डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.

परत १० मी. फोन येतो.

पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.

अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.

१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की..

शांतता

घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
- बाकी शांतता...
- हिरवी शांतता...
- गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
नव्हे ... प...रि...म...ल
अलगद उडणारी फुलपाखरें
फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
पलीकडे ऊंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्या भोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
...नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
...शांतता सजीव...गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ
...शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे
जादूचे...गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन..गगन
शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण!


कवी -  शंकर वैद्य

गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....

मला घरी यायला वेळ लागेल...

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....

दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो.

मुला कडचे :- आम्हाला मुलगी पसंद आहे.
मुली कडचे -: पण आमची मुलगी अजुन शिकत आहे.
.
.
.
.
.
मुला कडचे :- मग आमचा मुलगा काय लहान आहे का पुस्तक फाडायला??

मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय

मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....

मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या. 

एक आरसा होता त्याच्यासमोर खोट बोलणारा मरत असतो,
फ्रेंच : मी असा विचार करतो कि मी सिगारेट पीत नाही, (लगेच फ्रेंची मरतो)
अमेरिकन : मी असा विचार करतो कि इराकी माझे बंधू भगिनी आहेत ( लगेच अमेरिकन मरतो)
..
.
.
.
.
.
.
सरदार : मी असा विचार करतो कि ...( आणि लगेच सरदार मरतो)

झंप्या दारू पिऊन झिंगून रस्त्याने जात असतो, समोरून एक कुत्रे येऊन खूप जोरात भुंकायला लागते, झंप्या रस्त्याच्या कडेच मोठा दगड कुत्र्याला मारण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न करतो, पण दगड जागचा हलत नाही....
शेवटी वैतागून म्हणतो....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"काय पण जमाना आलाय.....लोक कुत्र्याला मोकळे सोडतात..... आणि दगड बांधून ठेवतात...."