शैक्षणिक विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शैक्षणिक विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिक्षण वाईट आरोग्य चांगले

प्रगति पुस्तक वाचतांना

वडील : हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शुन्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे.

मुलगा : बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे..
शिक्षक : सेमिस्टर सिस्टिमचे फायदे सांग.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या : फायदे नाही माहीत.. पण
तोटा हा आहे की, वर्षातून
दोनदा अपमान होतो..

शिक्षण

एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.

वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू
उभारतात आणि त्यात झोपी जातात.

काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात
व म्हणतात-

वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय?

मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.

वडील: ते तुला काय सांगत आहेत?

मुलगा: खगोलशास्त्रानुसार, ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.

वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत
आहेत कि आपला तंबू चोरीला गेला....
(शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो)

झकास शाळा !

स्थळ : शाळा

वर्ग : एकदम गप्प

कारण : इन्स्पेक्शन

अधिकारी : बोल अफ़ज़लखानाचा खून कोनी केला ?

बन्डु : माफ़ करा सर, मला काही माहित नाही.मी काल शाळेतच आलो नव्हतो . मला तर हा अफ़ज़लखान कोन आहे हे सुद्धा माहित नाही .

अधिकारी : काय सर ! हे काय चाल्ले आहे. मुल्लान्ना काहिच माहित नाहिये.

सर : नाही साहेब, बन्डु तसा खोड्कर आहे पण कोनाचा खून काही तो करणार्‍या मधला नाहीये.
अधिकारी : काय ! मुख्याध्यापकाना बोलवा.

अधिकारी : महाशय ! आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना काहीच माहित नाही.

मुख्याध्यापक : माझ्या शाळेतील विद्यार्थी असे कधी करणारच नाही.मी ह्याची खात्री देतो.

अधिकारी : तुम्ही खरोखरच मुख्याध्यापक आहात काय ? सर तुम्ही रोज विद्यार्थ्यान्ची हजेरी घेता काय ? काय रे बन्डु! तू रोज शाळेत येतोस काय?

बन्डु : माफ़ करा सर, मी शाळेच्या बाहेर केळी विकतो. ह्या वर्गातला एक विद्यार्थी आज भारत- औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे जबरदस्तीने पाठविले आहे.

सर : माफ़ करा सर, मी समोर पान टपरी चालवितो. ह्या वर्गाचे सर आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेले आहेत. त्यान्नीच मला इथे पाठविले आहे.

मुख्याध्यापक : माफ़ करा सर, मी मुख्यध्यापकान्चा भाऊ आहे. तो आज भारत औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे पाठविले आहे.

अधिकारी(हताश होवुन) : अरे बापरे ! मी आलोय तर ही अवस्था आहे.खरे साहेब आले असतेतर काय झाले असते देव जाणे??