का शोधू मी तुला, हरवलेली नसताना,
भरून येते मन तुला शब्दात पाहताना,
दूर गेल्याचा त्रास आहेच खर जास्त,
पण या वरही विरजण पडते तुझे हास्य स्मरताना!!

क्षणिक मैत्री

कधीतरी तू हि समजून सांग मनाला
मैत्री कधीच क्षणिक नसते,
क्षणिक असतो तो भास अपुल्यांचा
शेवटी,जसे आलो एकले,तसे एकलेच जायचे असते...

आई

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
पळून जाण्यासाठी
कधीच नसत हे आयुष
कितीही रडवल नियतीने
आपण मात्र तिला हसून फसवायचं

पूल शब्दांचे

भावनाच असते पुरेशी
समजण्या गुज मनीचे
काहींसाठी मात्र,
बांधावे लागतात पूल या शब्दांचे !!

नियति

कोणासाठी थांबवावं
इतक आयुष्य स्वस्त नसत
झोडपल जरी नियतीने
उठून तिच्यावर धावून जायचं असत !!
स्वप्नांच्या 'त्या' राज्यात
स्वर्गाचेही आपण राजे
भानावर येता उमगे
काही चौकोनातच आयुष फसे