सूर्यकांत डॊळसे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सूर्यकांत डॊळसे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ज्वाला बने ज्योती

२६/११ नंतर पेटलेली
ती आग,आग राहिली नाही.
तेंव्हा जी आली होती
ती जाग,जाग राहिली नाही.

हा महिमा काळाचा की,
आम्हीच विसराळू आहोत?
आम्हांस ना देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत?

त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे,
सार्‍या गोष्टी ध्यानी आल्या आहेत.

झटका भोवतालची राख
आतले निखारे धगधगु द्या !
दुश्मनांची हिंमत होईल कशी?
त्यांना हे निखारे बघू द्या !!


कवी - सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

स-माजवादी सत्कार

मुंबईत बेतालपणा,
लखनौ मध्ये गरळ आहे.
खाजवून खरूज काढल्याचा
अर्थ तर सरळ आहे.

भाषॆच्या नावावरती
विषारी फुत्कार केला गेला.
केवळ एका शपथेसाठी
जाहिर सत्कार केला गेला.

हा केवळ सत्कार नाही,
हे तर आगीत तेल आहे !
जे विकले जाते,
त्याचाच जहिर सेल आहे !!


कवी - सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)