पाऊस

आता आत बाहेर जळत रहातो पाऊस
पुन्हा जखमा ओल्या करत रहातो पाऊस

तुझ्या आठवात कधी तुझ्या विचारात
गाणं तेच तेच म्हणत रहातो पाऊस

चाहूल न लागे , जोवर तुझ्या पावलांची
कसा नभातच झुरत रहातो पाऊस

किती तुज स्पर्शिल्या, अन किती पळ हुकल्या
हिशेब धाराधारांचा करत रहातो पाऊस

तुला न्यायचे पार त्या ढगांचा गावी
कल्पनेत आतल्या आत भिजत रहातो पाऊस

पण पाहुन तव हात , हातात माझ्या
कसा डोंगरा आडूनच परत जातो पाऊस

सोडून तू गेलीस मज, त्या दिवसापासून
मृगातच हस्तासारखा पडत रहातो पाऊस

तुला निभवता नाही आले प्रेम त्या फुलाचे
चिखल चेहर्यावर उडवत रहातो पाऊस

अरे आता बरसणे नाही रे पूर्विसारखे
पांपण्यांवर मेघ ठेवून रडत रहातो पाऊस

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला …
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला …
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला …
श् वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला …

काळ्या ढगांमधून पळून यायला …
अलगद तुझ्या कुशीत शिरायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..

तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला …
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला …

आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला …
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

भाळशील का तू माझ्या या रुपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला …
तरच आवडेल मला पाऊस व्हायला …

पाऊस असा रुणझूणता

पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली …

ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध , निस्तब्ध मनाची वेस
पाऊस असा रुणझूणता

पाउस सोहला झाला , पाउस सोहला झाला
कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता
अन केव्हा संथ थेम्बंच्या संथ लयीचा
..
नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
गात्रातून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला..
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..

पाऊस कधीचा पडतो…

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा


कवि - ग्रेस

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे


- साने गुरूजी

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
आणी बाईक पुसण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भर खातो
आणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
आणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आमचे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
आणी आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

मित्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दुसर्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

लोकांना टाळयायला आमच्या कडे बहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सगळ्याननाच माहीत असतात,
अणी ठरल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सुट्ट्या आणि एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नसते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बर्थडेत असते,
बाकी तारखा लक्ष्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
आणि अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही…!

कुत्र्याकरीता

एक बाई आपल्या कुत्र्याला दुध पिण्याकरिता स्टेनलेस स्टीलची थाळी विकत घ्यावी, म्हणुन दुकानात गेल्या. दुकानदाराने थाळी बांधून देतांना विचारले की, त्यावर कुत्र्याकरीता अशी अक्षरे टाकून देऊ का?

बाई उत्तरल्या, ” त्याची जरूरी नाही. कारण आमचे हे दूध पीत नाहीत आणि कुत्र्याला वाचता येत नाही.”