Marathi Katha : ऊन, वारा आणि पाऊस
चार वाजले. उतरते ऊन शाळेच्या पटान्गणात थबकले.
तिथे पीटी चे हातवारे करणार्या छोट्या छोट्या मऊशार केसांवर, गालावर उतरले.
तिथून ते कम्पाऊन्ड्वर रेन्गाळून थेट पलीकडल्या झाडावर सरकले.
पहिली अ चा वर्ग चुळ्बुळ करत होता. मॅडमनी फळ्यावर लिहिलेले शब्द उतरवून घ्यायचे होते.
Wind, Will Wish........
Rain, Pain, Gain....
शब्द उच्चारून मॅडम त्याचा मोठ्याने विशिष्ठ ठिकाणी जोर देऊन उच्चार करत होत्या, त्या शब्दावर बोट ठेवून. चीनूच तिथे अजीबात लक्ष नव्हत. त्याला मॅडमचे शब्द फक्त ऐकू येत होते, दिसत नव्हते. त्याची नजर त्या उन्हातच अडकली होती, त्याला मॅडमनी लिहिलेल्या शब्दाच्या उच्चारातले साधर्म्य कळून घेताच येईना. त्या शब्दमधला तसा संबंध त्याला कळेचना. त्याने फळ्यावरील नजर पुन्हा त्या उन्हाकाडे वळवली.
“लक्ष कुठे आहे तुझा चिन्मय” मॅडम म्हणाल्या, तस दचकून चीनूने पुन्हा फळ्याकडे पाहील.
“लिहिल की नाही चिन्मय?” मॅडमचा आवाज कानावर आदळलाच. चीनूने पेन्सिल घेतली. वहीत तीन रेषात शब्द लिहायच्याऐवजी ते शब्द कागदावर नुसते भिरकावले आणि तो पुन्हा त्या उन्हाकाडे पाहायला लागला.
एकदाची शाळा सुटल्याची घंटा झाली, तीही त्याला ऐकू आली नाही, पण इतर मुलानी दप्तर आवरली म्हणून त्यानही दप्तर उचलल. डबा आत टाकला, पण पाण्याची बाटली, रबर, पेन्सीली सारे काही तिथेच डेस्कमधे राहीले. तो मुलांबरोबर बाहेर पडला.
“चीनू तू पुस्तकाना कव्हर घातलीस??” वर्गातल्या एका मुलाने विचारल.
चीनूने उत्तर दिल नाही.
“चीनू, उद्या माझा हॅपी बर्तडे आहे, तू येशील?” तरीही चिनू गप्प.
"सांग ना, बोल ना चीनू !!” मुले चिनुच्या मागे लागू लागली.
चीनू अद्याप संपूर्ण वाक्य सलग बोलत नव्हता. सुटे सुटे दोन शब्द बोलायचा आणि तेही दोनचारदा विचारल्यावर. तेही सर्वांशीच नाही.
“चीनू तुझी चित्रांची वही मला देशील?” कुणीतरी पुन्हा विचारल.
चीनू मान हलवून हसला. त्याने दप्तरातुन वही काढून त्याला दिली.
“चीनू तुझ पूर्ण नाव काय?” चीनुला ते सांगायचच नसत मुळी.
तोही ईरेला पेटला. मुलानी आता चीनुभोवती फेर धरला. दप्तारावर ठेका धरून सुरू केल.
“चीनू, चीनू बोल बोल. चीनू बोल, चीनू बोल."
चीनूने समोरच्या मुलाला ढकलल. फेर तुटला तिथून तो निसटला, भराभर इन्द्रयणीच्या वर्गापाशी आला.
मॅडम कसल्याशा गाण्याची रिहल्सल घेत होत्या.
.....वारा सुटला तुफान,
उडती झाडांची पाने…......
बाहेरही खुपसा वारा सुटलेला, झाड एकमेकांवर रेलत होती. तो सुटलेला वारा आता चिनुला वर्गातच दिसला. सारा वर्ग त्या वार्याने लपेटलेला गेलेला. मुलींचे केस उडत होते. मॅडमनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे उडू पाहत होती, खडूचा चुरा सान्डत होता.
इंद्रायणीचा तिसरी "ब" चा वर्ग आता सुटला होता. बसचे होर्न वाजत होते.
