अशोक थोरात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अशोक थोरात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आव्हान

छळून घ्या संकटानो,
संधी पुन्हा मिळणार नाही,
कर्पुराचा देह माझा
जळून पुन्हा जळणार नाही.

साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनार्‍याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही ll १ ll

निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही ll २ ll

आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी
संकटानो सावधान गाफील मी असणार नाही ll ३ ll


कवी - अशोक थोरात