दारू-विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दारू-विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दारू व डॉक्टर

डॉक्टर(बेवड्या पेशंटला): तुमच्या आजाराचे नक्की कारण समजत नाहीये…
कदाचित दारू पिल्यामुळे असा होत असेल….
.
.
.
.
.
.
पेशंट: हरकत नाही….काय घाई नाय आपल्याला…तुमची उतरली कि येतो मी….
चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....

पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
पलीकडचा आवाज - मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे.
पलीकडचा आवाज - आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे.
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
पलीकडचा आवाज - जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे.
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग.
पलीकडचा आवाज - जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग...

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?

पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे????

दारूचे दुष्परिणाम

एक बेवडा रस्त्याने दारू पिवून झिंगत
झिंगत जात असतो…

पोलीस :- काय रे बेवड्या,
इतक्या रात्रीच कुठे फिरतोयस…?

बेवडा :- कुठे नाही, जरा “दारू प्यायचे
दुष्परिणाम” या विषयावर व्याख्यान
ऐकायला जातोय.

पोलीस :- इतक्या रात्री कोण देणार आहे
रे व्याख्यान?

बेवडा :- कोण नाय, माझी बायको..