उत्तरा केळकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उत्तरा केळकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपीतं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात समावतं, माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन झालं झालं आपससूक
हिरिदांत सूर्याबापा दाये अरूपाचं रूप

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझं येणं-जाणं वारा सांगे कानांमधी


गीत       -     बहिणाबाई चौधरी
संगीत    -     यशवंत देव
स्वर       -     उत्तरा केळकर