इंद्रायणी मुलांच्या लोंढ्याबरोबर बाहेर आली तिने चिनुचा हात धरला आणि ती पळायला लागली.
“चीनू चाल लवकर, होर्न वाजतोय” ती म्हणाली. तिच्याबरोबर पळताना तिच्या वर्गात असाच ठासून भरलेला गाण्यातला वाराही चिनुच्या अंगाला बिलगला. कानात शिरला. आता त्याने इंद्रायणीचा हात सोडला आणि तो पळत पळत इन्द्रयणीच्या आधी बसमधे चढला. इंद्रायणी बसमधे चढली आणि बस सुरू झाली.
“चीनू तू रोजच उशीर करतोस” त्याच्या खिडकीच्या सीटजवळ बसलेला पराग म्हणाला. त्याने त्याला त्याची जागा दिली नाही. चीनू हट्टाने तिथेच उभा राहिला.
“चीनू तू इथे ये माझ्या जवळ” इंद्रायणी म्हणाली तसा चीनू धुमसत तिच्या जवळ आला.
"आपण उशीर केला ना? मग आपली सीट कशी राहील रे?" ती त्याला समजावत म्हणाली
बस सुरू झाली. तसा खिडकीतून वारा आत आला. नुकताच पाऊस सुरू झाला होता. जशा शाळा सुरू झाल्या तसा....
कदाचीत…. पाऊस येण्यापूर्वीच….....
"wind" चीनू बसच्या खिडकीबाहेर बोट दाखवून म्हणाला.
खर म्हणजे तो वाइंड फळ्यावरचा नव्हताच, तो इन्द्रयणीच्या वर्गातला होता. ....….चिनूं पाहील, त्या शाळेच्या भिंतीवरचा ऊन्हाचा पट्टा पलीकडे सरकून दूर कुठेतरी लांब झाडाच्या शेंड्यावर जाऊन शिष्टासारखा बसलेला. गोळा होऊन!
"ऊन" चीनू काहीसा मोठ्याने म्हणाला. इंद्रायाणीने त्याच्याकडे पाहील.
मघा तो "Wind" म्हणाला, आता तो "ऊन" म्हणतोय. या दोन शब्दमध्ये तिला काही दिसल नाही, जे चिनुला सापडल होत.
एरवी तिला चिनुच तुटक तुटक दोनतीन शब्दाच बोलण बरोबर कळायच. त्याच्या दोन शब्दातली रिकामी जागा बरोबर कळायची.
ती फक्त हसली त्याच्याकडे बघून. . तोही हसला सुरेखस. असा आतून हसला की त्याच्या गालाला गोड खळ्या पडत. आताही त्याच्या त्या खळीला बोट लावून ती म्हणाली "कुठे आहे ऊन?”
त्याने बोट दाखवल. आता ऊन असलेली ती झाडांची टोक मागे सरकलेली.
ते ऊनहि विस्कळीतसे…......... ते बसबरोबर पळतही नव्हते आणि एका जागी थांबलेही नव्हते
ते फक्त मधून मधून दिसत राहीले. .
मग बस त्याच्या बिल्डिंगजवळ थांबली, ते आता पुसलेच सगळे.
चीनू उडी मारुन उतरला.
“चीनू दप्तर………….!” इंद्रायणी ओरडली. “अरे वॉटर बोटल??”
“क्लासरूम…..” “त्याने संगितल.
"आई ओरडेल हा”. ती म्हणाली
त्याला पर्वा नव्हती. तो पुढे गेला मघाचे ऊन आता चक्क त्याच्या बिल्डिन्गवरच राहायला आलेले.
त्याने इंद्रायणीचा हात पकडला, हलवला. तिला ते दाखवले.
“ऊन” तो पुन्हा म्हणाला
“येस” ती आनंदाने म्हणाली. तिला त्याच्या ऊन्हापर्यंत पोहोचता आले होते.
चीनू आता बिल्डिंगासमोरच्या ग्राऊन्ड्कडे धावला. इंद्रायणी घरी चल म्हणत होती पण तिचा न ऐकता तो तिकडे धावला.
