बालपन विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बालपन विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

इम्पोटेड अतिरेकी

गंपू ला त्याची आई एकदा खूप मारते, खूप म्हणजे खूप...
.
नंतर गंपू बाबांकडे जातो आणि विचारतो...
.
गंपू : बाबा, तुम्ही पाकिस्तानात गेला आहात का कधी ?
.
बाबा : नाही, रे.... पण का काय झाल????
.
.
गंपू : मग तुम्ही हा अतिरेकी कसा आणला...

मारियोची गर्लफ्रेँड

एक लहान मुलगा सुपर मारिओला भेटला आणि म्हणाला- "काय भावा, ओळखलं का मला ?"
मारिओ- "नाय रे , कोण तु ?"
मुलगा- "बस का भावा,विसरला का ? मी माझं अख्खं बालपण वाया घालवलं तुझी गर्लफ्रेँड तुला मिळवून देण्यात !
मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?
आई : पंढरपुरलां
मुलगा : बाबांचां?
आई : नागपुरला .
मुलगा : माझा आणि ताईचा ?
आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .
मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?

देव हरवला आहे

दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.

त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.

मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.

झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.

साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''

तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.

पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''

पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.

आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''

तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे''

'' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.

लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे''
छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,

"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रिम आहे का ?"

दुकानदार -" हो आहे ना..."

मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!"
सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो...
.
तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?"
.
...
पप्या काहीच बोलत नाही..
.
त्याचे वडील परत विचारतात .."
अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे ? ".
.
पप्या म्हणतो,
" अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!"
.