vinodi charolya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vinodi charolya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एप्रिलफूल

फुलराजाने फुलराणीला फुलांच्या फुलदाणीत फूल देऊन शुभेच्छा दिल्या.
तो म्हणाला, 'हे फुलराणी, तू फुल टू ब्युटीफुल, वन्डरफुल
आणि सगळ्या फुलात कलरफुल.
माझ्या भावना आहेत ख-याखु-या. समजू नकोस त्याला एप्रिलफूल.'

प्रेमपत्र

अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र
भूगोलाच्या मास्तरांना कळेना
मुलांचा इतिहास
अभ्यास न करताही
पोरं कशी होतात पास ?

बायकोच्या माहेरी

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!
तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!
माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!