aai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
aai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आई...

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

तोच आहे

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे

लहानपणी धाकटयावर दाद्गिरी करायचो
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो

ती फ़क्त आईच..!

सकाळी दोन धपाटे घालुन उठवते..ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते.. ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते..ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते.. ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते.. ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण..
ती फ़क्त आईच..! ती फ़क्त आईच.

एका स्त्रीचा स्वर्ग

बाळ माझं बघ कसं.....दुधासाठी रडतंय,
बोबड्या त्याचा शब्दात....माझ्यासाठी हंबरडा फोडतंय,

दारातली तुळस बघ माझ्या....कशी माझ्याविन सुकलीय,
तिला पाणी नाही घातलं....तिची फांदिही झुकलीय,

लेक माझी बघ....दारात माझी वाट बघत बसलीय,
गुणाची आहे रे पोर माझी....दारात एकटीच रुसलीय.

बछडा माझा......आता शाळेतून येईल,
"आई कुठे गेली??"..विचारत....घर डोक्यावर घेईल...

नवरा माझा भोळा आता दमून भागून येणार,
दमला असेल रे तो.....त्याला पाणी कोण देणार?

गाय माझी बघ कशी....गोठ्यात चाऱ्याविन उभी,
माज्यावीन ती चारा खात नाही रे कधी....

संसार माझा मी थोडा सावरून....आवरून येते,
भेटणार नाहीत पुन्हा....माझ्या लेकरांचा मुका घेऊन येते.
नवऱ्याचे माझ्या....माझ्यावर खुप खूप प्रेम रे....
माझंही त्याच्यावरचे प्रेम त्यांना सांगून येते.....

सोड रे देवा मला ....थोडा वेळ जाउ दे,
कांदाभाकर माझ्या माणसांसोबत खाऊ दे,
तुझा स्वर्ग नको......मला माझ्या स्वर्गात राहू दे.

आई

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!














आई" हा फक्त शब्द पुरेसा आहे ......
आई म्हणजे .........
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे
सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार
पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा
आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर
घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच
लढायची
एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस
जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील...

आई, असं का ग केलंस?

का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता
झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त
तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि
रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात
असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने
ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच
असते!

कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी
ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली
आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"
आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,
तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास
सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या
आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर
पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग
तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती
काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर
काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट
फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो
पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे
जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या
मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....

नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत
जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या
कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.....
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहीलं नव्हतं तरी
नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला

आई

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते..

उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण
घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने
बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी
मजुरीचे पैसे आणले..

तितक्यात मुलगा शाळेतून
आला आई ला म्हणाला मला जेवायला दे
मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे
सकाळी लवकर उठेन..

मुलगा सकाळी लवकर
उठला त्या माऊलीला पण उठवले,
मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई
लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून
घेतो
माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते..

मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई
ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे
मला उशीर होतोय
आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच
सापडत नव्हते..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई
लवकर कर माउलीने विचार न करता तसाच
दुधाचा टोप हाताने उतरवला गरम
दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ
लागल्या हाताची लाही लाही झाली..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न
उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून
दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले..

त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून
त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली..

आईने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले,
मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने
विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले..

मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या मग आईने
विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस
काही खाल्लेस कि नाही..

त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर
मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने
डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून
आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात
त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले
आई धन्य झाली..

आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर
इजा करून गेली..........

माझी मायं

हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या
व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे
आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून
पाजत जाय
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या
फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं
नसे पाय
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता
घेऊ दे हाती काम
शिकुनश्‍यानं कुठं मोठ्ठा
मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी
दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी
जवा माझा बाप
थरथर कापे आन
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी
कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं
भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा
तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय




कवी - स. द. पाचपोळ, हिंगोली

झूलाघर

सायंकाळ झाली पक्षी जाती घरा माजी
गाय वासरे हंबरती
सांगती झाली वेळ आईची
आले हसु मजला, हे पण माझे सखी सोबती
मी पण पाहते वाट आईची
लागली ओढ तिच्या भेटीची

इतुक्यात एक चिमणी छोटीशी
येऊनी बसली माझ्या पाशी
होती ओठात एक काडी चार्‍याची
आपल्या चिमुकल्यां साठी
सांगत होती जणु घालीन
घास माझ्या पोरांच्या ओठी
ही मिलनाची आस बघुनी
मी व्याकुळ झाले मनी
केव्हा येईल आई माझी

नको वाटते तिची नौकरी
दिवस भराची दुसर्‍याची चाकरी
नको राहणे झूलाघरात
वाटते राहावे आई पाशी
डब्यातले थंड अन्न न मला रूचते
शेव, मिक्चर न मला आवडे
एकटेपणात न दिवस सरे
सारखी आईची आठवण येते
कसे हे जीवन आमचे
न आईची कुशी मिळते
न प्रेमानी अन्न भरवते
बालपण आमचे हे असेच संपते
एकटेपणाची आठवण मनात सलते

कसे हे जीवन चक्र बदलले
आई-वडिल दोघेही घरा बाहेर पडले
वाट पाहता-पाह ता थकले डोळे
सारखी आईची आठवण येते
कधी येईल सांगा माझी आई

पक्ष्यांनो तुम्ही तरी सांगाल का?
निरोप माझ्या आईला
वाट पाहते लेक आईची
सायंकाळ ही आता सरू लागली
सायंकाळ ही आता सरू लागली.


कवियत्री - सौ. स्वाती दांडेकर

आई

सकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ
चिऊचे काऊचे प्रेमाने सुखाचे घास दे खाऊ

उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा
उद्या आणू म्हणे आई, नको माझ्या रडू राजा

कुठे खेळावया जाता, कशी ही घाबरी होते
जगाची सोडूनी कामे, मला शोधावया येते

अशी ही आमुची आई, तिची माया असे फार
तुलाही देव राया रे अशी आई न मिळणार.