रामभाऊ आणि वत्सलाबाईंच्या लग्नाचा साठावा वाढदिवस साजरा करायला सर्व जमले होते. दोघेही आनंदात होते. सर्व भेटणारे त्यांच्या सुखी जीवनाच कौतुक करत होते.
रामभाऊचे जुने मित्र मनोहरपंत हा कौतुक सोहळा, कोर्यात बसुन बघत होते.
एका क्षणी मनोहरपंतांना वाटले सर्वांसमक्ष त्यांना या सुखी जीवनाचे रहस्य विचारावे आणि त्यांनी माईक हाती घेऊन रामभाऊंना विचारले,"रामभाऊ, मी तुम्हाला बरिच वर्षे ऒळखतोय पण तुमचे व वहिनींचे मी कधि भांडण बघितले नाही, याचे रहस्य सांगाल का ?"
रामभाऊ," आमच्या लग्नाच्या दिवशीच आम्ही ठरवले होते, सर्व लहान निर्णय हिने घ्यायचे व सर्व मोठ्ठे निर्णय मी घ्यायचे.
आणि
आम्हाला कधिही मोठा निर्णय घ्यायची वेळ नाही आली !"