संत सोयराबाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत सोयराबाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रंगि रंगला श्रीरंग

अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥

नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥

देही असुनि तूं विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥

पाहते पाहणें गेले दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥



रचना    -     संत सोयराबाई
संगीत   -     किशोरी आमोणकर
स्वर     -     किशोरी आमोणकर
राग      -    भैरवी