पाककृती

..............| हरयाली पनीर |............
साहित्य
३ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी पुदिना
१ कैरी
१ कांदा
२ वाटी पनीर
१ हिरवी मिरची
१ चमचा लसूण पाकळ्या
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/४ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
मीठ चवीपुरतं
तेल

कृती

* मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि १ वाटी पाणी घालुन बारीक पेस्ट बनवणे.
* कढईत तेल गरम करून त्यात पनीर गुलाबी रंगावर भाजून घेणे. बाजूला ठेवणे.
* त्याच तेलात कांदा, लसूण घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
* त्यात कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर-पुदिना-मिरचीची पेस्ट घालुन आटेपर्यंत शिजवणे.
* त्यात हळद, गरम मसाला, तिखट, जिरे आणि धने पूड घालुन ढवळणे.
* पनीरचे तुकडे आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे