व.पु काळे
अत्यंत महागडी, न परवडणारी खर्याण अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
-व पु-
दुखा:वरती उभ राहिलेल दु:ख कुठल आणि मनाच्या कोतेपणावरती उभ राहिलेल कुठल हे जोपर्यंत ठरवता येत नाही, तो पर्यंत सगळी दु:ख बोलताच येत नाहीत. आणि एवढ्याकरताच शेवटी आपल्याला आपल मन मारावं लागत, आपल मन हे आपणच मारायच असतं, कारण आपल्या विरुध्द तक्रार घेउन ते कुठेही जात नाही.
:- व. पु. काळे
"आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडुन जातो."
--व.पू काळे --
"आपत्ती पण अशी यावी,की त्याचाही ईतरांना हेवा वाटावा.व्यक्तीचा कस लागावा.पडून पडायच तर ठेच लागून पडू नये.चांगल दोन हजार फुटवरून पडाव माणूस किती उंचावर पोहचला होता,हे तरी जगाला समजेल"
जगातली सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे दुसर्याने काय करावे हे आपण ठरवणे !
- व. पु -
जो कुणी "मी खूप सहन केले, खूप सहन केले" असे ओरडून सांगतात
ते खरे तर जगाकडून सहानभूती मिळवत असतात.
जो सहन करतो तो कधी बोलत नाही.
-- व. पु काळे (माणसं)
आकाशात जेंव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेंव्हा गुरूत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पीटाळून लावे पर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वता गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
असच माणसाच आहे...
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
-व.पू काळे-
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.
-व.पू काळे-(वपूर्झा)
आपत्ती पण अशी यावी,की त्याचाही ईतरांना हेवा वाटावा.व्यक्तीचा कस लागावा.पडून पडायच तर ठेच लागून पडू नये.चांगल दोन हजार फुटवरून पडाव माणूस किती उंचावर पोहचला होता,हे तरी जगाला समजेल.
-------व.पु.काळे-------
प्रेंम निर्माण होयला सहवासाची मदत लागते .जितका सहवास जास्त तितके प्रेंम जास्त .आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो म्हणूनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंद पुरतच असत ...........................व.पु
प्रश्नांनापासून नेहमीच पळता येत नाही कधी कधी ते पळणार्या ला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत.मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच.
!!व.पु.काळे!!
आयुष्य आजवर किती जगलो ह्या आकडेमोडीत काही अर्थ नाही.प्रकाश आणि अंधाराचा खेळ कॅलेंडरवरच्या चौकोनांसाठी.आपल्या आयुष्याच्या वाटेवर कायम अंधारच असतो.क्षणाला क्षण घट्ट चिकटून असतांनाही पुढच्या क्षणी काय घडणार आहे,हे आपल्याला माहित नसणं म्हणजे अंधारच नव्हे काय ?
व.पु काळे
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
-- व.पु.काळे
देवातल्या माणुसकीला माणूस सलाम करतो, माणसातल देवत्व तो कधी ओळखायला शिकेल का?
~ वपु काळे | घर हरवलेली माणसं
अनेक समस्या, त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते, त्या वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसचं काहीसं.. अनेक समस्यांचं..
~ वपु काळे | वपुर्झा
मिठामुळे पदार्थाला चव येत असली तरी मीठ चवदार नसत. काही माणसे एकटी असतात अन् एकटी असतात तेव्हा बरणीतल्या मिठासारखी खारट असतात. पण ते जेव्हा दुसर्याच्या जीवनात मिसळतात तेव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात व आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घेतात.
~ वपु काळे | वपुर्झा
“तर्काला सत्याचा आधार लागतोच. त्याशिवाय तो वास्तवतेत उतरत नाही. ज्या तर्काला वस्तुस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते. सत्याचा आधार शोधायची धडपड पण करायची असते. अशी धडपड जी माणसे करतात ती वाढतात. ज्यांचं तर्कावर प्रेम असतं ती माणसं तिथंच फिरतात.”
~ वपु काळे | झोपाळा
समस्यांशी हळूहळू सामना करण्याची शक्ती मिळवणं ह्यालाच यशस्वी संसार म्हणतात.
~ वपु काळे | वपुर्झा
आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही म्हणून आपण जगतो. उद्याबद्दलची काही ना काही स्वप्नं उराशी असतात म्हणून आज आपण मृत्यूला कवटाळावे असे वाटत नाही.
