भास्कर पाळंदे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भास्कर पाळंदे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
ㅤㅤㅤㅤㅤㅤआई, थोर तुझे उपकार॥ध्रु॥
वदत विनोदें, हांसत सोडी
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण दुधाची धार॥१॥
नीज न आली तर गीत म्हणे
ㅤㅤㅤㅤㅤㅤप्रेम जिचे अनिवार॥२॥
येई दुखणें तेंव्हा मजला
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण करी उपचार॥३॥
कोण कडेवर घेउनि फिरवी
ㅤㅤㅤㅤㅤㅤचित्तीं लोभ अपार॥४॥
बाळक दुर्बळ होतों तेंव्हा
ㅤㅤㅤㅤㅤㅤरक्षण केलें फार॥५॥
त्वांचि शिकविलें वाढविलें त्वां
ㅤㅤㅤㅤㅤㅤआहे मजवर भार॥६॥
स्मरण तुझ्या या दृढ ममतेचें
ㅤㅤㅤㅤㅤㅤहोतें वारंवार॥७॥
नित्य करावें साह्य तुला मी
ㅤㅤㅤㅤㅤㅤहा माझा अधिकार॥८॥


कवी - भास्कर दामोदर पाळंदे