बरोबरी


एकवेळ संगणक मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करेल पण मानवाच्या मुर्खपणाची बरोबरी करता येणार नाही !

करार कोवळा

एकदा दिलास तू गळ्यामध्ये गळा
लगेच काळजास लाख लागल्या कळा !

योजना तुझीच का नकारतेस तू ….
सहीविना तुझ्या कसा फुलायचा मळा ?

उगाच संशयासवे युती नको करू ..
तशीच तापतेस तू, वरून ह्या झळा !

गाल हे पुन्हा पुन्हा पुसू तरी नको..
तेवढीच भेट .. तो .. करार कोवळा !


कवी - ज्ञानेश वाकुडकर
नागपूर
पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?

बाई -  नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-या त्या बाईने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, गळ्यात मोत्याची माळ होती..आणि ... तिचं लिपस्टिक मात्र तिला मुळीच शोभुन दिसत नव्हतं ..!

शेजाऱ्याची बायको

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती
.


.
.
प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!

अंगात मस्ती

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ..


का?



.. अंगात मस्ती, दुसरं काय?

सिंधी

२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
>भगवानदास गॉडवाणी

३. सिंधी चित्रकार?
>सदारंगानी!

४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
> थंडानी

५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
> क्रिपलानी

६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
> मरजानी

७. कम्युनिस्ट सिंधी?
>कार्ल लालवाणी

८. सिंधी शेफ?
>पापडमल कुकरेजा

९. सिंधी इलेक्ट्रिशियन
>व्होल्टराम बिजलानी

१०. फॅशनेबल सिंधी?
>जोगिओ अरमानी

११. सिंधी दूधवाला?
>गोपाल दुधेजा

१२. शूर शिपाई?
>हिरू सिपाहीमालानी

१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
>खटमल मारवानी

१४. सिंधी आगीचा बंब?
>बंबानी

१५. सिंधी पोस्टमन?
>मेलवानी

१६. विसरभोळा सिंधी?
>बुलो भूलचंदानी

१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
>चायपानी!!!!
अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच. त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?''

त्यानं उत्तर दिलं, '' पाहिलं. ''

कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''

'' आपले बाबा !!!! ''