चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा








हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच
दाबून धरावा लागतो.
वाजता पैंजण कुणाची,
कुठे चंचल बांगड्यांचा आवाज,
ह्या माझ्या वेड्या मनास,
आता फक्त तुझाच आभास
सखे येईल चंद्र पाहण्या तुला ढगाआडूनी
देईल निरोप माझा तुला क्षणभर थांबुनी
घे ओंजळीत भरुनी ते चांदणे मन भरुनी
भेट तुझी नि माझी अंतरंगात स्मरूनी

एकटा

एकटी स्वप्न माझी ,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा.
मैत्री म्हंटली की 
आठवतं ते बालपणं 
आणि मैत्रीतून मिळालेलं 
ते खरंखुरं शहाणपण.
मैत्री म्हणजे 
रखरखत्या उन्हात मायेची सावली 
सुखाच्या दवात भिजून 
चिंब चिंब नाहली

एप्रिलफूल

फुलराजाने फुलराणीला फुलांच्या फुलदाणीत फूल देऊन शुभेच्छा दिल्या.
तो म्हणाला, 'हे फुलराणी, तू फुल टू ब्युटीफुल, वन्डरफुल
आणि सगळ्या फुलात कलरफुल.
माझ्या भावना आहेत ख-याखु-या. समजू नकोस त्याला एप्रिलफूल.'

प्रेमपत्र

अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र
कळी उमाळण्याच्या आशेत वेडा चंद्र रात्रभर जागा होता,
कळी उमाळनार असा त्याचा विश्वास होता,
पहाट झाली, कळी उमळली,
पण हे पाहण्यास वेडा चंद्र कुठे होता???
आठवाने जेव्हा तुझ्या
झंकारते काळीज हे
एकेक ती आठवण
माझ्यासाठी खास होते
लाविलेस वेड मला
परी आता शोधू कुठे
चोहीकडे पाहीले मी
तुझ्याविना ओस होते

जीवन

अस का बर हे जीवन असत
जे आपल असत ते आपल कधीच नसत
आणि जे आपल नसत तेच गळ्यात पडत
कितीही रडलो तरीही जीवन मात्र पुढेच सरत.

वाटल न्हवत

वाटल न्हवत तू इतकी बदलशील
इतक्या लवकर मजला विसरशील
स्वप्न सजवली होती आपण दोघांनी मिळून
वाटल न्हवत, जाताना केवळ आठवणीच ठेऊन जाशील.....!!