भजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गौरी पुत्र गजानन

गौरी पुत्र गजानन देवात महान हा शिवपुत्र गजानन देवातं महान , मंगल मंगल बोला मंगल मंगल ॥धृ॥
मुगुटाला हिरे शोभे रत्‍नजडितांचे , कानात कुंडल तेज पडे सुर्याचे, हो पडे सुर्याचे, गणपतीच्या गळ्यामध्ये शोभे पुष्पमला ॥१॥
गणपतीच्या भाळी शोभे केशराचा टिळा पिवळा पितांबर कटी शोभुनी दिसला पायात पैंजण आवाज रुणझुण झाला ॥२॥
शमी पत्री दुर्वा हरळी आवड मनाची सर्वांगी उटी शोभे लाल शेंदुराची , हो लाल शेंदुराची,पुढे गुळ खोबर्‍याचा नैवेद्यदाखविला ॥३॥
सोन्याच्या सिंहासनी गणेश विराजला, शारदा सरस्वति दोन्ही बाजुला , शांताने हा गणपति हृदयी ध्यानिला ॥४॥

तुझे रुप नेत्री पाहता

तुझे रुप नेत्री पाहता ध्यान लागले रे ॥धृ॥

युगे अठ्ठावीस उभा विटेवरी पुंडलिकासाठी बससी अजूनी भीमातीरी ।
भावभक्ति पाहूनी ज्याची त्यासी उद्धरी रे ॥१॥

समचरण सुंदर कासे पिवळा पिंताबर । कर ठेवोनिया करी उभा राहे विश्‍वंभर ।
रुप सावळे ते माझ्या नयनी साठले रे ॥२॥

भाळी कस्तुरीचा टिळा तुळशी हार शोभे गळा तुरा तुळशीचा शोभे बुक्का वाहु घननीळा ।
लिंबलोण उतरु माझ्या सावळा विठ्ठला ॥३॥

जनाबाई सखूबाई उद्धरीली बहिणाबाई ज्ञानदेव चोखामेळा उद्धरीला तुक्याही चरणी ठाव देई तुझीया याच पामरा रे ॥४॥