दसर्‍याच्या शुभेछ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दसर्‍याच्या शुभेछ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दसरा

आला दसरा, रमणीय सुखाचा हसरा।। आला....।।

माझे मम ही सीमा लंघा
शमवा अंत:कलिचा दंगा
परोपकारामाजी रंगा
दु:खा विसरा।। रमणीय....।।

अज्ञानाची संपो रात्री
लावा ज्ञानाच्या त्या ज्योती
भू-मातेची मंगल किर्ती
भुवनी पसरा।। रमणीय....।।

सदगुण-सोने आज लुटू या
दुर्गुण सारे दुरी घालवु या
निज-चित्तावर मिळवू विजया
हे ना विसरा।। रमणीय....।।

मनावर जरी विजय मिळेल
स्वातंत्र्यादिक सहज येतिल
भाग्यश्री ती धावत येइल
शंका न धरा।। रमणीय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७