~ वपु काळे | संवादिनी
प्रार्थनेसाठी मनाची एक वेगळीच शांती लागते. त्याशिवाय प्रार्थनेमध्ये मागणी आली म्हणजे भिक्षा मागण्यासारखी आहे. #वपु
“15 पैशाच्या पतंगासाठी एकदिवशी पोरं जेव्हा रस्त्यावरून सुसाट पळत सुटतात, तेव्हा पतंगासाठी जातो तो प्राण नसून, पतंग हाच प्राण असतो. जीवाशी खेळ करून ती मूलं पतंग पकडतात, मी मस्टर पकडतो, तसा म्हणाल तर दोन्हीही कागदच”
~ वपु काळे | वपु सांगे वडिलांची कीर्ती
आपण आयुष्यात खुप काही मिळवतो पण बर्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड करतो ती कारणंच शेवटी आपल्या बरोबर रहात नाहीत. मग राहून राहून मनात येत "काही नव्हत तेव्हाच सुखी होतो".
~ वपु काळे | रंगपंचमी
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात, प्रवाह रूंदावत जातो.
~ वपु काळे | भुलभुलैय्या
हा निसर्ग आहे म्हणा किंवा नियती आहे म्हणा. नियती माणसाला कोणत्या तरी दालनात शिखरावर नेऊन पोहचवते आणि त्याच, त्या दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसर्या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य, अगदी क्षुद्र करुन सोडते. एका माणसाला छोटा करुन ती दुसर्याला मोठा करत नाही, तर एकाच माणसात ती त्याला इथं छोटा तर तिथं मोठा करते.
~ वपु काळे | मी माणूस शोधतोय
वस्तू जेवढी सूक्ष्म.. तेवढी स्फोटक! सर्वात सूक्ष्म काही असेल तर ते विचाराच. म्हणूनच अस्वस्थ आणि उद्ध्वस्त करण्याची त्यांची शक्ती अफाट असते.
~ वपु काळे | हुंकार
आपत्ती पण अशी यावी कि, त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडुन पडायचचं तर ठेच लागुन पडु नये. चांगलं दोन हजार फुटांवरुन पडावं. माणुस किती उंचावार पोहोचला होता हे तरी जगाला समजेल.
~ वपु काळे | वपुर्झा
आपण धुपासारख बनायला हवं. विस्तावावर कुणी का टाकेना, विस्तव अंगाला लागला की, सुगंध देण्याचं वातावरणात उदात्तता निर्माण करण्याचं काम आपलं.
~ वपु काळे | इतर
बाळंतपण हे जसं एका जीवाचा जीवनारंभ असतो तसाच कधीकधी तो जन्मदात्रीचा अंतही असतो. मरणाच्या उंबऱ्याला स्पर्श करून मागे येण्याचं सामर्थ्य पुरुषाजवळ असतं का?
~ वपु काळे | संवादिनी
वाचन तुम्हाला कायम तरून ठेवतं; पण तिथही एकांताची गरज असते. वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो, तोव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं.
~ वपु काळे | ठिकरी
यश म्हणजे ताटाभोवतीची रांगोळी. सतत अस्तित्व दर्शवणारी. रांगोळीचा भुकेशी संबंध नाही. म्हणुनच ती पचवण्याचा प्रश्न उदभवत नाही.
अपयश हे वाढलेल्या ताटासारखं. अन्नावर वासना नसली तरी ते वाढ्ण गिळावं लागतं, पचवावं लागतं. चेहऱ्याची रांगोळी विस्कटु न देता....
~ वपु काळे | प्लेझर बाँक्स
सर्वांत जास्त दीर्घायुषी कोण?
शाळेतला शिक्षक. शिक्षणाच्या व्यवसायात एखाद्याने तीस वर्षं घालवली आणि प्रत्येक वर्षी त्याच्या हाताखालून पन्नास विद्यार्थी गेले तर एकूण आकडा फक्त पंधराशे होतो. पण प्रत्येक दिवसाचे शाळेचे तास मोजले, वर्ग आणि त्यांच्या तुकडया मोजल्या तर किती विद्यार्थी होतील?
ते विद्यार्थी जितकी वर्षं जगतील तितकी वर्षं त्या शिक्षकांचं आयुष्य.
~ वपु काळे | माझं माझ्यापाशी
फुल देण्यामागचा संकेत तुम्ही जाणता ना? निसर्गासारख टवटवीत राहण्याचा संदेश त्या माणसापर्यंत पोहचावा हा वैयक्तिक संकेत आहे.
~ वपु काळे | पाणपोई
आर्थिक झळ किंवा तूट भरुन काढता येते. शारीरिक हानी भरुन काढताना जरा क्लेश होतात आणि त्याची शाश्वती नाही. पण गेलेली वेळ मात्र कधीच परत येत नाही.