अजुन मुले यायची होती. पण काही मुल प्लास्टिकची रिंग घेऊन ती भिरकावत होती. रिंग दूर फेकण्याचा तो खेळ. चीनूने पाहील त्या मुलांची रिंग काही फारशी दूर जात नव्हती. पुष्कळदा पायाशीच नाहीतर थोडीशी दूरवर जाऊन पडत होती. मूळ विरसत होती चिनुला काही कुणी खेळायला घेतल नव्हत पण तरीही त्याने स्वतःच्याही नकळत ती रिंग उचलली आणि त्या मुलानी काही म्हणायच्या आत भिरकवालीसुद्धा!!
ती त्याला नेम धरून बिल्डिंगावरच्या त्या ऊन्हावर फेकायची होती पण ती त्या ऊन्हावर पोचलीच नाही. पण ग्राऊन्ड्च्या टोकाला लांब उभ्या असलेल्या झाडांच्या फांदीत जाऊन अडकली. इतक्यात लांब मुलानी टाळ्या वाजवल्या. अडकलेली रिंग कुणीतरी काढून आणली.
“अजुन एकदा” आणि ती रिंग त्या मुलानी आपण होऊन चिनुच्या हातात दिली.
ती पुन्हा भिरकावताना चिनुला वार जाणवला, तो रिंगबरोबर धावत गेलेला दिसला. आणि ऊनही. त्याला “विंड” आणि “ऊन” या दोन शब्दाच्या मध्येच जणू ती रिंग भिरकवायची होती. आता मात्र नेम चुकला नाही. वार्याबरोबर ती रिंग भिरभिरत गेली आणि चक्क त्या भिंतीवर पडलेल्या ऊन्हाला भोज्जा करून तिथेच पडली.
मुलानी पुन्हा जोराने टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्यांच्या आवाजात तो मोठ्याने म्हणाला, “Wind, ऊन……………”
त्याचे ते शब्द कुणालाही ऐकू गेले नाहीत. अगदी इंद्रायणीलसुद्धा नाहीत. ती त्याला घरी चलण्याची घाई करू लागली
रंगलेला खेळ सोडून चीनू मुकाट्याने तिच्याबरोबर दुसर्या मजल्यावर आला.
तिथे दोघेही सामोरा समोर राहत. दोघांच्याही आया दारातच उभ्या होत्या.
“इतका वेळ का झाला चीनू?” आईने दारातुनच विचारल.
तर चीनू म्हणाला “विंड” खर तर त्याला म्हणायाच होता रिंग. पण ते न म्हणता तो नुसतच विंड विंड म्हणत बसला.
या विंडमधे आणि रिंगमधे काहीतरी वेगळच साम्य आहे. भिरकावताना रिंग म्हणजे विन्ड्च होते. चक्क! पण हे चीनूला सांगता नाही आल.
“चीनू खाली रिंग खेळत होता. अशी मस्त फेकली आई रिंग, झुईई करून!" इन्द्रायणी दारातून आत गेली. इकडे चीनूही. दोन्ही घराची दार बंद झाली. चीनूच दप्तर आईने घेतल.
"डबा नाही खाल्ला रे? आणि वॉटरबॉटल, कम्पास रिकामाच, काय रे चीनू??" आईने विचारल.
आपण वॉटरबॉटल का नाही घेतली हे त्यालाही आठवल नाही. आईने आता त्याची वही उघडली.
आठवडी नोन्दीत रिमार्क होता “सारख्या उच्चारांचे शब्द चीनूला कळत नाहीत” तेच फळ्यावरचे शब्द टिचरने
लिहीलेले होते –
wind, will, wish....
pain, gain.....
आईचा चेहरा उतरला. कस व्हायच या पोराच!! तिने चीनूला जवळ घेतल. अगदी जवळ, मग एका कोरया कागदावर तेच शब्द लिहिले.
मग चीनूला पुन्हा जवळ घेऊन संगितल.
“बघ चीनू या सगळ्या शब्दात काहीतरी एक कॉमन आहे. तिकडे बघ” पण चीनूच अजीबात लक्ष नव्हत.
मग आईने गणिताची वही उघडली. दोन अंकी बेरीज वाजबाकी…..त्यात फारस काही चुकलेल नव्हत.
