विद्यार्थी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्यार्थी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षक : आज तु बोर्ड कडे पाहुन लक्ष देत आहेस... रोज लेक्चर मध्ये तर खाली पाहुन ऐकत असतोस.... आज काय झाला ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विद्यार्थि : सर माझा नेेेट पँक संपलाय.........

धाडस

एकदा मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांमध्ये कुणाचे विद्यार्थी जास्त धाडसी आहेत, याबद्दल वाद चालू होता.
मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना शार्कचा वावर असलेल्या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या. 
त्या मुलांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय धाडसीपणे उड्या मारल्या. 
मेडिकल कॉलेजचे प्राचार्य : (विजेत्याच्या थाटात) पाहा धाडस !!!

आता इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनीसुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावल. त्यांना या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या. 
विद्यार्थी : पागल है कया साले ? 
प्राचार्य (मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना) : याला म्हणतात धाडस !!!

दूरध्वनी क्रमांक

मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, "कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग."

"माहीत नाहीत सर."

दादू म्हणाला. "माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा. परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!" शिक्षकांनी आज्ञा दिली. दादूनं पुस्तक काढून वाचल, "यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?" शिक्षकांनी विचारलं. "हे तर माहीत होतं मला," "मग माहीत नाही असं का म्हणालास?" शिक्षक रागावले. "मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!

विद्यार्थी आणि डॉक्टर

शिक्षक : सांगा पाहू,

विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?

हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,

पण आताच काही सांगू शकत नाही.

पटकन

जोशी सर : बंड्या मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन
द्यायचं, काय?.
बंड्या : हो सर.
जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
...
बंड्या : पटकन..!!!

लाईट

सर - होमवर्क का नाही केला?

मुलगा - सर लाईट गेले होते.

सर - मेणबत्ती लावायची मग..

मुलगा - काडेपेटी नव्हती.

सर - का?

मुलगा - देवघरात होती.

सर - घ्यायची मग.

मुलगा - अंघोळ नव्हती केली.

सर - का?

मुलगा - पाणी नव्हत.

सर - का?

मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

सर - का?

मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

एकच कुत्रा

टिचर - बंटी तु ''माझा कुत्रा'' या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणेच आहे. तु त्याची कॉपी केलीस की काय?

बंटी - नाही सर... पण तो कुत्रा एकच होता...

सगळ्यात जुना प्राणी

गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

मंजू : झेब्रा.

गणपुले सर : असं का बरं?

मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना