश होते सर्जनांचा घोष होते
ही अशी व्यसने जयांची ही धरा दासी तयांची

- सांग सख्या रे, संदिप खरे
22/07/09: