katha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
katha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

न्याय जिवंत झाला! (१९४१)

"मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन! मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस!" केशवचंद्र म्हणाले.
"माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा; परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा!" भीमा म्हणाला.
"भीमा, जमीन नाही ना देत?"
"कशी द्यायची?"
"द्यायची की नाही ते सांग!"
"नाही, त्रिवार नाही!"
"याद राख! तुझी ही मगरूर वृत्ती तुला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. माझी गिधाडी दृष्टी तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही!"
"देव काही मेला नाही, केशवबाबा!"
"जेथे सत्ता नि संपत्ती असते तेथे देव असतो, समजलास! देव माझ्या तिजोरीत आहे!"
"माझा देव सर्व जग व्यापून राहिलेला आहे!"
"बघतो तुला वाचवायला कोण देव येतो ते! हे तुझे शेत गेले समज आणि तुला पैही न मिळता. आज मी तुला तू मागशील ती किंमत द्यायला तयार झालो होतो; परंतु तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू तरी काय करशील? ठीक तर!" असे धमकीचे भाषण करून केशवचंद्र निघून गेले.
शेतातील विहिरीच्या काठी भीमा बसला होता. त्याचे ते लहानसे शेत; परंतु खरेच सोने पिकवी. भीमाच्या वाडवडिलांच्या हातची तेथे झाडे होती. त्यानेही दोन-चार कलमे लावली होती. विहिरीच्या कडेला फुलझाडे होती. पलीकडे त्याचा लहानसा गोठा होता. भीमाचा शब्द ऐकताच गोठ्यातील गाय हंबरायची. खरोखरच त्या शेतावर भीमाचे जीव की प्राण प्रेम होते. ते विकणे त्याच्या जिवावर येत होते. केशवचंद्रांनी गावातील जवळजवळ सारी जमीन गिळंकृत केली होती. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. पाचाचे दहा झाले, दहाचे शंभर झाले आणि मग ते देणे कधी फिटायचे? शेताचे मूळचे मालक मजूर झाले. अजून हा भीमाच काय तो तेथे स्वाभिमानाने आपल्या शेताचा मालक म्हणून नांदत होता. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. गोडीगुलाबीने भीमा शेत विकतो का ते ते बघत होते; परंतु काही केल्या जमेना. आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली. सावकार का ही जमीन लाटणार? या जमिनीचा मी मालक. उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल? भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता. त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले.
इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.
"बाबा, आईने घरी बोलावले आहे." ती म्हणाली.
"कशाला ग, पोरी?"
"सावकार आला आहे घरी."
"काय म्हणतो तो?"
"आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.' बाबा, शेत का तुम्ही विकणार?"
"प्राण गेला तरी विकणार नाही. तुझी आई काय म्हणाली?"
"ती म्हणाली, 'त्यांना विचारा.' आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची. ती विकून कुठे जायचे?' "
"शहाणी आहे तुझी आई!"
भीमा मुलीबरोबर घरी आला. सावकार निघून गेला होता. बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.
"साप आहे तो मेला! तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!" तो म्हणाला.
"गावातील सारे शेतमालक मजूर झाले. त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!"
"त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला! जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही. समजलीस?"
काही दिवस गेले. केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली. भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे. जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे. न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले. पैशाने कोण वश होत नाही! भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले. केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते. त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता. भीमाची बाजू कोण मांडणार? तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला,
"महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे. वाडवडिलांपासून ही चालत आली आहे. सावकाराला बघवत नाही. हजार रुपये द्यायला तयार झाला होता..."
"हजार रुपये? थापा मार! त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?"
"देवाला माहीत आहे!"
"देव दूर आहे आभाळात. येथे तुम्ही आम्ही आहोत. कागदपत्रं काय सांगतात? हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?" वकील म्हणाला.
न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली. केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला. भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला,
"तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?"
"न्याय आमच्या हातात असतो, भीमा. देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो." वकील कुऱ्याने म्हणाला.
भीमा दु:खाने घरी गेला. तो कपाळाला हात लावून बसला.
"काय लागला निकाल?" बायकोने विचारले.
"आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला. आपण उद्यापासून मजूर झालो." तो दु:खाने बोलला.
त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते. परंतु करतात काय?
या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता. केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले. गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला. तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते. राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती. सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते. तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती. केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती. राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती. म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका. राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.
सभामंडप भरून गेला होता. आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते. नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती. आणि बारा वाजले. राजा आला वाटते? हां, हे बघा घोडेस्वार! आणि वाद्ये वाजू लागली. जयघोष कानावर आले. सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे? गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती. गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई. भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला.
"कोण मेले?" म्हाताऱ्या गुरवाने विचारले.
"न्याय मेला." भीमा म्हणाला.
"खरेच, न्याय उरला नाही." देवीचा तो पुजारी म्हणाला.
घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले, 'कोण मेले' म्हणून विचारू लागले. 'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.
"मोठ्याने घंटा वाजवा. न्याय मेला!" तरुण म्हणू लागले. एक थकला की दुसरा वाजवू लागे. तो थकला की तिसरा. सारा गाव दणाणून गेला.
तिकडे सभामंडपात राजाचा सत्कार होत होता. मानपत्र वाचले जात होते. परंतु त्या घंटेचा दाणदाण आवाज तेथे ऐकू येत होता आणि मानपत्र मात्र कोणालाच ऐकू जाईना.
"कसला हा आवाज?" राजाने विचारले.
"कोणी तरी मेले असावे. गावचा रिवाज आहे की, कोणी मेले तर घंटा वाजवायची." केशवचंद्र नम्रपणे म्हणाला.
"आमचे येणे म्हणजे अपशकुनच झाला म्हणावयाचा. कोण मेले, चौकशी तरी करा." राजा म्हणाला.
दोन घोडेस्वार चौकशीसाठी पाठवण्यात आले. देवीच्या देवळाजवळ अपार गर्दी होती.
"काय आहे भानगड? कोण मेले!" घोडेस्वारांनी विचारले.
"न्याय मेला!" लोक गर्जले.
ते घोडेस्वार आश्चर्य करीत आले. त्यांनी येऊन राजाला सांगितले, "महाराज, न्याय मेला!"
"मी जिवंत आहे तोवर न्याय कसा मरेल? चला, मला पाहू दे काय आहे भानगड ती!"
राजा रथातून निघाला, त्याबरोबर सारेच निघाले. कोणी घोड्यावरून, कोणी पायी निघाले. तिकडे भीमाने काय केले ते ऐका. तो लोकांना म्हणाला,
"आपण न्यायदेवाची एक प्रतिमा करून ती तिरडीवर ठेवू या. खांद्यावरून ती नेऊ या. 'न्याय मेला, हाय हाय; न्याय मेला, हाय हाय' असे दु;खाने म्हणू या!" सर्वांना ती कल्पना आवडली. एक तिरडी तयार झाली. तिच्यावर न्यायदेवतेची एक प्रतिमा निजवण्यात आली. खांद्यावर घेऊन लोक निघाले. 'न्यायदेव मेला, हाय हाय,' असे करीत ती प्रेतयात्रा निघाली.
तिकडून राजा हजारो शेटसावकारांसह, शेकडो सरदारजहागीरदारांसह येत होता आणि इकडून ती न्यायदेवाची प्रेतयात्रा येत होती. दोघांची वाटेत गाठ पडली. राजा रथातून खाली उतरला व तो शेतकऱ्यांकडे जाऊन म्हणाला,
"तुम्ही हे काय म्हणता? मी जिवंत असताना न्याय कसा मरेल?"
"या गावात तरी न्याय नाही!" भीमा म्हणाला.
"काय आहे तुमची तक्रार?" राजाने विचारले.
"महाराज, या गावचे शेतमालक आज मजूर झाले. ज्या केशवचंद्राने तुमचे स्वागत आज मांडले आहे, त्यानेच आमचे संसार धुळीला मिळविले. पाचाचे पन्नास केले नि साऱ्या जमिनी तो बळकावून बसला. महाराज, या गावातील सर्वांच्या जमिनी गेल्या तरी माझी उरली होती. केशवचंद्र म्हणे, 'हजार रुपये घे परंतु ती मला विकत दे!' मी जमीन विकायला तयार नव्हतो. तेव्हा खोटा खटला भरून माझ्याजवळून जमीन हिसकावून घेण्यात आली. न्यायाधीश पैशांचे मिंधे. वकील म्हणाला, 'देव आकाशात नसतो, पैशाजवळ असतो!' महाराज, खरेच का देव उरला नाही? न्याय उरला नाही? तुमच्याभोवती दागदागिन्यांनी सजलेली ही बडी मंडळी आहेत, आणि ही इकडची गरीब मंडळी पहा. या आयाबाया, ही आमची मुले. ना पोटभर खायला, ना धड ल्यायला. कसे जगावयाचे? श्रमणारे आम्ही. परंतु आम्हीच मरत आहोत. आम्ही सारे पिकवतो आणि हे खुशालचेंडू पळवतात. न्याय, कोठे आहे न्याय? वाडवडील म्हणत, 'जो नांगर चालवील तो खरा मालक.' परंतु आज गादीवर बसणारा मालक ठरला आणि आम्ही श्रमणारे चोर ठरलो, अन्नाला महाग झालो. महाराज, कोठे आहे न्याय? या केशवचंद्राने आम्हाला आज घरातून बाहेर पडू नका म्हणून बजावले. आम्ही तुमच्या कानांवर गोष्टी घालू अशी त्याला भीती वाटली; परंतु मला घंटेची आठवण झाली. न्याय मेला, तुम्हास कळवावे म्हणून आम्ही सारे घंटा वाजवीत बसलो."
"चला त्या मंडपात. मी सारी चौकशी करतो." राजा म्हणाला. सारी मंडळी सभामंडपात आली. एकीकडे श्रीमंत बसले. एकीकडे गरीब बसले. राजाने सारी चौकशी केली. केशवचंद्राचे गुन्हे सिद्ध झाले. तो पैसेखाऊ न्यायाधीश, तो वकील, सारे तेथे अपराधी म्हणून उभे राहिले.
"यांना कोणती शिक्षा देऊ? तोफेच्या तोंडी देऊ?" राजाने विचारले.
"त्यांना मारण्याची जरुरी नाही. ते आमच्यात राहोत. आमच्याबरोबर खपोत, श्रमाचे खावोत, त्यांची बुद्धी आमच्या कामी पावो, आमचा हिशोब ठेवोत. महाराज, या गावची जमीन साऱ्या गावाच्या मालकीची असे करा. सारे मिळून श्रमू. येथे स्वर्ग आणू. येथे नको कोणी उपाशी, नको कोणी चैन चालवणारा." भीमा म्हणाला.
"तुमचा प्रयोग यशस्वी करा. भरपूर पिकवा. नवीन नवीन उद्योग शिका. तुमचा गाव आदर्श करा. तुम्हाला छळणाऱ्यांवरही तुम्ही सूड घेऊ इच्छित नाही, ही केवढी उदारबुद्धी! मला राजालाही आज तुम्ही खरी दृष्टी दिलीत. सूडबुद्धीनं शेजारच्या राजाशी मी युद्ध करायच्या विचारात होतो; परंतु आता दुसऱ्या भल्या मार्गाने जाईन. शाबास तुमची! तुमचे समाधान झाले ना?" राजाने प्रेमाने विचारले.
"होय, महाराज!" लोक आनंदाने उद्गारले.
"मग आता काय घोषणा कराल?" राजाने विचारले.
"न्याय मेला होता, परंतु जिवंत झाला, अशी घोषणा करू." लोक म्हणाले.
राजा निघून गेला. केशवचंद्र व भीमा प्रेमाने एकमेकांस भेटले. तो गाव सुखी झाला, तसे आपण सारे होऊया.


लेखक - पांडुरंग सदाशिव साने
एका महानगरात
नौकरी गमावलेला एक तरुण
सिटीबस मधून उतरतो,
तेव्हा त्याच्या लक्षात येते
की त्याचे पाकीट चोराने
लांबवले. तो तरुण बुचकळ्यात पडतो.
कारण
त्याची नौकरी गेलेली असते
आणि खिशात फक्त १५० रुपये
आणि त्याने
त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते.
ज्यात त्याने लिहिलेले असते
की ,"माझी नौकरी मी गमावून
बसलो आणि तुला आता काही दिवस
पैसे पाठवू शकत नाही."
तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट
करू
की नाही ह्या मनस्थितीतच
त्याचे १५० रुपये आणि ते पत्र
चोरी होते.
१५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण
त्या तरुणासाठी ते १५००
रुपयापेक्षा कमी नव्हते.
काही दिवसांनी त्याच्या आईचे
पत्र त्याला मिळाले. तो तरुण
आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो.
त्याची आई ने पत्रात लिहिले
असते - "बाळ, तु पाठवलेले ५००
रुपयांचे मनीऑर्डर
मला मिळाले. काळजी घे
स्वतःची." तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो.
त्याला प्रश्न पडतो,
कोणी ५०० ची मनीऑर्डर
केली असेल. काही दिवसांनी परत
त्याला एक पत्र येते,
तोडक्या मोडक्या अक्षरात
लिहिलेले, वाचण्यास अवघड पण
३ ते ४ ओळीचे -
“प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए
अपनी ओर से मिलाकर
मैंने तुम्हारी माँ को..
मनीआर्डर.. भेज दिया है..।
फिकर.. न करना।
माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..!
वह क्यों भूखी रहे...?

