शिंग

कायम शहरातच राहिलेल्या वत्सलाबाई एकदा एका नातेवाईकाकडे खेड्यात गेल्या.

त्यांनी मनोहरपंतांना विचारले," काहो, काही जनावरांना शिंग का नसतात ?"

मनोहरपंत,"त्याच काय आहे वत्सलाताई, कधि आम्ही या जनावरांचे शिंग कापुन काढतो तर कधि ते मोठे होऊ नये म्हणुन शिंगांच्या मुळाशी रसायन टाकून ते जाळून टाकतो."

"तर त्या जनावरांना त्रास होत असेल ना ?", वत्सलाबाई.

मनोहरपंत,"जास्त त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो."

"बर सांगा या गाईला शिंग का नाहित ?

मनोहरपंत," याला शिंग नाहित कारण हा घोडा आहे."

दोन मित्र

दोन मित्र कायम एकमेकावर कुरघोड्या करत आसायचें.

कालांतरांने एका मित्रांची परीस्थिति फ़ार बिघड्ली खायचे वांदे झाले.

पैसे कमी असल्याने तो एका अतिशय थर्ड रेट होटेल मधें जेवयला गेला.

अन समोर पहातो तो काय त्याचा मित्रच वेटर म्हणुन उभा होता.

"मित्रा तु,अन इतक्या थर्ड रेट होटेल मधें काम करतो, अन ते पण वेटरचे?.. अरेरे."

"हो पण मी इतक्या थर्ड रेट होटेल मधें जेवत नाही.." मित्र शांतपणे म्हणाला.

गणिताचा तास

एकदा गणिताच्या सरांनी बंड्याला प्रश्न केला, "बंड्या, सांग पाहू एका तारेवर पाच पक्षी बसले. मी एकाला दगड मारला तर किती उरतील?"

बंड्या म्हणाला, "एकही नाही."

सर दिमाखात म्हणाले, "हा तास गणिताचा आहे म्हणून बुद्धीसापेक्षा उत्तर सांगतोय. उत्तर आहे चार. पण जाउदे. पण मला तुझी विचार करायची पदधत आवडली."

ह्यावर बंड्याने गणिताच्या सरांना प्रश्न केला, "सर आता मी एक प्रश्न विचारतो. एका भाजी मंडईत तीन बायका आपल्या नवऱ्यांसहित भाज्या विकत घेतायत. एक तावातावाने भाजीवाल्याशी भांडतेय. दुसरी उदासपणे भाजी विकते घेतेय तर तिसरी लाजत अंग चोरत भय्याच्या दिलेल्या भाज्या पिशवित टाकताना ऒठ चावत नवऱ्याकडे बघत हसतेय. तर ह्या तिघींपैकी नवविवाहित कोण?"

सर थोडे ओशाळले पण उत्तरादाखल म्हणालेच, "जी लाजतेय ती."

बंड्या म्हणाला, "हा तास गणिताचा आहे म्हणून बुद्धीसापेक्ष उत्तर सांगतोय. उत्तर आहे जिच्या हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळ्सूत्र आणी हातात मेंदी आहे ती.

पण जाउद्या. मला तुमची विचार करायची पदधत आवडली."

तू-नसशील

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.
एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तू
म्हणाल होतास,
“आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? “
हे सारे उद्याही तसेच असेल…….
ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल.
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल
फक्त तू नसशील………तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.



- अनुराधा पोतदार
- सकाळ दिवाळी अंक २०००
गांधीजी एकदा चित्रगुप्ताला विचारतात, " माझी ३ माकडं कशी आहेत?? "

चित्रगुप्त - सगळी छान आहेत.
"आंधळा" कायदा बनला आहे.
"बहिरा" सरकार बनला आहे.
आणि
"मुका" तर सगळ्यात मजेत आहे.
आजकाल "पंतप्रधान" आहे.
एका विवाहित बायकांनी भरलेल्या बसचा अपघात होतो..
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो...
सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते..
बंड्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.....
..
..
कारण
.
.
.
.
.
 त्याच्या बायकोची बस चुकली होती.
एकदा बॉस लवकर ऑफिसमध्ये येतो
आणि पाहतो की
त्याचा मॅनेजर सेक्रेटरीशी गुलुगुलु गप्पा मारत बसलाय…..
बॉसः (संतापाने) याच्यासाठी पगार देतो मी तुला ?
मॅनेजरः नाही सर ,
हे तर मी फुकटात करतो……