स्त्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

झपताल

ओचे बांधून पहाट उठते...
तेव्हापासून झपझपा वावरत असतेस.
कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून
दोन डोळे उमलू लागतात
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून
तुझ्या स्तनांवर बाळसे चढते.
उभे नेसून वावरत असतेस.
तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल
पुन्हा एकदा लाल होते.
आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो!
मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात,
त्यांची मान चिमटीत धरुन
तू त्यांना बाजुला करतेस.
तरीपण चिऊ काऊच्या मंमंमधील
एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तुंमध्‍ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,
वाढतांना "यक्षिणी"असतेस,
भरवतांना "पक्षिणी" असतेस,
साठवतांना "संहिता" असतेस,
भविष्‍याकरता "स्वप्नसती" असतेस.
....संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.


कवी - विंदा करंदीकर

स्त्री

प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या जीवनात राणी लक्ष्मीबाई असते.
कारण लग्नाच्या आधी ती राणी आसते.
लग्नानंतर लक्ष्मी बनते.
आणि मुलं झाल्यानंतर नुसती राब राब राबनारी बाई बनते