प्रेमभंग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमभंग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सगळीच गणितं चुकली आहेत......

सगळीच गणितं चुकली आहेत......
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे

पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं

सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,
पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवा
सगळं काही कुठेतरी हरवलं आहे,
निर्सगही जणु माझ्याबरोबर तिलाच शोधत आहे

माझे कुठं चुकले आता काहीच कळत नाही,
अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरं शोधुनही सापडत नाहीत
म्हणुन पुन्हा नव्याने सगळी गणितं तपासत आहे ,
पण छे आता सगळीच गणितं चुकली आहेत....

मी कधीच नाही म्हटंल की...

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
माझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
भोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
आपल्या ह्रदयाच्या रेशीमगाठी कधी जुळल्याच नाहीत म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कारण मनातल्या भावना कधी ओठांपर्यंत पोहचल्याच नाहीत म्हणुन

पण आता मी बोलणार आहे
ह्रदयाचे सर्व बंध उलघडणार आहे
कारण मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन...

त्याचं-तिचं आज break-up झालंय...

त्याचं-तिचं आज break-up झालंय... काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तुझ्याशिवाय जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच झेललंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

प्रेमाचे भास असतील कदाचित सारे
गोंडस अशा या नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन् उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तो म्हणतो ती अशीच आहे,
ती म्हणते तोही तसाच आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

काय वाटलं असेल कुणास ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

ती-तिचा नवरा
तो अन् त्याची बायको
चौघांमध्येही तो मात्र तिची
उगाच अशी छेड़ काढणार,
पण गैरसमज नको हं...
कारण, त्याचं-तिचं आज नाही
ब-याच वर्षांपूर्वी break-up झालंय...

इतकेही प्रेम करू नये.....

इतकेही प्रेम करू नये कि ,
प्रेम हेच जीवन होईल ,
कारण प्रेम भंग झाल्यावर ,
जिवंतपनीच मरण येईल


सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी ,
अखेर साक्षीला उरते ,
केवळ , डोळ्यात पाणी

जीवनाच्या या वाटेवर ,
खूप वाटसरू भेटतात ,
भेटणारे भेटतात पण ,
फक्त काहीच जण साथ देतात


डोळ्यातून अश्रू ओघळला कि ,
तो हि आपला राहत नाही ,
वाईट याचंच वाटत कि ,
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही

तिच्या लग्नाची पत्रिका

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
... नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,

दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,

एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,

'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,

काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,

'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,

सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,
आज घरी दिसली............!

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..


~ आशिष