चम्प्या कोका कोलाचा ग्लास टेबल वर ठेऊन उदास
बसला होता...
झंप्या आला आणि त्याने तो ग्लास पिऊन टाकला...
आणि बोलला - अरे चम्प्या !! इतका उदास का रे तू?
...
चम्प्या - अरे यार...आजचा दिवसच बेकार आहे यार...
सकाळी सकाळी बायकोशी भांडण झालं..
ऑफिस ला जाताना गाडी खराब झाली..
रिक्शा ने जात होतो तर रिक्शा चा एक्सिडेंट झालं..
ऑफिस मध्ये उशिरा पोहोचलोम्हणून बॉस ने नौकरी वरून
काढून टाकलं..
आणि विष टाकलेलं कोका कोला प्यावं म्हटलं तर..
तो तू पिऊन टाकलास..
ईश्वरस्तुती
II ॐ नमो भगवते वासुदेवाय II
गोविंदं गोकुलानंदम
गोपालं गोपीवल्लभम
गोवर्धनधरं वीरं
तं वंदे गोमतीप्रियम II धृ II
नारायणं निराकारम
नरवीरम नरोत्तमम
नृसिंहं नागनाथंच
तं वंदे नरकांतकम II धृ II
पितांबरं पद्मनाभम
पद्माक्षं पुरूषोत्तमम
पवित्रं परमानंदम
तं वंदे परमेश्वरम II धृ II
राघवं रामचंद्रंच
रावणारिं रमापतीम
राजीवलोचनं रामम
तं वंदे रघुनंदनम II धृ II
वामनं विश्वरूपंच
वासुदेवंच विठ्ठलम
विश्वेश्वरं विभुम व्यासम
तम वंदे वेदवल्लभम II धृ II
दामोदरं दिव्यसिंहम
दयालुं दीननायकम
दैत्यारिं देवदेवेशम
तं वंदे देवकीसुतम II धृ II
मुरारिं माधवं मत्स्यम
मुकुन्दं मुष्टीमर्दनम
मुंजकेशं महाबाहुम
तं वंदे मधुसूदनम II धृ II
केशवं कमलाक्षंच
कामेशं कौस्तुभप्रियम
कौमुदेतीधरं कृष्णम
तं वंदे कौरवांतकम II धृ II
भुधरं भुवनानंदम
भूतेशं भूतनायकम
भावनैकं भुजंगेशम
तं वंदे भवनाशनम II धृ II
जनार्दनं जगन्नाथम
जगच्चैकं विनाशकम
जामदग्न्यवरं जोगीम
तं वंदे जलशायिनम II धृ II
चतुर्भुजं चिदानंदम
चाणूरमल्लमर्दनम
चराचरगतं देवम
तं वंदे चक्रपाणिनम II धृ II
श्रियःकरं श्रीयोनाथम
श्रीधरं श्रीवरप्रदम
श्रीवत्सलधरं श्यामम
तं वंदे श्रीसुरेश्वरम II धृ II
योगीश्वरं यज्ञपतिम
यशोदानंददायकम
यमुनाजळकल्लोळम
तं वंदे यदुनायकम II धृ II
शालीग्रामं शिलासूक्तम
शंखचक्रोपशोभितम
सुरासुरसदासेव्यम
तं वंदे साधुवल्लभम II धृ II
त्रिविक्रमम तपोमूर्तिम
त्रिविधाभोगनाशनम
त्रिस्थलं तीर्थराजेंद्रम
तं वंदे तुलसीप्रियम II धृ II
अनंतं आदिपुरूषम
अच्युतंच वरप्रदम
आनंदंच सदानंदम
तं वंदे अघनाशनम II धृ II
लीलयाकृतभूभारम
लोकस्त्वैकवंदितम
लोकेश्वरम च श्रीकांतम
तं वंदे लक्ष्मणप्रियम II धृ II
हरींच हरिणाक्षींच
हरिनाथं हरीप्रियम
हलायुधसहायंच
तं वंदे हनुमत्पतिम II धृ II
गोविंदं गोकुलानंदम
गोपालं गोपीवल्लभम
गोवर्धनधरं वीरं
तं वंदे गोमतीप्रियम II धृ II
नारायणं निराकारम
नरवीरम नरोत्तमम
नृसिंहं नागनाथंच
तं वंदे नरकांतकम II धृ II
पितांबरं पद्मनाभम
पद्माक्षं पुरूषोत्तमम
पवित्रं परमानंदम
तं वंदे परमेश्वरम II धृ II
राघवं रामचंद्रंच
रावणारिं रमापतीम
राजीवलोचनं रामम
तं वंदे रघुनंदनम II धृ II
वामनं विश्वरूपंच
वासुदेवंच विठ्ठलम
विश्वेश्वरं विभुम व्यासम
तम वंदे वेदवल्लभम II धृ II
दामोदरं दिव्यसिंहम
दयालुं दीननायकम
दैत्यारिं देवदेवेशम
तं वंदे देवकीसुतम II धृ II
मुरारिं माधवं मत्स्यम
मुकुन्दं मुष्टीमर्दनम
मुंजकेशं महाबाहुम
तं वंदे मधुसूदनम II धृ II
केशवं कमलाक्षंच
कामेशं कौस्तुभप्रियम
कौमुदेतीधरं कृष्णम
तं वंदे कौरवांतकम II धृ II
भुधरं भुवनानंदम
भूतेशं भूतनायकम
भावनैकं भुजंगेशम
तं वंदे भवनाशनम II धृ II
जनार्दनं जगन्नाथम
जगच्चैकं विनाशकम
जामदग्न्यवरं जोगीम
तं वंदे जलशायिनम II धृ II
चतुर्भुजं चिदानंदम
चाणूरमल्लमर्दनम
चराचरगतं देवम
तं वंदे चक्रपाणिनम II धृ II
श्रियःकरं श्रीयोनाथम
श्रीधरं श्रीवरप्रदम
श्रीवत्सलधरं श्यामम
तं वंदे श्रीसुरेश्वरम II धृ II
योगीश्वरं यज्ञपतिम
यशोदानंददायकम
यमुनाजळकल्लोळम
तं वंदे यदुनायकम II धृ II