~ वपु काळे | रंग मनाचे
मोर फक्त भरून आलेल्या ढगांसाठी नाचत नाही. त्याप्रमाणे कलावंत केवळ मैफलीसाठी फुलत नाही. ह्या दोन्ही चमत्कारांना एक तिसरा साक्षीदार असावा लागतो. एक सावध जाणकार हवा असतो. तहानलेला जीव आणि तहान भागवणारा जीव ह्यांना लांबून पाहणारा एक जीव लागतो.
पण तो ही कसा असला पाहिजे ?
त्याला तहानेची आर्तता समजली पाहिजे आणि ती भागवणाऱ्याची क्षमताही.
~ वपु काळे | वपुर्झा
कलेचा कोणता न कोणता वारसा व देणगी मिळालेला माणूस थोडं वेगळ आणि उत्कृष्ट जगू शकतो, जास्त काळ टवटवीत राहू शकतो..!!
~ वपु काळे | इतर
निष्काम कर्मयोगाचं उदाहरण म्हणजे घर बांधणारा गवंडी...! इतरांसाठी वास्तू उभी करायची आणि ती जेव्हा सच्च्या अर्थानं राहण्यासारखी होते, तेव्हा मागे वळूनही न पाहता ती सोडून जायचं..!
~ वपु काळे | निमित्त
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
~ वपु काळे | वपु सांगे वडिलांची कीर्ती
ज्याच्याबद्दल नाना कल्पना करता येतात, विरंगुळा मिळवता येतो असा एकंच दिलासा म्हणजे 'उद्याचा दिवस'.
~ वपु काळे | भुलभुलैय्या
पु. लं
शिवाजी महाराज आणि लोकमान्य यांच्या स्मरणाने आजही गदगद्णारे लोक आम्ही.मायदेशहून येणाऱ्या पत्रांची आणि वर्तमान पत्रांची वाट बघत इथली मराठी माणसे एकमेकांना धरून आहेत.मी ह्या परदेशच्या प्रवासात एकूण हेच पहात आलो. दूर देशी जावे, अफाट पैसा मिळवावा, त्या त्या देशांच्या संस्कृतीशी समरस व्हावे-- तिथले लोक निशागारात जातात म्हणून आपणही जावे, त्यांनी बॉलडान्स केला कि आपण करावा,त्यांच्या बायकांची वेषभूषा - केशभूषा आपण स्विकारावी, असली स्वत्व सोडायला लावणारी समरसता आपल्या मराठी मंडळींत बरीच कमी- मराही बायकांना मोकळेपणाने मद्यपान किंवा धूम्रपान करताना मी क्वचितच पाहिले आहे.
साहेबाने आपला आपला क्रॉस जगभर नेला आणि कुठल्याही देशात तो राहिला तरी आपल्या घरात तो क्रॉस लावतो.ख्रिस्ताची तसबीर लावतो. तो फॉरवर्ड! आणि आम्ही आमच्या बजरंगाची किंवा गणरायाची तसबीर लावली तर ते बॅकवर्ड! हे केवळ गुलामीचे पाप.एखादी देवाची तसबीर. एखादे शिवाजी- राणाप्रतापाचे चित्र, एखादे मराठी पुस्तक मायदेशाशी आपले नाते ठेवते. परदेशात गेल्यावर आपल्या मायभूमीची नाळ अजिबात कापून टाकायला नको. परदेशची गोष्टच सोडा, पण इथे देखिल काही मराठी आया इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आपल्या मुलांचे इंग्रजीतून लाड करताना दिसतात तेव्हा मला संताप येतो. त्या घरी पुन्हा जाऊ नये असे वाटते. जगातल्या कुठल्याही इतर देशातल्या माता आपल्या लेकरांचे परक्यांच्या भाषेतून लाड करीत नाहीत. हे म्हणजे स्वतःचे स्तन्य असताना शेजारणीचे उसणे आणून पाजण्यासारखे आहे.
-- पुर्वरंग
लहानपणी आईबापांकडून आणि शाळेतल्या शिक्षकांकडून मिळालेल्या शाबासकीची ऊब ही जन्मभर टिकून असते. मोठेपणी श्रीमंत हॉटेलमध्ये पार्ट्या देणार्याआ मित्रापेक्षा लहानपणी न मागता "इकडे ये-" म्हणून प्रेमाने हातावर खोबर्याची वडी ठेवणारी शेजारची म्हातार...ी आयुष्यभर आठवत असते.
