तू ठरवलं तसं सये
मलाही आज ठरवू दे
बोलक्या शब्दांवर माझ्या
तूझे थोडे मौन गिरवू दे
तू विसरली तसं सये
मलाही आज विसरू दे
आठवणीच्या हिरवळीवर
दवबिंदू म्हणून पसरू दे .....
तू जगतेस तसं सये
मलाही आज जगू दे
रित्या डोळ्यांमध्ये मला
भरलेलं आभाळं मागू दे
तू हरवतेस तसं सये
मलाही आज हरवू दे
मरणाचे दुख आपल्या
आज जगताना मिरवू दे .......
तू फसवलं तसं सये
मलाही आज फसू दे
आसवं पडद्याआड अन
व्यासपीठावर मला हसू दे
मलाही आज ठरवू दे
बोलक्या शब्दांवर माझ्या
तूझे थोडे मौन गिरवू दे
तू विसरली तसं सये
मलाही आज विसरू दे
आठवणीच्या हिरवळीवर
दवबिंदू म्हणून पसरू दे .....
तू जगतेस तसं सये
मलाही आज जगू दे
रित्या डोळ्यांमध्ये मला
भरलेलं आभाळं मागू दे
तू हरवतेस तसं सये
मलाही आज हरवू दे
मरणाचे दुख आपल्या
आज जगताना मिरवू दे .......
तू फसवलं तसं सये
मलाही आज फसू दे
आसवं पडद्याआड अन
व्यासपीठावर मला हसू दे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)