तस जरास सुखावून आईने विचारून पाहील “वींड म्हणजे काय रे चीनू?”
तसे चीनूचे डोळे चमकले.
“वारा“ तो पुटपुटला. तो नेमक काय म्हणाला हे आईला धड समाजल नाही, पण वींड म्हणजे काय हे समजल्यासारखा चीनूचा चेहरा चमकत होता. “वींड” म्हणजे काय ते चीनू आता चक्क स्वतःच्या आत अनुभवतच होता. आणि ते अनुभवण याला फक्त एकाच शब्द होता “वारा” चीनू आता जरा मोठ्यानेच म्हणाला.
चार वर्षाचा झाला तरी चीनूला त्याची भाषा बोलता येत नव्हती. केव्हातरी एकदा पाणी असा म्हणालेला त्यावरून मुका नाही हे तर कळाल. ऐकू ही येत होत, “लाख शब्द कानावर पडतात तेव्हा मुल पहिला शब्द बोलत. चीनूच्या आईला स्पीच थेरेपीस्टने सांगीतल. प्रत्यक्ष बोलता नाही आल तर आपापल्या परिसराशी निगडीत असे पाचशे तरी शब्द आणि वस्तू मुलाला माहीत असायला हवेत, असे चाईल्ड डेवलपमेंटच शास्त्र सांगत होत. चीनूच्या आईला एकुणच चीनूची फार काळजी वाटत होती. चीनू पूर्ण वाक्य बोलत नव्हता. त्याचा संवाद त्याच्या स्वतःशीच होता. तो बोलत असलेले शब्द हे एकएकटे, सुटे आणि स्वातंत्र होते आणि त्यामधले साहचर्य कुणाला कळत नव्हते.
आपल्या भोवतालच्या जगातून शब्द उचलून भाषा घडण्याच्या त्या काळात चीनू मुळी असा तोंड मिटूनच बसला होता. चीनीच्या आईला याचीच फार काळजी वाटत होती. त्याचे बाबा सकाळी ओफीसाला जातात ते रात्रीच उगवतात.
र्या
कसा व्हयायच या मुलाच?
सुरुवातीला चीनूची आई त्याला स्पेशालिस्टकडे घेऊन गेली. त्याला सचीत्र तक्ता दाखवला. “बी” पासून सुरू होणार्या शब्दानी सुरूवात झाली. "बॉल" त्याच्या ओळखीचाच होता. “बॉय"ला तो म्हणाला "चीनू". "बॅकेट"जवळ आला तेव्हा बदलीत नळ सुटलेला, पाणी वहात होते. तर म्हणाला “न्हाऊ न्हाऊ!!”. मग आईचा पदर ओढून म्हणाला “पाणी बंद” ते ऐकून स्पेशालिस्ट थोडी हसली.
"याला बॅकेट शब्द उच्चारता आला नाही पण बकेटचा अर्थ समजला. चित्रातले वाहते पाणीही बंद करायला हवे हे तो तुम्हाला सांगतो. याची केस होपलेस नाही. तुम्ही सारख बोलत रहा त्याच्याशी. त्याच नाव, शाळेच वडिलांच नाव……
मग परेडच सुरू झाली,
“वॉट इज यूवर नेम?”
“चीनू”
“नो फूल नेम?”
“चिन्मय अविनाश”
“यूवर स्कूल नेम?”
“एव्हर ग्रीन स्कूल!!”
“नाऊ टेल मे द ग्रीन कलर इन इट?”
रंगाच्या तक्त्यातले रंग समोर ठेवून आलेला प्रश्न. आणि तक्ता बाजू सारून बाहेरच्या आसमन्तात त्या हिरव्या रंगकाडे दाखवलेले बोट …….
बाहेरचे रंग समजतात तर पुस्तकातले का नाही?............
आताही घरातल्या न आवडलेल्या भाजीशी पोळी खाऊ घालताना आई काही विचारतच होती. ताज्या पावसान झाड तरारत होती. प्रखर ऊन्हान काळपटलेला पानांचा रंग तर स्वतः झाडच विसरून गेलेली. फांद्या वार्याने सळसळत होत्या. चीनूच तिकडेच लक्ष गेल. त्याला पुन्हा तो “विंड” शब्द सापडला. पण तो जोडता आला नाही. झाड वेगळ सळसळत ऊभ होत आणि वारा तर आता झाडावरून उतरून थेट आत आलेला. त्याने चीनूला स्पर्श केला त्याचे केस उडवले, कॅलेंडर खाली पाडल, आई चिडली. त्यानच चीनूच लक्ष ऊडाल, अस तिला वाटल. तीन खिडकी बंद केली.
