तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्य़ांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे . गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.

पण ते पडण्यापुर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.


कवियत्री - इंदिरा संत

थेंबाथेंबी

तारेवरती असती थांबुन
थेंब दवाचे;
मनांत ज्यांच्या,
इवले काही, हिरवे पिवळे
चमचमणारे……
सतारीवरी असती थांबुन
थेंब सुरांचे;
मनांत ज्यांच्या ,
इवले कांही, निळे- जांभळे
झनझनणारे…….
मनोमनावर असती थांबुन
थेंब विजेचे;
छेडुन तारा करांगुलीने.
ऒठ करावे पुढती
टिपायला ती थेंबाथेंबी.

कवियत्री - इंदिरा संत

वेदना

इथे वेदना लालतांबडी;
इथे बधिरताअ संगमरवरी;
इथे उकळते रक्त तापुनी,
बेहोषी अन येथे काळी.
दुखणे बसले चिंध्या फाडित.
गर गर फिरती त्याचे डोळे
नसांनसातुन.
घुमते त्याचे हास्य भयानक
उरल्या सुरल्या रक्त कणांतुन
समोर त्याच्या
करते नर्तन …..एक आठवण
त्या प्रलयाची.
हे कथ्थक…त्या मुद्रा…..
अन ते खर्जातले कंपन.


कवियत्री – इंदिरा संत

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली….



कवियत्री - इंदिरा संत

हिमोग्लोबिन कमी झालय

मंग्या पॅथोलोजी मध्ये काम करणारया अंजूच्या प्रेमात पडला,
तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने स्वताच्या रक्ताने प्रेमपत्र लिहील,
तिला ते पत्र देत तो मस्करीत म्हणाला " मला याचा रिपोर्ट कळव".
चलाख अंजूने दुसरया दिवशी त्याच्या हातात एक चिट्ठी ठेवली,
मंग्याला वाटल पोरगी पटली, त्याने चिट्टी उघडून पहिली,
...त्यात लिहील होत,

"रक्तगट O+ आहे फक्त हिमोग्लोबिन कमी झालय"

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

फिरले रे ग्रह माझे फिरले रे

फिरले रे ग्रह माझे फिरले रे
ओढीने, पैशांच्या, पैशांच्या ओढीने, भुलले रे मन माझे भुलले रे

लेकरे टी.व्हीची आली रे घेउन मागणी माझ्यापुढे
गरीब घराची जाणीव होऊन धावले मन वेडे
या वेडाने, या वेडाने, लावीले शनीचे फेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, तुटले रे जन माझे तुटले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....


विचार सोडुन, मनासी मोडुन, पैसे ते स्विकारले
पैशांना जागुन, सभेत जाउन, प्रश्नही विचारले
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, मोडले रे घर माझे मोडले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....


कवी - सुभाष डिके