भुत

चिंटु- बाबा भुत असतात का हो?

बाबा- छे अस काही नसत बाळ भुत वैगेरे नसतात.

चिंटु- पण बाबा आपली कामवाली बाई तर बोलत होती की भुत असतात

बाबा- चल बेटा सामान भर. आपण जाऊ इथुन.

चिंटु- पण का बाबा?

बाबा.- (घाबरत) आपल्याकडे कुणी कामवाली बाई नाही!
एका व्यक्तिला वेगाने गाडी चालवण्याच्या आरोपात कोर्टात हजर केले जाते.

न्यायाधिश - तु तुझी गाडी धीम्या गतीने चालवत होता, हे कसे सिद्ध करु शकतो.

आरोपी - सर, जेव्हा मी गाडी चालवत होतो, तेव्हा माझी पत्नी माझ्या सोबत होती. मी तिला तिच्या माहेराहून माझ्या घरी घेऊन चाललो होतो.

न्यायाधिश - ओ.के. केस डिस्मीस !!

१००% हजेरी

तुमची गर्लफ्रेंड आणि तुम्ही एकाच कॉलेज मध्ये शिकत असाल तर त्याचा एक मोठा फायदा असतो.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१००% हजेरी

छंद

एक शिक्षिका  नवीन आलेली असते
ती मुलांना विचारते कि तुमच नाव आणि छंद सांगा

पहिला मुलगा - माझ नाव गण्या ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

दुसरा मुलगा - माझ नाव राजू ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

तिसरा मुलगा - माझ नाव किरण ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

•सगळ्यांची नावे वेगळी पण छंद एक•
शिक्षिका  आश्चर्यचकित होते

आता मुलीँनी नाव सांगा
पहिली मुलगी - माझ नाव चंद्रा

गरम पाण्याचे बर्फ

फिरता विक्रेता मे महिन्यात एका लहान गावातल्या सामान्य हॉटेलात गेला होता. बर्फ घालुन पाणी मागितल्यावर वेटरने बर्फ घालून पाणी दिल, थंडगार पाणी पिऊन तो खूष झाला.

दुस-या दिवशीही बर्फ घातलेले पाणी पीत असताना तो वेटरला म्हणाला, "कालचं बर्फाचे पाणी अधिक थंड होत, हे ऎवढे थंड नही."

"ज्याच काय आहे", वेटर म्हणाला, "कालचा बर्फ थंड पाण्यापासून केला होता आणि आजचा बर्फ गरम पाण्यापासून केला आहे. म्हणून पाणी कमी थंड आहे."

गुरुजींकडे लक्ष द्या


गुरुजी : मुलानो मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे माज्याकडे लक्ष द्या

एक मुलगा खिडकीतून बाहेर माकड पाहत असतो

गुरुजी : अरे गधड्या मी इथे असताना तू बाहेर कशाला पाहतोस?
एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली.

त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तमसोय '
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी '
तर दुसर्याववर ' मांसाहारी '
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक '
तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल '
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती 'रोख' तर दुसर्याावर 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.

वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तोअचंबीत झाला . त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला ,
'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे. हॉटेल नाही.