"नो. नाही . चीनू रागान म्हणाला. बंद खिडकीवर त्याने रागाने बुकक्या मारल्या
"काय चालू आहे चीनू?" आई रागाने म्हणाली. चीनूने बंद खिडकीकडे बोट दाखवल आणि घुशश्यातच म्हणाला “विंड”!!
पण आईला आता त्याला शिकवायच होत.
“व्हॉट इस युवर टीचर’स नेम?”
चीनू ओठ घट्ट मिटून.
आईने पुन्हा विचारल, आवाज चढवून.
तो म्हणाला “खिडकी”- तिकडे बोट दाखवून, ती त्याला उघडायालाच हवी होती.
“तुझ्या टीचरच नाव सांग, नंतर.”
“लीना”
“नुसता लीना?” आईचा आवाज पुन्हा चढलेला.
“लीना मॅडम”
मग एकदाचा तो तास संपला.
आज इंद्रायणी बोलवायला आली, “ग्राऊन्ड्वर चलतोस का??” म्हणून पण आईने होमवर्कसाठी रोखून धरल. "डायारीत टीचरचे रिमार्क्स वाढत आहेत"
“आम्ही खेळून आल्यावर करू न” इंद्रायणीने त्याच्यातर्फे आश्वासन दील.
“नाही मग झोपेला येतो तो. आणि सकाळी साडेआठला बस येऊन उभी राहते.” आई आपल्या निश्चयावर पक्कीच. खालून खेळण्याचे खूप सारे आवाज येत होते. मग इंद्रायाणीने चीनूकडून कसाबसा अभ्यास करवून घेतला. त्या विंड, विल शब्दाच्या ओळीत तसेच कितीतरी शब्द येऊन हजर होते तिथे!
होमवर्क संपवून दोघही ग्राऊन्डवर आली. ग्राऊन्ड्च्या कडेला गवताचे पुंजके होते. तिथे एक फुलपाखरू येऊन बसल. चीनू जवळ गेला तर ते ऊडूनच गेल. आणि चीनूला एक नवा शब्द सापडला “फ्लाय”…..चीनून इंद्रायणीचा स्कर्ट ओढला आणि पुन्हा तो नवा शब्द उच्चारला. "फ्लाय”
“हो, हो” इंद्रायाणीने टाळ्या वाजवाल्या फुलपाखराच ते चिमुकल ऊडण आपल्या खेळात घेताना त्याना फार गंमत वाटली. वार अजूनही होतच, ते तिथल्या हरेक वस्तूला स्पर्श करतच होत. चीनूला चक्क दोन शब्द जवळ जवळ सापडले. “विंड” आणि “फ्लाय” ते मोठ्याने उच्चारून त्याने विजयाने इन्द्रयणीकडे पाहील. तिलाही तो काय म्हणाला ते समजल. चीनू आता ग्राऊन्ड्रच्या आडव्या उभ्या लोखंडी बार वरुन झरझार वर चढला.
इंद्रायणी चढली नाही. ती मैत्रिणींशी खालीच खेळत राहिली. वर चढल्यावर चीनूला वार हातातच आल्यासारख वाटल. ते माघच फुलपाखरू आता उडून झाडावर बसल. आता त्याचा मघाचा रंग ओळखू येईना. तो झाडातच मिसळला. त्याचा रंग आता चीनूला एकदमच समजला. पिवळा- हिरवा किवा दोन्हीचा मिळून.
“येल्लो – ग्रीन” तो एकदम मोठ्याने म्हणाला. पण त्याचे शब्द ऐकणारे जवळपास कुणीच नव्हते. ते त्याचे त्यालाच ऐकू आले. वरच्या बारवर तर वार मस्तच सुटलेल. “ग्रीन” तो पुन्हा म्हणाला.
