सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी तुझी शतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकाराची !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..
फलंदाजीला तू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कोहली-रैना आले गा !
धावांचा डोंगर उभा राहिला बघा !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..
दुमदुमले मैदान झाला जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद !
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव..
घालीन लोटांगण वन्दिन चरणं !
डोळ्याने पाहिले शतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन !
भावे ओवाळीन, "सचिन" नामा !
त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव !
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक, ऑलराउन्डर त्वमेव !
गुड लेन्थ टाकले, यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले , व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे !
हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे !!
सचिन तेंडुलकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सचिन तेंडुलकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)