अशा रणरणत्या उन्हातही एकटा नव्हतो मी
एक सावली माझ्या आगे-मागे धावत होती सारखी

तुझ्या आठवणीने एकटे राहूच दिले नाही मला

मौनमुद्रा

आतल्या हळवेपणावर
तिने आता चढवले आहे
एक भरभक्कम चिलखत,
मनात नसेल तेव्हा
अतिपरिचित स्नेह्यांनाही
ती नाही देत प्रतिसाद, नाही ओळखत.

तिच्यासमोर अनेक प्रश्नचिन्हे
डोळे वटारुन बघणा-या समस्या
ज्यांच्याशी करायचा आहे तिचा तिलाच मुकाबला,
आता कुठे तडजोड नाही
लाचार माघार नाहीच नाही
तिचा लढाच आहे मुळी इतरांहून वेगळा.

तसे वॄक्ष अजूनही बहरतात
फुलांनी गच्च डवरतात
हृदयतळातून फुटतात अंकुर, झुलतात पाने,
एका अज्ञात आकाशात
शुभ्र शुभ्र भरारी घेतात
गातातही पाखरे तिच्या आवडीचे एकुलते गाणे.

आतले विश्व समॄध्द संपन्न
जपत कराराने मनोमन
बाहेर मात्र ती रुक्ष, कोरडी, नि:स्तब्ध,
प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरीत
डोळ्यातले पाणी प्रयासाने आवरीत
ओठांवरची मौनमुद्रा उकलून ती बोलते मोजका शब्द


कवियत्री - शांता शेळके

नाते

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!

चिंब मिठी

सर्सर सर्सर वळवाची सर
आली अचानक धावत धावत
थेंब टपोरे माथी झेलत
झाडे वेली अवघी नाचत

अवेळीस हा पाऊस चावट
तुझ्या बटांवर होता अलगद
झाडाचा आधार चिमुकला
तिथेच तू ही होती निथळत

थरथरणारा देह तुझा तो
भिजून सारी वसने ओली
भिरभिरलेल्या त्या नजरेतच
भिती अनामिक तरळून गेली

कडाड् लखकन वीज चमकता
नकळत सारे अवचित घडले
मिठीत केव्हा अलगद दोघे
तुला- मला ना काही कळले

चिंब चिंब हा पाऊस अजूनी
तनामनाला हुरहुर लावी
पाऊस येता वळवाचा तो
चिंब मिठी ती स्मरते सारी

अरे संसार संसार र

शेवंताबाईंसोबत लग्न झाल्या दिवसा पासुन बळवंतराव बायकोच्या स्वभावामुळे जीवनाला कंटाळले होते. रोज रोजच्या भांडणापासुन मुक्ती मिळावी या विचाराने ते एक दिवस भांडण चालू असतानाच तडक बाजारात गेले व विषाची बाटली घेऊन आले.

बायको काही ऎकत नाही हे बघुन त्यांनी बाटली फोडली व गटागटा विष पिऊन झोपले. त्यांना वाटले झोपल्यावर विषाचा परिणाम लौकर होणार व त्रासही होणार नाही.

दोन तासांनी बळवंतरावांना जाग आली हे बघुन पुन्हा शेवंताबाईंनी आपली टकळी सुरु केली,"तुमच कोणतही कामा असच असते. आता बघाना आज विष आणल पण काही फायदा झाला का ? ......................................."

अशक्य

अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आसमची सायकल बाहेर काढली. ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे

अनुप- पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही

तो- मग त्याच्याकडेच घेऊन जा.

योग्य क्रम

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!