“विंड, फ्लाय, ग्रीन” तो ते तीन शब्द ओळीने म्हणाला. मोठ्यानच. जणू वार्यानेच जवळ आणले.
“अंधार पडला, चल” म्हणून सांगायला इंद्रायणी खाली आली तर तिला ते ऐकू आले.
“काय म्हणालस? म्हण पुन्हा?” ती म्हणाली.
आता मात्र चीनूला ते तसेच पुन्हा ओळीने उच्चारता आले नाहीत. ते पुन्हा वार्यानेच इतस्तः केले होते!
“खाली ये चीनू “ ती म्हणाली
सगळे पांगले. आता ग्राऊन्ड्वर अंधार घेरून आला. पावसाळी अंधार, झाडांचा हिरवा रंग काळा पडत चालला. ग्राऊन्ड्मधल्या एकुलत्या एक दिव्याभोवती पंखाचे छोटे छोटे किडे जमले. बाकी सारा अंधार. घराघरातून दीवे लागलेले. ते खिडक्यातून डोकावत होते, पण बाकी अंधार. चीनू सरसर खाली उतरला आणि उतरल्याबरोबर त्यान इंद्रायणीला सांगितल “ब्लॅक”
“ब्लॅक, काय? अंधार!! चीनू तुला डार्क म्हणायच आहे का?”
चीनू रडवेला झाला. त्याला डार्क म्हणायच नव्हत. त्याला रंगच सांगायचाय, तो गोन्धळला. मघाचे ओळीने उभे असलेले शब्द पुन्हा सुटे, वेगळे झालेले त्याच्या चिमुकल्या जीवाला पेलवले नाहीत. तो रडवेलाच झाला. त्याने इंद्रायणीला मारायला कधी नव्हे तो हात उगारला.
“काय झाल? काय झाल चीनू?” तीन त्याला जवळ घेतल, खूप जवळ. आज तिला त्याची भाषा काळत नव्हती दोघ निशब्द घराकडे वळली.
चीनूच्या दारात अनोळखी चपला होत्या ते पाहून तो जास्तच बुजला.
काहीतरी समजलेल आपल्याला इंद्रायणीला सांगता नाही आल हे त्याला चांगलच जाणवल.
आता कुणी अनोळखी लोक आलेले, त्याच घर त्याला एकदम परकच होऊन गेल. घरी त्याच्या बोलण्याबद्दलच सुरू होते सगळे!
“लागला का चिन्मय बोलायला?”
“हो, थोड थोड”
“आता तर सगळच बोलायला पाहिजे त्याने”
“हो न”
“एक्सपर्ट काय म्हणतात?”
“त्याचा प्रॉब्लेम मल्टिपल लँग्वेजचा असु शकतो. शाळेत इंग्रजी, घरी मराठी, कॉलनीत हिंदी, मराठी, बंगाली.”
“खर म्हणजे वेगवेगळया भाषेतूनच मुल स्वतःची भाषा तयार करतात”
सगळा बोलण आपल्याबद्दलच सुरू आहे हे चीनूला समजल, स्वतःतला अभाव खोलवर रूतला.
“तुझ नाव सांग?” कुणीतरी सुरू करून दिल.
चीनूला नाव अजीबात सांगायाच नाही.
“नाव सांग चीनू” आईनही संगितल.
“ब्लॅक” तो म्हणाला त्याला रंगाबद्दल काही म्हणायचय आणि आईला नाव हव होत. आईचा चेहरा पडला.
"नाव सांगतो तो चांगल. पूर्ण नाव सांगतो” आईने चीनूचा विश्वास जतवला.
साडेआठला बाबा आले. मग मात्र सगळी मरगळ झटकून घर हसायला बोलायला लागल. इन्द्रयणीशी जुळते तशीच बाबा आणि चीनूची वेगळीच भाषा होती.
“काय केलस चीनू आज?”
रिंग फेकण्याचा आविर्भाव करून चीनूना संगितल.
बाबाना गंमत वाटली.
“खूप लांब गेली?”
चीनूचे डोळे चमकले तो एकदम म्हणून गेला “ऊन, ऊन”
बाबानी विचारल, तस चीनू म्हणाला “फ्लाय”
“काय फ्लाय? कोण ऊडाल?”
