पहिली चुक

झंम्प्या : साहेब ह्यावेळी तुम्ही माझा पगारात २०० रुपये कमी दिलेत

साहेब : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून २०० रुपये जास्त दिले होते.

झंम्प्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो.
"ब्रेकपच्या १ वर्षानंतर......

मुलगी :- काय तू अजूनही माझ्यावर प्रेम
करतोस ?

मुलगा :- प्रेमाचे माहित नाही, पण माझे मित्र
अजूनही तुझी शप्पथ घालून काम करून घेतात ...!

डिप्लोमा

आज्जी (लहान बाळाला) : झोप 'डिप्लोमा'.....झोप....
.
.
शेजारी बसलेली बाई आज्जी ला विचारते : आहो तुम्ही या बाळाला 'डिप्लोमा' का म्हणत आहात???
.
.
.
आज्जी : माझी मुलगी मुंबई ला 'डिप्लोमा' आणायला गेली होती......आणि हे घेऊन आली

हुशार मुली

काका सफरचंद केवढ्याला दिले ओ...?
.
.
काका - १०० चे १०...
.
मुलगी - काही कमी करा ना ..:-)
.
.
.
.
.
.
.
.
.
काका - ठिक आहे, ८० चे ८ घे ..
.
.
.
.
मुलगी - थॅंक्यु काका..
आजपासुन तुमच्या कडुनच सफरचंद घेईल ..

समजलचं नाही.......

शेणामातीच्या अंगणापर्यंत डांबर कधी आलं
समजलच नाही,
सुंदर पानफ़ुलांचं शेवाळं कधी झालं
समजलंच नाही,
पुर्वी अंगणात सारवुन त्यावर
रांगोळी सजायची
प्रसन्नता अंगणातुन सर्व घरात उतरायची
दिव्यांचा तो मिणमिणता प्रकाश प्रखर कधी झाला
समजलंच नाही,
चिऊकाऊच्या त्या गोष्टी,
पुस्तकां ­चा तो सुवास गोष्टींमधलं काही खास,
 जादुई दुनियेचा आभास
मनाच्या कोन्यात कधी दुरवर फ़ेकलं गेलं
समजलच नाही,
जास्तीचा हव्यास असा नड्ला,
माणुसमग एकटा पड्ला कागदाच्या बद्ल्यात सारं
काही कधी विकलं गेलं
समजलच नाही,
सारे कसे बदलुन गेलं,
जुनं आता स्वप्न झालं
काळासोबत आयुष्याचं गणित कधी बद्लत गेलं
समजलचं नाही.

इंदिरा संत

संत ईंदिरा नारायण ( जन्म ४ जानेवारी १९१४ ते १३ जुलै २०००)कवियत्री, कथाकार, ललित लेखिका.
मुळच्या इंदोर च्या इंदिरा दिक्षीत..
फर्ग्युसन मधे महाविद्यालयिन शिक्षण.. तेथेच प्रा. ना. मा. संत यांच्याशी परिचय ऊन पुढे विवाह झाला.
पहिला काव्य संग्रह:- १९४० मधे “सहवास”
१९४६ मधे वैधव्य आले.
१९५२ मधे “शामली हा कथासंग्रह
१९५५ मधे “कदली”
१९५७ मधे “चैतु “
१९५१ मधे प्रकाशित झालेल्या शेला ह्या कविता संग्रहा पासुन स्वतः ची ऒळख निर्माण झाली.शेला मधिल कविता अतिशय उत्कट ,भावपुर्ण, आणि प्रतिभा संपन्न होत्या.”विशुद्ध भाव कविता” लिहिणारी कवियत्री म्हणुन स्वतःची ओळख निर्माण केली.

१९५५ मधे मेंदी आणि १९५७ मधे म्रुगजळ ह्या कविता संग्रहात त्यांच्या कवितांचे सामर्थ्य पुर्णत्वाला पोहोचलेले दिसते..प्रिती, एकाकी पणाचे दुःख, विरह आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातुन भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दात बांधण्याची त्यांची किमया या संग्रहातुन जाणवते..

१९६४ मधे रंगबावरी, १९७२ मधे बाहुल्या, १९८२ मधे गर्भ रेशमी१९८९ मधे चित्कळा, आणि १९८९ मधे वंशकुसुम आणि निराकार हे त्यांचे संग्रह प्रसिध्द झाले.

गर्भ रेशमी ला १९८३ साली साहित्य अकादमी चे पारितोशक मिळाले.

सन्मान:-

१) अध्यक्ष , कविसंमेलन ,मुंबई मराठी साहित्य सम्मेलन १९५२ साली.
२) अध्यक्ष , महाराष्ट्र कवियत्री सम्मेलन कऱ्हाड १९७५ साली.
३) अध्यक्ष , कवियत्री साहित्य सम्मेलन , गदग १९८४ साली
४) अध्यक्ष , बालकुमार साहित्य सम्मेलन ,सावंतवाडी
५) अध्यक्ष , साहित्य सम्मेलन कदिली, कर्णाटक

पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठान्चा पुरस्कार, १९९५
’गर्भरेशमी’ साठी साहित्य अकादमी पुरस्कार
’गर्भरेशमी’ साठी अनंत काणेकर पुरस्कार
’मेंदी ’,’मॄगजळ’ या संग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
सखे येईल चंद्र पाहण्या तुला ढगाआडूनी
देईल निरोप माझा तुला क्षणभर थांबुनी
घे ओंजळीत भरुनी ते चांदणे मन भरुनी
भेट तुझी नि माझी अंतरंगात स्मरूनी