एकदा एक चोर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात सापडतो.

त्याला पोलीस कोर्टात हजर करतात.

पण त्याचा गुन्हा काही सिद्ध होत नाही.

न्यायाधीश : हे बघ, पुराव्याअभावी तुझ्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तेव्हा तुझी निर्दोष मुक्तता केली जात आहे.

चोर : आभारी आहे न्यायाधीश महाराज. पण आता ती स्कूटर माझी झाली ना?
एका मोठ्या राजकीय नेत्याचे विमान अपघातात निधन होते.

काही दिवसांनी एका समाजसेवकाचे राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेने निधन होते.
हे दोघे स्वर्गात भेटतात.

राजकीय नेता : या या. आपल्यासारख्या समाजसेवकाची इथेही खूप गरज आहे. पण आपल्याला यायला एवढा उशीर का झाला?

समाजसेवक : त्याचं काय आहे...तुम्ही विमानाने आलात आणि आम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने