शंकराचा त्रिशूळ

शंकर(पार्वतीला) : माझा त्रिशूळ कोठे आहे?

पार्वती : गणेशाने घेतला आहे.

शंकर : कशासाठी घेतला?

पार्वती : मॅगी खायला
स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले होते. या भ्रमण काळात त्यांना अनेक संत महापुरुष भेटले. एका संतांने त्यांना पवहारी बाबांची गोष्ट सांगितली. ती कथा पुढीलप्रमाणे होती...

प्रसिद्ध योगी पवहारी बाबा यांचे गंगा किना-यावर निर्जन ठिकाणी वास्तव्य होते. एके दिवशी रात्री बाबांच्या कुटीत एक चोर घुसला. काही भांडी, कपडे आणि एक घोंगडी हीच काय ती बाबांची संपत्ती. भांडी बांधून चोर पळण्याच्या तयारीत होता. घाई गडबडीत तो कुटीच्या एका भिंतीवर आदळला. घाबरून पळताना चोरलेले साहित्य खाली पडले.

बाबा उठले आणि चोराच्या मागे धावू लागले. खूप दूर गेल्यानंतर का होईना बाबांनी चोराला पकडलेच. घाबरलेला चोर थरथरत होता. परंतु बाबा त्याच्या चरणावर कोसळले. रडू लागले. बाबा चोराला विनवणीच्या सुरात म्हणू लागले, 'प्रभू, तुम्ही आज चोराच्या रूपात माझ्या कुटीत आलात. चुकून काही वस्तू तुम्ही तिथेच टाकलीत. कृपया त्याही सोबत घेऊन जा.'

चोराला काय करावे समजेना. बाबांच्या प्रेमाच्या आग्रहापोटी त्याने ते साहित्य स्वीकारले. बाबांनी एका गुन्हेगारातही देव पाहिला होता.

कथा ऐकवून त्या साधू पुरुषाने स्वामी विवेकानंदांना विचारले, 'तुम्हाला माहिती आहे तो चोर कोण होता.' स्वामींनी अनभिज्ञता दर्शविली. त्यावर त्यांनी सांगितले, तो चोर मीच होतो.
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा ” स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.

"बाप"- उन्हामधलं सावली देणारं झाड

उन होऊन माथ्यावरती पाखरांचे तो करतो लाड
"बाप"असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

पाखरांचा चिवचिवाट कानी पडताच
वड आनंदाने बहरून येतो
पाखरं बांधतात घरटी. तेव्हा-
वड केवढा मोहरून जातो
फांदीच्या हातावर नि पानाच्या तळव्यावर
पाखरांचे तो करतो लाड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

मातीमध्ये मुळे त्याची -
खोल-खोल जातात. आणि-
खडकाच्याही पोटामधले
घेऊन येतात नारळपाणी
पाखरं उडून गेली तरी-
येत नाही त्यांच्या आड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणार वडाचं झाड

डोक्यावरती उन घेऊन
सर्वांना तो सावली देतो
उन्हाचा मुकुट पेलता पेलता
अचानक तो म्हातारा होतो
पारंब्याची काठी घेवून
तोल सावरतो जणू पहाड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

वड उन्मळून पडतो तेव्हा
सावली होते सैरभैर
बाप नाही जाणवल्यावर
पाखरांचाही तुटतो धीर
उपसला तरी आटत नाही त्याच्या आठवणींचा आड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं

एका वेड्याचं पत्र

एक वेडा पत्र लिहित होता.

डॉक्टरांनी त्याला विचारले, '' कुणाला पत्र लिहितोस ?''

वेडा , '' मला स्वत:ला ''

डॉक्टर, '' काय लिहिलं आहे पत्रात ?''

वेडा , '' काय माहित... अजुन मला पत्र मिळालंच कुठं? ''

११ नंबरच बटन

एक सरदार पाहूणा म्हणून अमेरिकेला आपल्या मित्राकडे गेला. मित्राने बाहेर कामावर जातांना सरदारजीला , '' समोरचं दार आतून बंद करुन घे, बाहेर जातांना दाराला कुलूप लावून जा, काही प्रॉब्लेम असल्यास 911 ला फोन कर '' वैगेरे वैगेरे सगळ्या सुचना दिल्या. कारण त्या भागात खुप चोऱ्या व्हायच्या.

सरदारजीचा मित्र संध्याकाळी कामावरुन घरी आला, पाहतो तर जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. घरात चोरी झाली होती. सरदारजीचा मित्र सरदारजीवर जाम भडकला -

'' तुला सांगितलं होतं ना मी बाहेर जातांना कुलूप लावून जा म्हणून''

'' मी बाहेर गेलोच नाही'' सरदारजी म्हणाला.

'' तुला सांगितलं होतं ना मी की दार आतून बंद करुन घे म्हणून"

'' हो मी दार आतून बंद केलं होतं.. पण चोर खिडकीतून आत आले''

'' म्हणजे तुला चोर आल्याचं माहित होतं?''

'' हो मी या खोलीत बसून त्यांची त्या खोलीत चाललेली सगळी खुडबुड ऎकत होतो''

'' मग तु त्यांना का नाही रोखलं'' त्याच्या मित्राने विचारले.

'' कारण ते चार होते आणि मी एकटा... आणि त्यांच्याजवळ बंदूका होत्या''

'' मी तुला सांगितलं होतं ना की काही गडबड झाल्यास 911 ला फोन कर म्हणून... फोन तर तुझ्या खोलीतच होता''

'' मी प्रयत्न केला ना ... तुझ्या फोनवर मला 9 नंबरचं बटण सापडलं पण 11 नंबरचं बटन किती शोधलं तरी सापडलंच नाही'' सरदारजी म्हणाला.