गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....

मला घरी यायला वेळ लागेल...

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....

दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो.

मुला कडचे :- आम्हाला मुलगी पसंद आहे.
मुली कडचे -: पण आमची मुलगी अजुन शिकत आहे.
.
.
.
.
.
मुला कडचे :- मग आमचा मुलगा काय लहान आहे का पुस्तक फाडायला??

मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय

मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....

मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या. 

एक आरसा होता त्याच्यासमोर खोट बोलणारा मरत असतो,
फ्रेंच : मी असा विचार करतो कि मी सिगारेट पीत नाही, (लगेच फ्रेंची मरतो)
अमेरिकन : मी असा विचार करतो कि इराकी माझे बंधू भगिनी आहेत ( लगेच अमेरिकन मरतो)
..
.
.
.
.
.
.
सरदार : मी असा विचार करतो कि ...( आणि लगेच सरदार मरतो)

झंप्या दारू पिऊन झिंगून रस्त्याने जात असतो, समोरून एक कुत्रे येऊन खूप जोरात भुंकायला लागते, झंप्या रस्त्याच्या कडेच मोठा दगड कुत्र्याला मारण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न करतो, पण दगड जागचा हलत नाही....
शेवटी वैतागून म्हणतो....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"काय पण जमाना आलाय.....लोक कुत्र्याला मोकळे सोडतात..... आणि दगड बांधून ठेवतात...."

'श्यामची आई'

'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी १९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी १९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.



अनुक्रमणिका