शालीग्रामं शिलासूक्तम
शंखचक्रोपशोभितम
सुरासुरसदासेव्यम
तं वंदे साधुवल्लभम II धृ II
त्रिविक्रमम तपोमूर्तिम
त्रिविधाभोगनाशनम
त्रिस्थलं तीर्थराजेंद्रम
तं वंदे तुलसीप्रियम II धृ II
अनंतं आदिपुरूषम
अच्युतंच वरप्रदम
आनंदंच सदानंदम
तं वंदे अघनाशनम II धृ II
लीलयाकृतभूभारम
लोकस्त्वैकवंदितम
लोकेश्वरम च श्रीकांतम
तं वंदे लक्ष्मणप्रियम II धृ II
हरींच हरिणाक्षींच
हरिनाथं हरीप्रियम
हलायुधसहायंच
तं वंदे हनुमत्पतिम II धृ II
गुढीपाडव्याचे महत्त्व
विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा :
१. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.
दुसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते 'शक' असा दोघांचाही अंतर्भाव 'शालिवाहन शक' यामध्ये करण्यात येतो.
२. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.
३. भगवान श्ाी विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.
गुढीपाडवा असा साजरा करावा!
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्ाण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.
अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने 'नीम : ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे.
निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत।
ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।।
कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्।
भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे.
पंचांगाचे महत्त्व
गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्ाावण, भादपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू व सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर व चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे व आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते.
कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ हजार वषेर् आहेत. त्यापैकी पाच हजार १०९ वषेर् झाली. येत्या रविवारी गुढीपाडव्याला ५११० वर्षांचा प्रारंभ होईल. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगानी पंचांग बनते. इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून तिथी प्रचारात आहेत. इ.स. पूर्व एकहजार वर्षांपासून वार प्रचारात आहेत. नक्षत्रेही इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आहेत. 'योग' हे पंचांगातील चौथे अंग इ.स. ७०० नंतरच प्रचारात आले. पाचवे अंग 'करवा' हे इ.स.पूर्व १५०० पासून प्रचारात आले. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक! वर्षभरातील खगोलीय घटनांचे वेळापत्रक पंचांगात असते. पंचांगे ही सूर्यसिद्धांत, ग्रहलाघव, करणकल्पकता या करणग्रंथांवरून तयार केली जात. सध्या पंचांगे ही संगणकावर तयार केली जातात. ती जास्त सूक्ष्म असतात.
- दा. कृ. सोमण / Maharashtra Times
इतिहास
आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी. नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी, असे सांगितले आहे. तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधार्यांना वंदन करावे, असेही सांगितले आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे मंगळवारी सुरु होत असल्यामुळे मंगळ हा या वर्षाचा अधिपती असे समजले पाहिजे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.
जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. अशी विविध प्रकारांनी संवत्सरांची विभागणी आणि मांडणी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)