जय जय सद्गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्गुरु श्रीमाऊली ॥
सहस्त्रदलांचे सूर्यकमल ते आत्मतेज ते उधळीत येता
गुरुमायेला न्हाऊ घालता भाव भक्तिने उटी चर्चिता प्राण फुले वाहिली
जय जय सद्गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्गुरु श्रीमाऊली ॥
अष्टसिद्धि जमल्या भवती पंचत्वाचि पंचारतीही
घेऊनी हाती आदिशक्ति जय जय गर्जत गात आरती ओवाळीत राहिली
जय जय सद्गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्गुरु श्रीमाऊली ॥
रामप्रभु तो पंचवटीचा हाक मारता धावत येतो
गुरुमायेचा शब्द झेलतो भक्ताच्या त्या भालावरची विधीलिखिते पुसली
जय जय सद्गुरु श्रीमाउली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्गुरु श्रीमाऊली ॥
प्रेम चांदणे सदैव फुलते गुरुमायेचे घडता दर्शन
भक्तावरती अमृत सिंचन याच देहि याच नयनी मायप्रभु पाहिली
जय जय सद्गुरु श्री माउली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्गुरु श्रीमाऊली ॥