तुम्हारा
— जेबकतरा भाई..!!!!!...

गोष्ट तीन आण्यांची.....

आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्‌.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्‌.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?' माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं बारक्यासाठी शेवंतूसाठि खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. पण दाढीचे केस पांढरे फेक झालेला मुल्ला तिला `म्हातारे' म्हणाला होता. बायला भारीच राग आला. कुणी `म्हातारे' म्हटलेलं तिच्या मुळीच कामी यायचं नाही.
म्हातारी काय म्हणून? अजून डोक्यावर पाटी घेऊन ४-४ मैल चालत होत अन्‌ डोळ्याला दिसत होतं. ती स्वभावाप्रमानं काहीतरी फटकून बोलणार होती, पण समोरुन मोटार येताना दिसली. बायनं चकटनं विचार केला, एस्‌.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
बायनं आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदारगडी वाटला. तो बायकडं बघून हसला. `काय पायजे आजी?' त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकलि आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. बाय हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?'
`आजे' `बाय म्हणतत माका' ती टेचात उत्तरली. ड्रॉयव्हर हसत म्हणाला,`बाय, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी~' बायचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली.
बांगडीवाला मुल्ला तोंडवासून आश्चर्यानं पाहत होत. गाडी हलली तसा तो ओरडलाच, `अगे म्हातारे -' पण बायला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं, एस्‌.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. बायनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. `बाय, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना? `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता! ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय?' `टुरिंग गाडीतनं.' बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,' `त्यांनी ते घेतलं? अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू!' दुसऱ्यानं माहिती पुरवली. `अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा' म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय' म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.

”मव्हाचे” झाड

एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत आसतात, त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते, एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले, आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले.
आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झाला. आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले.
..खूप दिवसांनी ज्या ठिकाणी
पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक ”मव्हाचे” झाड रुजू लागले. पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने ”दारू” बनवली.
.. आणि म्हणूनच.
ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिले तो पोपट होतो ..आणि पोपटा सारख बोलू लागतो.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..आणि कुणालाच मग तो ऐकत नही, मीच मोठा मोठा आसे तो करतो.
सगळ्यात शेवटी तो डुक्कर होतो.. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर चिखलात लोळतो त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो.

माणसाचे चार मित्र

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाडप्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....
तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभागअसतो.
तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो,""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हामाझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडेयेते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही'म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्यासंपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस... यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्तझालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

एक प्रेम कथा...

एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते, मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता, मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले. ...
मुलगा : मला आई लव यु बोल...
मुलगी : आई लव यु, आता तरी हळू चालव.
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आता तरी हळू चालव....
मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल.
मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले.
दुसरा दिवशी पेपरात बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण पावला पण ती मुलगी Helmet मुळे काहीहि इजा न होता वाचली.. कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail झाला होता.

अंधारात कसा चढणार डोंगर?

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती?

जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.

‘राम राम पाव्हनं का असं निजलात?’ म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.

शेतकरी म्हणाला, ‘‘राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.’’

म्हातारा हसला. म्हणाला, ‘‘अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?’’ ‘‘एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त
दिसतंय याच्या प्रकाशात.’’ तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ‘‘अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.’’

म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

आजचा संकल्प : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.