माझ्या एक सामान्य आर्थिक परिस्थितीतले स्नेही आपल्या आठनऊ वर्षांच्या मुलाला घेऊन गाण्याच्या बैठकीला आले होते. मी विचारले, "मुलाला गाण्या
ची... आवड आहे वाटतं?"
ते म्हणाले, "नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वांच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज ह्या गाण्याला यायचंय का, असं विचारलं आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला? आयुष्य भर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो-"
'संस्कार' ह्याचा अर्थ ह्या बापाला कळला असे मला वाटते
----पु.ल--
शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी...द
ुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार... आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे... सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा....
-पू.ल-
भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे.
बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुर्बोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मला कळेना!
आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, ... असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं?
म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"
पु. लं. कुठतरी समारंभाला अध्यक्ष म्हणून गेले होते. ते एका खुर्चीवर बसायला म्हणून टेकणार तोच तेथील सेक्रेटरी ओशाळुन म्हणाले "माफ करा, तिथे बसू नका..त्या खुर्चीचा पाय मोडलाय...सुताराला अनेकदा सांगूनही तो काही नीट काम 'करत' नाही.."
पु. लं. म्हणाले " 'करवत' नसेल..
ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. "A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding".
लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही
गोष्ट खरी आहे.
पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो.
-- पुलंचे एक पत्र
किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता.
.
तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.
.
दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.
.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
.
"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली.
पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली,
"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."
..
"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.
.
मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले.
"यवड्या पैशात किती बसतं ते द्या"
.
"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"
.
"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."
.
तीने आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. कारण तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही.
.
आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो.
.
.
-(पु.ल.देशपांडे एक शून्य मी)
आचार्य अत्रे
एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात !त्यांच्या शेजारून कोलेज ची
मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो ! तो अत्रे ना विचारतो हे
काय आहे? (रुळ दाखवून )
अत्रे : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : तुझी आई आहे .
मुलगा लगेच तिथून सतकतो
————————————————————–
हौशी नाटकांच्या प्रयोगाबिषयी बोलताना आचार्य अत्रे भाषणात म्हणाले, “नाटकाच्या तालमी करायच्या नाहीत अन आयत्या वेळी कशीतरी वेळ मारून नेली म्हणजे स्वतःला कृतकृत्य मानायचे हे हौशी नाटकवाल्यांचे एक ठराविक तंत्र होऊन बसले आहे. नाटक बसवायचे म्हणजे वाच्यार्थ्याने अक्षरशः ते खाली बसवूनच दाखवतात.” पुढे ते म्हणाले, “अशाच एका हौशी नाटकाच्या प्रयोगाला गेलो असता सर्वात कोणाचे काम चांगले झाले असे सांगण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा प्रॉम्पटरचे काम सर्वान चांगले झाले, असे सांगणे मला भाग पडले…”
————————————————————–
एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत.
एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?”
बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”
“व्हय तर!”
“किती कोंबड्या आहेत?”
“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”
“आणि कोंबडे किती?”
“कोंबडा फक्त एकच हाये.”
”एकटा पुरतो ना?”
उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.
————————————————————–
१९६५ सालची गोष्ट असावी. नक्की मला आठवत नाही.सांगली मध्ये अत्रे यांचे भाषण होते गावभागात.मी नुकताच खेड्यातून य़ा शहरात आलो होतो,त्यामुळे अत्र्यांच्या भाषणास जायचेच असं ठरवून च सभेस गेलो होतो.दूर अंतरावर उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होतो.एवढ्यात गर्दीतून “अत्रेसाहेब खिशातला हात काढा” असा आवाज ऐकू आला. अत्र्य़ाना खिशात हात घालून बोलण्याची संवय असावी.पण अत्रे महोदयानी शान्तपणे उत्तर दिले कि “तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही”गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि अत्र्यांचे भाषण शांतपणे तसेच पुढे चालू राहिले.
एकदा ना.सी फडके अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामचा उपयोग काय?त्या वर ते म्हणाले योग्य वेळ आल्यावर मी सागेन.त्यानंतर आत्रे फडकेंच्या पत्नी ना भेटले असता ते म्हणाले.
मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.झाले!ही गोष्ट
लगेचच फडक्यांच्या कानावर आली.त्यांनी अत्र्यांकडे याबाबत खुलासा मागितला तेव्हा अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले,
मी,तुझा नवरा,तू,माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.

पु. ल. म्हणतात -
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...
माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...
कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...
आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...🙏🏻🙏