बेगडी तेजाळुनी अंधारतो मी शेवटी
जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी
खूपदा परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी शेवटी
अडगळीला फेकतो जागेपणी स्वप्ने जरी
शोधुनी… झोपेत ती साकारतो मी शेवटी
फक्त मुद्देसूदही बोलून कोठे भागते?
लाच मौनाची जगाला चारतो मी शेवटी
फायदा उंचीमुळे झाला कुठे काही मला?
माणसांची छप्परे शाकारतो मी शेवटी
राग माध्यान्ही कुठे सूर्यावरी मी काढतो?
सांजवेळी सावली पिंजारतो मी शेवटी
मान खाली घालुनी बाहेरच्यांना सोसतो
आपल्यांच्यावर घरी फुत्कारतो मी शेवटी
लाभली खोटे खर्याला मानणारी माणसे
थाप वैतागून त्यांना मारतो मी शेवटी
तत्ववेत्ते, संत, जेते, शंभरावरती कवी
संपले ते सर्व की आकारतो मी शेवटी
ग्रंथ अभ्यासून जेव्हा ओळही नाही सुचत
आत डोकावून… बाजू सारतो मी शेवटी
एकदा माझ्याघरी येऊन अभ्यासा मला
जिंकतो तो ‘बेफिकिर’ अन हारतो मी शेवटी
- बेफिकीर
गंभीर कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गंभीर कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे
सहनशिलतेचा येथे संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचा सरंजाम आहे
गवताची पाती सजली भयाण राती
काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे
शुरतेचे निशान फडकते रणांगणी
पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे
यल्गाराचा दबला आवाज येथे
उगाच खोट्यांचाच चित्कार आहे
जरी आज भयाण शांतता इथे
येणार उद्या मोठ वादळ आहे
समाजात माथेफिरुंचा सरंजाम आहे
गवताची पाती सजली भयाण राती
काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे
शुरतेचे निशान फडकते रणांगणी
पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे
यल्गाराचा दबला आवाज येथे
उगाच खोट्यांचाच चित्कार आहे
जरी आज भयाण शांतता इथे
येणार उद्या मोठ वादळ आहे
गूढ जन्म
जिथे जीव जडतो
स्वप्ने पाहू लागतो
जळतात फुले तिथे
प्राणात तम भरतो
हे प्राक्तन कसले
सूड भरल्या हाताने
कुणा सटवीने लिहले
मज कळेना असले
का पाहूच नये ती
बाग फुलांनी भरली
का धावूच नये ती
वाट हिरवळ दाटली
हा छंद तारकांचा
का मनातून जाईना
रुतले पाय मातीत
नजर खाली ढळेना
हा जन्म गूढ कोण
कुण्या वाटेवर चालवी
हे गंभीर इशारे का
दिश्या सारख्या वळवी
स्वप्ने पाहू लागतो
जळतात फुले तिथे
प्राणात तम भरतो
हे प्राक्तन कसले
सूड भरल्या हाताने
कुणा सटवीने लिहले
मज कळेना असले
का पाहूच नये ती
बाग फुलांनी भरली
का धावूच नये ती
वाट हिरवळ दाटली
हा छंद तारकांचा
का मनातून जाईना
रुतले पाय मातीत
नजर खाली ढळेना
हा जन्म गूढ कोण
कुण्या वाटेवर चालवी
हे गंभीर इशारे का
दिश्या सारख्या वळवी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)