“बटरफ्लाय” चीनू म्हणाला मग बाबानी वेगळ काही विचारायच्या आतच तो म्हणाला “ग्रीन”
“ग्रीन म्हणजे हिरवा” बाबा म्हणाले, “कुणाचा रंग हा चीनू? झाडांचा?”
“बटरफ्लाय, फुलपाखरू” चीनूने आता मराठी आणि इंग्रजी दोन्हीत संगितल. त्याला एकदम काहीतरी सापडून गेल. तो आलटून पालटून “बटरफ्लाय, फुलपाखरू” म्हणायला लागला.
फुलपाखरू हिरवे पिवळे अशा मस्त रंगाचे होते न?? बाबा म्हणाले तस चीनू म्हणाला “येल्लो” हो ते पिवळेही होतेच.
“कुठे पाहिलस तू चीनू?”
“ग्रास, गवत,” चीनू खुश.
फुलपाखराचा रंग आता हिरवा पिवळा. काळा नाहीच. अजूनही एकदोन रंग फुलपाखरात होतेच. ते शोधत असतानाच चीनूला गाढ झोप लागली.
****************************************************
आज चीनूच्या वर्गाची पी टी होती.
हात वर खाली करता करता चीनूच लक्ष गेल.
आभाळ खूपच भरल्याने दूरवरून कुठून पाऊस येतोय.
त्या रिंगसारखाच भिरभिरत. वार्यात मिसळलेल ते पावसाच येण चीनूला पीटी करताना दिसल. तो जसा धावतो तसाच तो पाऊसही पळतच येत होता. वारा त्याला पुढे ढकलतोय.
“चिन्मय लक्ष कुठे आहे तुझ? सरळ उभा रहा" पिटीच्या मॅडम म्हणाल्या.
चीनू पार हरवलाय, त्याला वीन्ड्च्या शेजारी आता एक नवा शब्द सापडला आहे. “रेन, पाऊस”
तो पाऊस लीना मॅडमनी दिलेल्या ओळीत उभा नव्हता, तो वीन्ड्शेजारीच उभा होता. दूरवरून तो पाऊस आता कंपाऊंडपर्यंत पोचला. त्यावरून ऊडी मारुन तो आत येईलस, चीनूला वाटल. पण त्याला ऊडी मरावीच लागली नाही.
तो विंड! त्यानच ढकलल त्या पावसाला. आणि तो पाऊस एकदम ग्राऊन्ड्वरच आला. मूलाना भिजायला मस्त वाटल. चीनू तर स्वतःभोवतीच गोल गोल फिरायला लागला. कंपाऊंडवर बसलेले पक्षी भिजून बाजूच्या फांदीवर बसलेले चीनूने पाहिले.
पाऊस वाढला. मग भिजणहे सम्पल. शाळा सुटली. घंटा होण्याआधीच सगळ्यानी भरभरा वर्गातून दप्तर घेतली. चीनू दप्तर आणायला वर्गात गेलाच नाहि. तो सरळ इंद्रायणीच्या वर्गापाशी आला. तिचाही वर्ग सुटलाच. इंद्रायणी घोळक्यातून बाहेर आल्यावर चीनूने तिचा हात ओढला आणि तिला व्हरांड्यात आणल. आडवा तिरपा पाऊस – त्याने सगळा व्हरांडा भिजलेला.
चीनून दूरवर मघा पाऊस येताना दिसला, तिकडे बोट केल पण आता पावसाच तस येण पुसलच गेल. सर्वत्र पाऊसच! त्याचे कुठून येणे कुठे जाणे आता चीनूला कळेचना.
मग हातात हात घेऊन दोघ त्यांच्या बसकाडे धावली. त्याना घेताच, बस आज सुरू झाली नाही. अजून मुल यायचीच होती. चीनू इंद्रायणीजवळच बसला आणि त्यान तिला हळूच संगितल. बुजत, घाबरत, दोन शब्द जोडुन “रेन कम”!
मग तो जरा धिटाईने म्हणाला “विंड कम”!
आता जास्त विश्वासान म्हणाला “ चिमणी फ्लाय” मग स्वतःलाच काहीतरी नवीन सापडल्यासारख म्हणाला “बटरफ्लाय”
आता इंद्रायणीने त्याच एक गाणच बनवल.
