होतो पुस्तक घेउनी सहज मी दारात त्यांच्या उभा,
बाला तोंच समोरूनी कुणीतरी आली त्वरेने पुढे
वार्याने उडुनी पुनःपुनरपी चंद्रास जे झाकिती
मागे सारित-सांवरीत पदरा-ते मोकळे कुंतल,
किंचित हासूनि बोलली मजसि ती अस्पष्ट काही तरी,
किंवा स्पष्ट असेल ते, समजले माते न तेव्हा पण;
होतो स्तब्ध तसाच मी, मजकडे डोळे तिचे लागले;
त्यांचे तेज खुले मुखावरी; रवी जाताच खाली जरा
त्याची मावळती प्रभा पसरूनी रंगे जशी वारूणी,
गोर्या, नाजुक या तनूवर तशी शोभे छटा तांबुस;
नाही पार्थीव भाव ज्यास शिवले, स्वर्गीय जे शैशव
त्याची ही रमणीय मूर्तिच उभी माझ्याकडे राहिली.
मी त्यानंतर पाहिले नच तिला,-वर्षे किती लोटली?
चित्ताच्या क्षितीजावरून परि ती नाही उषा लोपली.
- ग.त्र्यं.माडखोलकर