एका माणसाचा आपल्या सासूवर खूप राग होता. त्याच्या घरी तो, त्याची बहीण, त्याची बायको आणि त्याची सासू असे चौघे राहत होते.
एकदा देव त्या माणसाला म्हणाला, "तुझ्या घरातील एक माणूस आता मरणार आहे, तेव्हा आता तू इतर तिघांची परीक्षा घ्यायचीस. जो कोणी नापास होईल त्याला मी घेऊन जाणार"
माणूस म्हणाला, "मी गणिताची परीक्षा घेतो" त्याने बहिणीला विचारलं, "२+२=?", बायकोला विचारलं,"२-२=?" आणि सासूला विचारलं,"१७७९ चा पाढा म्हणून दाखव " सासूला उत्तर आलं नाही.
देव म्हणाला,"हे योग्य नाही, तू अजून एक परीक्षा घे".
माणूस म्हणाला,"आता मी इतिहासाची परीक्षा घेतो."त्याने बायकोला विचारलं,"पानिपतला किती लढाया झाल्या?", बहिणीला विचारलं,"शिवाजीमहाराजांच्या मुलाचं नाव काय?" आणि सासूला विचारलं,"पानिपतच्या लढाईत मेलेल्या प्रत्येक माणसाचं नाव सांग." सासूला अर्थातच उत्तर आलं नाही.
देव भडकून म्हणाला, "हे योग्य नाही. तू पक्षपातीपणा करत आहेस, अजून एक परीक्षा घे."
माणूसही चिडला. तो म्हणाला,"आता ही शेवटची परीक्षा! यात जो कोण नापास होईल त्याला तू घेऊन जायचंस." देवाने मान्य केलं.
माणूस म्हणाला,"आता मी इंग्रजीची परीक्षा घेतो." त्याने बायकोला विचारलं," 'ऑन' चं स्पेलिंग काय?", बहिणीला विचारलं," 'नो' चं स्पेलिंग काय?"
आणि सासूला विचारलं...........
" 'झेकोस्लोवाकिया' चं स्पेलिंग सांगा"
साधं सोपं आयुष्य
साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...
आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!
पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं
असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं
साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
कवी - प्रसाद शिरगांवकर
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...
आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!
पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं
असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं
साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
कवी - प्रसाद शिरगांवकर
जिना
कळले आता घराघरातुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायाला.
जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड.
मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहूनी
चुकचुकणारी पाल असावी.
जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.
मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...
कवी - वसंत बापट
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायाला.
जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड.
मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहूनी
चुकचुकणारी पाल असावी.
जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.
मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...
कवी - वसंत बापट
माझे गाणे
माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे,
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे,
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गाता.
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.
"निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी,
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले,
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले
शांतहि मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला,
चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला.
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्गानाची गति ही शेवटली.
कवी - बालकवी
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे,
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गाता.
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.
"निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी,
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले,
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले
शांतहि मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला,
चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला.
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्गानाची गति ही शेवटली.
कवी - बालकवी
तुझी वंचना, साधना
तुझी वंचना, साधना, होत आहे
तुलाही आता, वेदना, होत आहे
पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे
जशी लागली, ओहटी आसवांना
मनाचा किनारा, सुना होत आहे
जरा कुंडलीला, विचारून बघ तू
मनोकामना, वासना होत आहे
नवा क्षण, नवा क्षण, नवा क्षण कशाचा
नव्याने म्हणेतो, जुना होत आहे
कशाला उगी, फुगवटा पाहिजे रे
तुझे बोलणे, वल्गना होत आहे
शिळा एक होती, घडविलीस मूर्ती
मलाही अता, भावना होत आहे
तुला स्पर्श केला, असा भास झाला
किती गोड, संवेदना होत आहे
जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू
दुरावा `इलाही', गुन्हा होत आहे
कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे
तुलाही आता, वेदना, होत आहे
पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे
जशी लागली, ओहटी आसवांना
मनाचा किनारा, सुना होत आहे
जरा कुंडलीला, विचारून बघ तू
मनोकामना, वासना होत आहे
नवा क्षण, नवा क्षण, नवा क्षण कशाचा
नव्याने म्हणेतो, जुना होत आहे
कशाला उगी, फुगवटा पाहिजे रे
तुझे बोलणे, वल्गना होत आहे
शिळा एक होती, घडविलीस मूर्ती
मलाही अता, भावना होत आहे
तुला स्पर्श केला, असा भास झाला
किती गोड, संवेदना होत आहे
जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू
दुरावा `इलाही', गुन्हा होत आहे
कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे
पत्र
पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली
धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे
पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले
पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा
सार्तथा संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला
नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे
कवी - भाऊसाहेब पाटणकर
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली
धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे
पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले
पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा
सार्तथा संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला
नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे
कवी - भाऊसाहेब पाटणकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)