पाऊस येतो, वारा येतो,
चिमणी ऊडते, ऊडते फुलपाखरू,
चीनू भिजतो, आम्ही भिजतो,
भिजले फुलपाखरू…………….
इथपर्यंत आल्यावर बस सुरू झाली. सगळी मुल आलेली. शेवटली ओळ मग इंद्रायणीने “बस झाली सुरू” अशी म्हणून टाकली,
“म्हण चीनू” इन्द्रायणी म्हणाली. चीनू थोडासा बावरला. मग म्हणाला “रेन कम, विंड कम”
आता पूर्ण बसच गाण म्हणायला लागली. ठेक्यात आणि तालात. चीनूही त्यांच्या सोबत म्हणू पाहत होता,
चीनूला इंद्रायणीच ते गाण आवडल. ते त्याला आवडलेल्या रेन आणि विंडबद्दल आहे हेही समजल. एका कळण्यातून दुसर कळण आणि दुसर्यातून तिसर……..
चीनूच्या घरपाशी बस उभी रहिली.रहिली.इन्द्रायणी आणि तो उतरले. आज ग्राऊन्डवर कुणी नव्हत. फक्त एक भिजलेल फुलपाखरू त्या गवताच्या पुंजक्यावर.
“फुलपाखरू” चीनू एकदम स्पष्ट म्हणाला.
“येस” इंद्रायणी आनंदाने चित्कारली, “ बघ चीनू, हे फुलपाखरू भिजल, थंडी वाजतेय त्याला!!”
बसमधल गाण म्हणत म्हणत इंद्रायणी चीनूसोबत आपल्या मजल्यावर आली.
दोघांची दार उघडीच होती, आया दारात वाट बघत.
भिजलेल्या दोघाना बघून आईने विचारल “अग छत्री?”
“छत्री, बसमधे राहिली” इंद्रायाणीने संगितल हसत हसत.
“चीनू, आणि दप्तर रे!!” आईने विचारल.
चीनू गालाला छानशी खळी पाडत गोड हसला.
मग दारातून आत शिरण्यापूर्वीच त्यान सुरू केल, अजुन आपल्याच घराच्या दारात उभ्या असलेल्या इन्द्रायणीकडे तिरपे पाहत मघाच इंद्रायणीच गाण!
पाऊस येतो…….
वारा येतो……..
चिमणी ऊडते………
ऊडते फुलपाखरू…….
चीनूचे उच्चार बरेच स्पष्ट होते. तो ते गाण पाठच म्हणत होता.
……….यातले रंग त्याला अखेर शब्दात सापडलेच, तो वेगान आणि विश्वासान आईकडे झेपावला.
समाप्त.
लेखिका : आशा बगे
मे आय स्पिक तू 'समेश बारटक', आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HSBC …?"
सकाळी सकाळी फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं.
"येस, थिस इज सोमेश स्पिकिंग", मी उत्तरलो.
"वुई हॅव .. ", मी सोमेशच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एकविनंती केली :
"तुम्ही कृपया मराठीत बोलाल का ? कॅन यू प्लिज स्पिक इन मराठी ?",
"नो सर आय कॅन नोट ..", तिकडून उत्तर.
"सॉरी सर, आय ऍम नॉट इन्टरेस्टेड इन इट इफ यू आर नॉट ऑफरिंग इन मराठी !" , मी.
खट्क् .. मी फोन ठेवला.
गेल्या महिनाभरात आज झालेला हा तिसरा प्रसंग. बॅन्केकडून सेवा विकण्याविषयी फोन आला की त्यांना 'मराठीत सांगा, नाहितर जमणारनाही.' हा हेका मी धरला आहे, एकदा एकाने मराठीत सगळ सांगितलं. :)
लिहिण्याच कारण :
यात आपलं काहिच नुकसान नाही, झाला तर फायदाच, मराठीत सांगा हा हेका धरला तरच मराठी भाषेत व्यावसायिकसंवाद उपल्ब्ध होईल, टेलिबॅन्किंग मधे तो पर्याय येईल, मराठी नोकरया वाढतील , या शस्त्राचा वापर आपणही करावा ही विनंती
~ विजेंद्र